Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Attacks Iran: युद्ध पेटले! इस्रायलचा इराणवर विध्वंसक युद्धजन्य हल्ला; तेहरानमध्ये स्फोटांची मालिका अन् आकाशात धुराचे लोट

srael Attacks Iran: इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी इराणवर 'प्रतिबंधात्मक हल्ला' केल्याची पुष्टी केली आहे. तेहरानमध्ये अनेक स्फोट झाल्याची नोंद झाली आहे. अमेरिका-इराण अणु चर्चेदरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 28, 2026 | 12:37 PM
israel preemptive strike iran tehran explosions nuclear talks crisis

israel preemptive strike iran tehran explosions nuclear talks crisis

Follow Us
Close
Follow Us:
  • तेहरान हादरले
  • चर्चा फिसकटली
  • युद्धाचा भडका

Israel attack on Iran Tehran 2026 news : पश्चिम आशियातील तणावाने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास इस्रायलने (Israel) इराणच्या ( Iran) राजधानीवर, म्हणजेच तेहरानवर एक मोठा “प्रतिबंधात्मक हल्ला” (Preemptive Strike) चढवला आहे. या हल्ल्यानंतर तेहरानमधील वातावरण अत्यंत दहशतीचे बनले असून संपूर्ण शहरात स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी अधिकृतपणे या लष्करी कारवाईची पुष्टी केली असून, ही कारवाई इराणच्या संभाव्य धोक्याला रोखण्यासाठी करण्यात आल्याचे म्हटले आहे.

तेहरानमध्ये रक्ताचा सडा आणि धुराचे लोट

स्थानिक प्रत्यक्षदर्शी आणि इराणी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तेहरानच्या मध्यवर्ती भागात किमान तीन ते चार प्रचंड मोठे स्फोट झाले. या स्फोटांची तीव्रता इतकी मोठी होती की आजूबाजूच्या परिसरातील घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. आकाशात धुराचे काळे लोट पसरले असून इराणी हवाई संरक्षण यंत्रणा (Air Defense System) सक्रिय झाल्याचे दिसत आहे. मात्र, अद्याप इराण सरकारने जीवितहानी किंवा मालमत्तेच्या नुकसानीचा कोणताही अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pak-Afghan War: तालिबानचा पाकिस्तानवर ‘ड्रोन’ स्ट्राइक! अबोटाबाद, नौशेरा लष्करी तळ धडाधडले; रणांगणाचे LIVE VIDEO VIRAL

अणू चर्चेच्या तोंडावर इस्रायलचा ‘मास्टरस्ट्रोक’?

विशेष म्हणजे, हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा इराण आणि अमेरिका यांच्यात अणू कार्यक्रमाबाबत अत्यंत संवेदनशील वाटाघाटी सुरू होत्या. स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे गुरुवारी चर्चेची तिसरी फेरी पार पडली आणि आज चौथी फेरी होणार होती. मात्र, राजनैतिक चर्चा सुरू असतानाच इस्रायलने केलेल्या या हल्ल्यामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला “खूप कठीण आणि धोकादायक देश” असे संबोधले होते, त्यानंतर लगेचच ही कारवाई झाल्याने अमेरिकेचा याला छुपा पाठिंबा असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

ISRAEL LAUNCH ‘PRE-EMPTIVE STRIKE’ ON TEHRAN — RT EXCLUSIVE FOOTAGE RT pic.twitter.com/5X9jy92x3t — Moh Musthafa Hussain (@musthafaaa) February 28, 2026

credit – social media and Twitter

इस्रायलमध्ये सायरनचा थरकाप आणि अमेरिकेची माघार

हल्ला केल्यानंतर इस्रायलने आपल्या नागरिकांसाठी “सक्रिय इशारा” जारी केला आहे. इराणकडून कोणत्याही क्षणी क्षेपणास्त्रांचा पाऊस पडू शकतो, या भीतीने संपूर्ण इस्रायलमध्ये सायरन वाजवून लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने शुक्रवारी रात्रीच इस्रायलमधील आपल्या दूतावासातील अनावश्यक कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच अमेरिकेने ही खबरदारी घेतल्याचे मानले जात आहे.

