
Mossad Behind Iran Protest
द जेरुसेलम पोस्टने दिलेल्या अहवालानुसार, इस्रायली गुप्तचर संस्था मोसादने आपल्या एजंट्सना इराणच्या नागरिकांना हिंसाचारासाठी भडकवण्याचे आणि निदर्शने नियंत्रित करण्याचे प्रशिक्षण दिले होते असे आहे. परंतु मोसादकडून अशा कृत्याची ही पहिलची वेळ नाही. मोसादने इराणमध्ये अनेक गुप्तचर कारवाया राबवल्या आहे. सोशल मीडियावरील एका अहवालात सांगण्यात आले आहे की, सुरक्षा दलांनी निदर्शनांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन ते इस्रायली समर्थक चॅनलला पाठले होते. सध्या या लोकांना अटक करण्यात आली असून इराणी सरकारने त्यांना देशद्रोही ठरवले आहे.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी यापूर्वी ९ जानेवारी २०२६ रोजी एक निवेदन जारी केले होते. या निवेदनात इस्रायल आणि अमेरिकेवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी म्हटले होते की, अमेरिकेची गुप्तचर संस्था आणि इस्रायली गुप्तचर संस्था मोसाद यांच्या आदेशावरुन इराणमध्ये आंदोलन भडकवले जात आहे. यावेळी खामेनेई यांनी इस्रायल आणि अमेरिकेला मिशिदींना नुकसान पोहचवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा थेट इशारा दिला होता.
Iranian police have arrested the Mossad backed criminals of the riots in Abadan city, Khuzestan province. The Mossad assets stated: “I was tricked and fooled, I’m deeply sorry.” The judiciary will show no leniency says the report, as they had been warned since 3 days ago and… https://t.co/wD4Z7Lhy2X pic.twitter.com/uKkE4YrOc5 — Truth_teller 🇷🇺 (@Truthtellerftm) January 10, 2026
दरम्यान इराणी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खामेनेई सरकारविरोधात आंदोलन भडकवण्यासाठी मोसादची मदत करणाऱ्या देशद्रोहींना पकडण्यात आले आहे. आतापर्यंत १० हून अधिक एजंट्सना अटक करण्यात आली आहे. या लोकांवर मोसादला नकाशे आणि इराणमधील आंदोलनाचे व्हिडिओ पाठवल्याचा आरोप आहे. सरकारने एका मोसाद एजंटला फाशी देखील दिली आहे.
Mike Pompeo says Mossad agents are behind the Iran protests pic.twitter.com/FZYUeyB3Oh — UFHealth Whistleblower Kathleen Maynard 🇵🇸Ⓥ (@IhoPwaitress74) January 9, 2026
याच वेळी आणखी एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये इराणच्या तेहरान येथील फॉरेन्सिक सेंटरबाहेर शेकडो मृतदेहांच्या बॉडी बॅग्स पडलेल्या दिसत आहे. लोक मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी इकडे-तिकडे पडत आहे. कोणी आक्रोश करताना, तर कोणी रागात दिसत आहे.
इराणशी मैत्री पडणार महागात? ट्रम्पच्या ‘या’ आदेशामुळे भारतावर ७५% टॅरिफची टांगती तलवार
Ans: इराणमध्ये सुरु असलेल्या निदर्शनांसाठी मोसादला जबाबदार धरण्यात आले आहे. इराणने आरोप केला आहे की, मोसादच्या एजंट्सने इराण जनतेला सरकारविरोधी भडकवण्याचे आणि हिंसाचार पसरवण्याचे कार्य केले आहे.
Ans: खामेनेई सरकारविरोधात आंदोलन भडकवण्यासाठी मोसादची मदत करणाऱ्या १० हून अधिक देशद्रोहींना पकडण्यात आले आहे. तर एका एजंटला फाशी देण्यात आली आहे.