खामेनेईवर हल्ल्याचा प्रयत्न फसला,मात्र रेंजमध्ये असते तर ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा खळबळजनक दावा
Israel Iran war news marathi : तेहरान : इराण आणि इस्रायलमधील संघर्ष सध्या शिगेला पोहोचला आहे. आता या युद्धात अमेरिका देखील हस्तक्षेपण करताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बिनशर्त आत्मसमर्पणाचा इशारा दिला होता.याला इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. इराणी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अयातुल्ला खामेनी यांनी स्पष्ट केले आहे की, अमेरिकेने हस्तक्षेप केला तर यामुले त्यांनी गंभीर परिणामांना समोरे जावे लागले. त्यांच्या या विधानाने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्यांच्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी UNCONDITIONAL SURRENDER एवढे दोन शब्द लिहिले होते. याचा अर्थ कोणत्याही अटींशिवाय आत्मसमर्पण करणे होते. हा अमेरिका आणि इस्रायला इराणला थेट इशारा मानाला जात होता.तसेच खामेनी कुठे लपून बसले आहे, हेही ट्रम्प यांना माहित असल्याचे त्यांनी म्हटवे होते. मात्र खामेनींची हत्या करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नसल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते.
— Donald J. Trump (@realDonaldTrump) June 17, 2025
दरम्यान ट्रम्प यांच्या या धमकीला अयातुल्ला खामेनी यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहेत. ट्रम्प यांना इराणचा इतिहास माहिती, यामुळेच ते अशा धमक्या देत आहे. परंतु आम्ही त्यांच्या या धमक्यांना घाबरणार नाही. इराण कोणापुढेही झुकणार नाही. तसेच कोणत्याही लादलेल्या शांतता कराराला स्वीकारणार नाही.
खामेनी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यापोस्टमध्ये त्यांनी अमेरिकेला माहित असले पाहिजे की, त्यांच्या हस्तक्षेपामुळे त्यांचे गंभीर नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांनी इस्रायलसोबतच्या युद्धात ढवळाढवळ करु नये.
افراد باخردی که #ایران و ملت و تاریخ ایران را میشناسند هیچگاه با زبان تهدید با این ملت سخن نمیگویند زیرا ملت ایران تسلیمشدنی نیست
و آمریکاییها بدانند هرگونه ورود نظامی آمریکا #بدون_تردید با صدمه جبرانناپذیر همراه خواهد بود.— KHAMENEI.IR | فارسی 🇮🇷 (@Khamenei_fa) June 18, 2025
याशिवाय, खामेनी यांनी इराणी जनतेचे युद्धाच्या पुरिस्थितीत संयम आणि धाडसी राहणे राष्ट्राच्या ताकदीसाठी कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सर्व नागरिकांना एकत्र राहण्याचे आवाहान केले आहे. तसेच शहीदांचे रक्त व्यर्थ जाणारा नाही असेही त्यांनी म्हटले आहे.