Israel Iran War G7 countries strongly support Israel Warned to reduce Iran's nuclear power
Israel Iran War News Marathi : ओटावा : इराण आणि इस्रायलमधील युद्ध गेल्या पाच दिवसापासून सुरु आहे. यामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले जात आहे. याच दरम्यान कॅनडात सुरु असेलेल्या G-7परिषदेने इराणला कडक इशारा दिला आहे. शिखर परिषदेतील देशांनी यासंबंधी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात इराणने इस्रायलवरील हल्ले न थांबवल्यास त्यांना कधीच अण्वस्त्रे बनवून दिले जाणार नाही असे म्हटले आहे. या परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील उपस्थित लावली आहे. तसेच भारताचे पंतप्रधान नेरंद्र मोदी देखील कॅनडाला शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहे.
G-7 शिखर परिषदेच्या नेत्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “इस्रायलला त्यांचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे. आम्ही इस्रायलला यासाठी पाठिंबा देतो. तसेच इस्रायली नागरिकांच्या सुरक्षा महत्त्वाची असल्याचे या परिषदेच्या नेत्यांनी म्हटले आहे. तसेच मध्य पूर्वेत प्रादेशिक अस्थिरता आणि दहशतवादाचे प्रमुख कारण इराण असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. यामुळे इराणला अण्वस्त्रे बनवण्याची परवानगी नाही असा कडक इशारा g-7 परिषदेच्या नेत्यांनी तेहरानला दिला आहे.
याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासह G-7च्या नेत्यांनी मध्य पूर्वेतील सुरु असलेल्या संघर्षासाठी इराणला जबाबदार धरले आहे. इराणचा प्रश्न सुटला तर तणाव कमी होईल असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. तसेच यामध्ये गाझातील युद्धबंदीवरही चर्चा करण्यात आली आहे. G-7 च्या देशांनी इस्रायलला पाठिंबा दिला आहे. यामध्ये अमेरिका, कॅनडा, जपान, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन आणि इटली या देशांचा समावेश आहे.
याचवेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंचे देखील खळबळजनक विधान समोर आली आहे. नेतन्याहूंन इराण-इस्रायलमधील संघर्ष अयातुल्ला खामेनींच्या हत्येने संपेल असे त्यांनी म्हटले आहे. अयातुल्ला खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते आहेत. सध्या इस्रायल खामेनींच्या हत्येचा कट रचत असल्याचे म्हटले जात आहे.
१३ जून रोजी इस्रायलच्या हल्ल्याने सुरु झालेले हे युद्ध गेले पाच दिवस झाले सुरु आहे. इस्रायलने इराणच्या आण्विक तळांवर हल्ला केला, तसेच अनेक आण्विक मुख्यालयांवर, लष्करी कमांड सेंटर्सवरही हल्ला केला. यामध्ये इराणचे अनेक उच्च लष्करी अधिकारी ठार झाले. यानंतर इराणने देखील इस्रायलवर हल्ला करण्यास सुरुवात केली. सध्या दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहे. या युद्धात आतापर्यंत २२४ इराण नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर १२०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर २४ इस्रायली नागरिकांचा मृत्यू आणि ५०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.