3 major shocks to Israel in 24 hours, from supreme court shin bet conflict and britain europe
जेरुसेलम: सध्या इस्रायलचे गाझामध्ये हल्ले सुरुच आहेत. यामुळे गाझातील लाखो लोकांना मानतावादी मदत थांबवली आहे. लाखो लोकांवर उपासमारीचे दिवस आले आहेत. यामुळे जगभरतानू इस्रायलच्या गाझातील कारवायांना विरोध केला जात आहे. यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू चिंतेत आहे. याच वेळी नेतन्याहूंना गेल्या २४ तासांत तीन मोठे धक्के बसले आहेत. यामुळे इस्रायलच्या आंतरराष्ट्रीय विश्वासार्हतावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
याच वेळी सर्वोच्च न्यायालय, ब्रिटन, फ्रान्स आणि इटलीकडून इस्रायलला मोठा झटका मिळाल आहे. ब्रिटनने इस्रायलसोबतचा मुक्त व्यापार करार थांबवला आहे, तर फ्रान्स आणि इटलीने इस्रायल कडक शब्दात सुनावले आहे. यामुळे नेतन्याहू यांच्या हट्टीपणामुळे आणि गाझातील लष्करी कारवायांमुळे देशांतर्गत आणि परदेशातून त्यांना विरोध केला जात आहे. या २४ तासांत नेमकं काय काय घडलं हे जाणून घेऊयात.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायलच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख शिन बेट रोनने यांना त्यांच्या पदावरुन हटवले. परंतु नेतन्याहूंना असे करणे चांगलेच महागात पडले आहे. गुप्तरचर यंत्रणेत नेतन्याहूंनी हस्तक्षेप केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. न्यायालयाने नेतन्याहूंनी निर्णय चुकीचा आणि बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने म्हटले की, रोनेन बार यांना काढून टाकण्याचा निर्णय चुकीचा आहे आणि कोणत्याही ठोस पुरावे नाहीत. तसेच नेतन्याहूंच्या सल्लागार कार्याने रोनेन बार यांना त्यांची बाजू मांडण्याची देखील संधी दिली नाही. यामुळे न्यायालयाने नेतन्याहूंच्या सल्लागार कार्यलायवार चौकशीचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने हा एक राजकीय राग असल्याचे म्हटले आहे.
नेतन्याहूंनी दुसरा मोठा धक्का म्हणजे, ब्रिटनने इस्रायलसोबत सुरु असलेला मुक्त व्यापाराची चर्चा थांबवली आहे. तसेच इस्रायलवर निर्बंधही लादले आहेत. ब्रिटनने इस्रायलला गाझातील कारवाया थांबवण्यास सांगितले आहे. ब्रिटनच्या परराष्ट्र मत्री डेव्हिड लॅमी यांनी इस्रायलच्या गाझातील कारवायांनी मर्यादा ओलांडली असल्याचे म्हटले आहे. यामुळे गाझातील लोकांवर उपासमारीचे दिवस आले आहेत. यावर ब्रिटनने चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनवे वेस्ट बॅंकमधील बेकायदेशीर ज्यू वसहतींवर निर्बंध लादले आहेत.
इस्रायली सैन्याने युरोपियन राजदूतांच्या वेस्ट बॅंक भेटीदरम्यान गोळीबार केला होता. यामध्ये फ्रेंच राजदूत थोडक्यात वचावले होते. या घटनेने फ्रान्समध्ये संतापाचा वातावरण होते. फ्रान्सने इस्रायलच्या या कृतीला अस्वीकार्य म्हटले. तसेच इटलीने देखील विरोधी भूमिका घेतली आणि इस्रायलकडून घटनेवर स्पष्टीकरण मागितले आहे. सध्या जगभरातून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंविरोधात आक्रोश वाढत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- गाझातील नरसंहारामुळे ब्रिटन अवस्थ; इस्रायलसोबत थांबवली मुक्त व्यापार करारावरील चर्चा