ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
लंडन: इस्रायलचा गाझामध्ये नसंरहार सुरुच आहे. इस्रायली सैन्य गाझात सतत लष्करी कारवाया करत आहे. यामुळे गाझात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने एक मोठा निर्णय घेतला आहे. ब्रिटनने इस्रायलच्या गाझातील नरसंहारामुळे इस्रायलसोबतचा मुक्त व्यापार करारावरील चर्चा थांबवली आहे. तसेच इस्रायलवर अनेक निर्बंध देखील लादण्यात आले आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांनी गाझातील परिस्थितीचे असह्य वर्णन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, गाझातील लोकांसाठी युद्धबंदी लागू व्हावी आणि त्यांना मानतवादी मदत पोहोचवण्यात यावी. तसेच इस्रायलने गाझातील कारवाया थांबवाव्यात. तरच ब्रिटन इस्रायलसोबतची मुक्त व्यापार करारा चर्चा पुढे नेईल. इस्रायलने मार्चमध्ये गाझात भू-मार्गी लष्करी कारवाया सुरु केल्या. हमास संघटनेचा खात्मा करण्याच्या उद्देशाने या कारावाय सुरु करण्यात आल्याचे इस्रायलने म्हटले आहे. परंतु यामुळे इस्रायलमधील अनेक लोकांचा बळी गेला आहे. तसेच पीडित लोकांपर्यंत मानवतावादी मदत पोहोचण्यास अडचणी येत आहेत.
ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांनी म्हटले की, इस्रायलच्या कारवायामुळे गाझात तणाव वाढत चालला आहे. लोकांपर्यंत मानतावदी मदत पोहोचण असह्य झाले आहे. यामुळे आम्हाला चिंता वाट आहे. आम्ही पुन्हा एकदा युद्धबंदीची मागणी करतो. इस्रायलला आपल्या ओलिसींना सोडवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. त्यांनी गाझातील लोकांना मानतवादी मदत पोहोचवण्याची गरज देखील अधोरेखित केली.
त्यांच्या या विधानानंतर ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांनी संसदेला पश्चिम किनाऱ्यावरी पॅलेस्टिनी समुदायांविरुद्ध हिंसाचार करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांवर निर्बंधांची घोषणा केली. डेव्हिड लॅमी यांनी म्हटले की, वेस्ट बॅंकमध्ये राहणाऱ्या कट्टरपंथी इस्रायलन गटाकडून नरसंहार होत आहे. यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. याची जबाबदारी इस्रायल सरकारची आहे. जर इस्रायल कट्टरपंथी इस्रायली गटांविरोधात कारवाई करण्यास अपयशी ठरले तर पलेस्टिनी समुदाय आणि द्वि-राज्य उपाय यांना धोका निर्माण होईल.
याशिवाय ब्रिटनने हमासला देखील सर्व इस्रायली कैद्यांना तात्काळ सोडण्याचा इशार दिला आहे. स्टार्मर यांनी कोणत्याही अटींशिवाय, हमासने ओलिसांची सुटका करावी असे म्हटले आहे. त्यांनी सांगितले आहे की, हमास गाझावर राज्य करु शकत नाही.
दरम्यान इस्रायलने ब्रिटनच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे की, हमास पूर्णत: नष्ट होत नाही तोपर्यंत इस्रायल आपल्या कारवाया थांबवणार नाही. तसेच कोणत्याही बाह्य दबावाला आम्ही बळी पडणार नाही, असेही इस्रायलने म्हटले आहे.
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ५० हजाराहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. तर १ लाखाहून अधिक लोक जखमी आहेत. गेल्या २४ तासांतील इस्रायलच्या कारवाईमुळे ८७ जणांचा मृत्यू तर २९० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.