🇮🇱💥 Israel launches a “preemptive attack” on Iran. Explosions reported as geopolitics collide with markets $100M+ in crypto longs liquidated in just 15 minutes. War fears = instant volatility.#Israel #Iran #BreakingNews #CryptoCrash pic.twitter.com/x6PkM2twCl — Sharn | On-Chain & Macro (@brarsharn01) February 28, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Europe Nuclear Umbrella: अमेरिकेने साथ सोडली तरी भारताचा ‘हा’ मित्र देश जगाला वाचवणार; युरोपला पुरवणार अणुबॉम्बची छत्री

प्रादेशिक युद्धाची भीती

पश्चिम आशिया आधीच गाझा आणि लेबनॉनमधील संघर्षामुळे पेटलेला आहे. आता इस्रायल आणि इराण हे दोन बलाढ्य देश समोरासमोर आल्याने या संघर्षाचे रूपांतर महायुद्धात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराण आता या हल्ल्याचा बदला कसा घेतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कच्च्या तेलाच्या किमती आणि जागतिक अर्थव्यवस्थेवरही या युद्धाचे भीषण सावट पसरले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इस्रायलने इराणवर हल्ला का केला?

    Ans: इस्रायलच्या मते, इराणकडून होणारे संभाव्य धोके आणि अणू कार्यक्रमातील प्रगती रोखण्यासाठी हा 'प्रतिबंधात्मक' (Preemptive) हल्ला करण्यात आला आहे.

  • Que: या हल्ल्याचा अणू चर्चेवर काय परिणाम होईल?

    Ans: अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेली राजनैतिक चर्चा या हल्ल्यामुळे पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तणाव अधिक वाढेल.

  • Que: तेहरानमधील स्फोटांची तीव्रता किती आहे?

    Ans: स्थानिक रिपोर्टनुसार, तेहरानच्या मध्यवर्ती भागात किमान तीन मोठे स्फोट झाले असून शहरात धुराचे लोट दिसत आहेत, मात्र अधिकृत नुकसान अद्याप स्पष्ट नाही.

Web Title: Israel preemptive strike iran tehran explosions nuclear talks crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 12:37 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Iran-Israel War
  • World War 3

संबंधित बातम्या

Pak-Afghan War: तालिबानचा पाकिस्तानवर ‘ड्रोन’ स्ट्राइक! अबोटाबाद, नौशेरा लष्करी तळ धडाधडले; रणांगणाचे LIVE VIDEO VIRAL
1

Pak-Afghan War: तालिबानचा पाकिस्तानवर ‘ड्रोन’ स्ट्राइक! अबोटाबाद, नौशेरा लष्करी तळ धडाधडले; रणांगणाचे LIVE VIDEO VIRAL

Afganistan vs Pakistan War: लष्कर आणि शस्त्रांस्त्रांच्या बाबतीत कुणाची ताकद सर्वात जास्त?
2

Afganistan vs Pakistan War: लष्कर आणि शस्त्रांस्त्रांच्या बाबतीत कुणाची ताकद सर्वात जास्त?

PakAfgWar: युद्धाचा भडका! अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर सर्वात मोठा हवाई हल्ला; इस्लामाबाद, अबोटाबाद हादरले, लष्करी तळांवर बॉम्बवर्षाव
3

PakAfgWar: युद्धाचा भडका! अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर सर्वात मोठा हवाई हल्ला; इस्लामाबाद, अबोटाबाद हादरले, लष्करी तळांवर बॉम्बवर्षाव

Pak-Afg War: ‘असीम मुनीर अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचणारा…’ सोशल मीडियावर जनतेकडून पाकिस्तानी लष्कराची खरडपट्टी
4

Pak-Afg War: ‘असीम मुनीर अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचणारा…’ सोशल मीडियावर जनतेकडून पाकिस्तानी लष्कराची खरडपट्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.