Iran Protest : इराणमध्ये रक्तरंजित दडपशाही! रस्त्यावर शेकडो मृतदेह, आंदोलकांच्या हत्येच भयावह चित्र उघड, VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
World War 3 : युद्धाचा बिगुल वाजला? ट्रम्पच्या ‘या’ आदेशाने उडाली खळबळ, इराणवर बॉम्बहल्ल्याचे संकेत
इराणमध्ये सरकारने ८ जानेवारी २०२६ पासून वाढत्या आंदोलनामुळे देशभरात फोन आणि इंटरनेट सुविधा बंद ठेवल्या आहे. यामुळे अधिकृत माहिती मिळणे कठीण झाले आहे. परंतु सोशल मीडियावर या हिंसक आंदोलनाचे, सुरक्षा दलांच्या गोळीबाराचे काही व्हिडिओ पाहायला मिळत आहे. याच वेळी एक धक्कादायक वास्तवाचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये इराणची राजधानी तेहरान येथे रस्त्यांवर बॉडी बॅग्स पडलेल्या दिसत आहेत. हा धक्कादाकय वास्तवाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या व्हिडिओंमध्ये तुम्ही पाहू शकता की शेकडो मृतदेह काळ्या बागांमध्ये भरलेले दिसत आहे. लोक आपल्या नातेवाईकांची ओळख पटवत आहेत. नागरिकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एक व्यक्ती मृतदेहाला बिलगून रडाताना दिसत आहे. महिला आक्रोश करताना दिसत आहेत. काही लोका रागात दिसत आहेत. तेहरानजवळील कहरिझाक कॉरेन्सिक मेडिकल सेंटरबाहेर मोठ्या प्रमाणात मृतदेहांची रांग लागली आहे. आंदोलकांवर सरकारी कारवाईचा विदारक परिणाम झाला आहे.
Body bags are piling up in Teheran! We will remember the bravery of the Iranian people and the cowards in position of power around the world who failed to defend them. pic.twitter.com/RZFQz7MZzd — Roman Baber (@Roman_Baber) January 11, 2026
का सुरु होते आंदोलन?
गेल्या काही काळात इराणमध्ये महागाईने उच्चांक गाठला आहे. इराणचे चलन रियाल इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत ढासाळले आहे. यामुळे जीवानावश्य वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. या विरोधात दोन आठवड्यांपूर्वी हे आंदोन सुरु झाले होते. मानवाधिका संघटनांच्या आरोपांनुसार, या आंदोलनात सुरक्षा दलांच्या कारवाईत ६०० लोकांचा बळी गेला आहे. परंतु अद्याप याची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. दरम्यान या आंदोलनासाठी सरकारने अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले आहे.
Iran Protest : इराणमध्ये रक्ताचा सडा! 500 हून अधिक आंदोलकांचा बळी, खामेनेई सरकारविरोधात जनक्षोभ
https://t.co/z1Tqc0CPpK — Afshine Emrani MD FACC (@afshineemrani) January 11, 2026






