Iran News : "ते घाबरलेल्या उंदरासारखे लपून बसलेत.." ; इराणचे सर्वोच्च नेते खामेनींवर प्रिन्स रझा पहलवींची जहरी टीका (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Iran Israel War news marathi : इराण आणि इस्रायलमधील युद्ध सध्या तीव्र झाले आहे. दोन्ही देश एकमेकांना नष्ट करण्याच्या धमक्या देत आहेत. अशातच इराणमध्ये देखील अंतर्गत राजकारण सुरु आहे. इराणचे निर्वासित युवराज रझा शाह पहलवी यांनी खामेनींविरोधी तीव्र टीका केली आहे. तसेच त्यांनी इराणमध्ये इस्लामिक राजवटीचा अंतर जवळ असल्याचेही म्हटले आहे. दरम्यान त्यांनी सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्यावर तीव्र टीका केली असून सध्याच्या परिस्थितीवरील नियंत्रण त्यांनी गमावले असल्याचे म्हटले आहे.
इस्रायलचे हल्ले सुरु झाल्यापासून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी त्यांच्या कुटुंबासह भूमिगत झाले आहेत. सध्या इस्रायलचे इराणवरील हल्ले सुरु असताना अशा परिस्थितीत लोकांना दिलासा देण्याऐवजी खामेनी जीव वाचण्यावण्यासाठी बिळात लपून बसले असल्याचे पहलवी यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, खामेनींना त्यांच्या लोकांची काळजी नाही, ते केवळ त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा विचार करत आहेत. त्यांना सध्याच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आले आहे. घाबरलेल्या उंदरासारखे ते भूमिगत झाले आहेत. अशी तिखट शब्दात रझा पहलवी यांनी खामेनींवर टीका केली आहे.
राजकुमार रझा पहलवी यांनी इराणी नागरिकांना एक येऊन इस्लामिक राटवटीचा अंत करण्याचे आवाहान केले आहे. तर इराणला उज्ज्वल भविष्य पाहता येईल. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश जारी केली आहे. या व्हिडिओत त्यांनी इस्लामिक राजवटीचा अंत जवळ अल्याचे म्हटले आहे. या विरोधात लोकांना पुढे येण्याचे आवाहन रझा पहलवी यांनी केले आहे. रझा शाह यांनी देशाच्या अनेक भागांतील नागरिकांना इस्लामिक राजवटीविरोधात रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी इराणच्या पुनर्जन्माची वेळ आली असल्याचे म्हटले आहे.
My Fellow Countrymen,
The Islamic Republic has reached its end and is in the process of collapsing. Khamenei, like a frightened rat, has gone into hiding underground and has lost control of the situation. What has begun is irreversible. The future is bright, and together, we… https://t.co/XEyL5IM05t
— Reza Pahlavi (@PahlaviReza) June 17, 2025
प्रिन्स रझा यांनी इराणच्या लष्करी, कायदा अंमलबजावणी गलांना सुरक्षा रक्षकांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना देखील इस्लामिक राजवटीपासून दूर राहण्याचे आवाहनI केले आहे. त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना अयातुल्ला खामेनींसाठी नव्हे तर, इराणच्या सामान्य नागरिकांसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. जनतेसाठी सर्व सरकारी आणि सुरक्षा कर्मचारी पुढे आले, तर इराणचे उज्वल भविष्य घडवता येईल असे रझा पहलवी यांनी म्हटले आहे.