
Discover Tech Israel spyware Al Jazeera computer hack 2026
ऑनलाइन इंटरनेट आणि स्मार्टफोन वापरणाऱ्या युजर्सच्या गोपनीयतेवर पुन्हा एकदा मोठा हल्ला झाला आहे. आपण दररोज इंटरनेटवर विविध वेबसाइट्स किंवा मोबाईल ॲप्स वापरताना पाहतो त्या साध्या जाहिराती आता हेरगिरीचे (Cyber Attack) धोकादायक शस्त्र बनल्याचे उघडकीस आले आहे. कॅनडातील प्रसिद्ध सायबर संशोधन गट ‘सिटिझन लॅब’ (Citizen Lab) आणि न्यू यॉर्कमधील जाहिरात सुरक्षा कंपनी ‘कॉन्फिएंट’ (Confiant) यांनी गुरुवारी स्वतंत्र अहवाल प्रसिद्ध करत इस्रायली डिजिटल जाहिरात कंपनी डिस्कव्हर-टेकचा (Discover-Tech) हा आंतरराष्ट्रीय कट उघडकीस आणला आहे.
संशोधकांच्या मते, डिस्कव्हर-टेक या कंपनीने गूगल (Google), कॉमकास्ट (Comcast) आणि रशियाच्या यांडेक्स (Yandex) सारख्या बलाढ्य टेक कंपन्यांच्या जाहिरात नेटवर्कचा गैरवापर केला. या माध्यमातून त्यांनी १,२०,००० हून अधिक वेबसाइट्स आणि ७५,००० मोबाईल ॲप्सवर स्वतःच्या जाहिराती पसरवल्या. यामध्ये मोबाईल, इअरबड्स किंवा दररोजच्या वापरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या आकर्षक जाहिरातींचा समावेश होता. या जाहिराती केवळ दिसण्यासाठी नसून, युजर्सचे डिजिटल लोकेशन, आयपी ॲड्रेस आणि खाजगी ओळख ट्रॅक करण्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Air India Saudi: सौदी अरेबियाला जाणारी सर्व उड्डाणे रद्द, एअर इंडिया, इंडिगोने जारी केली सूचना, प्रवाशांना रिफंड मिळणार का?
या सायबर हल्ल्याचे सर्वात भीतीदायक वैशिष्ट्य म्हणजे यात कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याची गरज नव्हती. तंत्रज्ञानाच्या भाषेत याला ‘झिरो-क्लिक’ (Zero-click) किंवा ‘ॲडफेक्शन’ (AdFection) हल्ला म्हटले जाते. युझरने एखादी वेबसाइट किंवा ॲप उघडल्यानंतर स्क्रीनवर ही जाहिरात फक्त ‘लोड’ झाली, तरी पार्श्वभूमीत (Background) डेटा संकलनाची आणि हेरगिरीची प्रक्रिया आपोआप सुरू व्हायची. काही प्रकरणांमध्ये युजर्सचे फोन नंबर मिळवण्याचे आणि त्यांच्या डिव्हाइसमध्ये घुसखोरी करण्याचे प्रयत्नही झाले.
An Israeli ad-tech firm helped deploy spyware through “zero-click” online ads targeting devices used by Al Jazeera and other organisations, a Citizen Lab investigation prompted by Al Jazeera’s own findings has revealed. 🔗 https://t.co/dG1enFdJ9j https://t.co/Xe33Obvjnq — Al Jazeera English (@AJEnglish) October 15, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh: नवरात्रीच्या काळात बांगलादेशात मंदिरासमोर चिथावणीखोर कृत्य; मंदिरासमोर गायी कापून शिजवल्याचा गंभीर आरोप
‘या’ वादग्रस्त कंपनीशी जोडला गेला
या जाहिरात नेटवर्कचा थेट संबंध इस्रायली स्पायवेअर बनवणाऱ्या ‘कॅंडिरू’ (Candiru) या वादग्रस्त कंपनीशी जोडला गेला आहे. अमेरिकेने २०२१ मध्येच कॅंडिरूवर निर्बंध लादले होते. सिटिझन लॅबने दिलेल्या माहितीनुसार, २०२४ ते २०२५ दरम्यान प्रसिद्ध कतारी वृत्तवाहिनी ‘अल जझीरा’ (Al Jazeera) च्या तब्बल ४५ विंडोज संगणकांमध्ये डिस्कव्हर-टेकच्या जाहिरातींच्या माध्यमातूनच कॅंडिरूचे स्पायवेअर सोडण्यात आले होते. या उघडकीस आलेल्या घटनेनंतर गूगल आणि इतर प्रमुख जाहिरात नेटवर्क प्लॅटफॉर्म्सनी डिस्कव्हर-टेकवर बंदी घालण्याची कारवाई सुरू केली आहे.