Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्राइलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांचा पंतप्रधान मोदींना फोन, युद्ध सुरु असताना साधला संवाद

भारतातील इस्राइलचे राजदूत नाओर गिलॉन यांनी सांगितलं होतं की, आम्हाला भारताच्या भक्कम पाठिंब्याची गरज आहे. भारत हा एक प्रभावशाली देश आहे. तो दहशतवादाचे आव्हान समजून घेतो.

  • By साधना
Updated On: Oct 10, 2023 | 07:04 PM
netyanyahu and modi

netyanyahu and modi

Follow Us
Follow Us:

इस्राइल आणि पॅलेस्टाईनमधील हमास दहशतवादी यांच्यात चार दिवसांपासून युद्ध चालू आहे. या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूचे सुमारे 1600 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर 7 हजारपेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. दरम्यान मध्य पूर्वेतील अनेक मुस्लीम राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवलाय. अमेरिका आणि युरोपातील काही देश इस्रायलच्या बाजूने उभे आहेत. भारतानेही इस्राइलच्या बाजूने भूमिका घेतली आहे. याच दरम्यान इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला आहे.

I thank Prime Minister @netanyahu for his phone call and providing an update on the ongoing situation. People of India stand firmly with Israel in this difficult hour. India strongly and unequivocally condemns terrorism in all its forms and manifestations. — Narendra Modi (@narendramodi) October 10, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स (आधीचे ट्विटर) या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. पंतप्रधान मोदींनी लिहिलं आहे की,इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी मला फोन करून तिथल्या परिस्थितीबद्दल सांगितलं आहे. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. या बिकट परिस्थितीत आम्ही भारतीय लोक इस्राइलच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत. भारत अशा दहशतवादी कृत्यांचा तीव्र निषेध करत आहे.

दरम्यान, भारत आणि इस्राइल यांच्यात चांगले संबंध आहेत. इस्राइलने पंतप्रधान मोदी यांच्या समर्थनासाठी आभार मानले आहेत. हमास दहशतवादी संघटनेने इस्राइलवर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात आधी पुढे येत याचा निषेध केला होता.

भारतातील इस्राइलचे राजदूत नाओर गिलॉन यांनी सांगितलं होतं की, आम्हाला भारताच्या भक्कम पाठिंब्याची गरज आहे. भारत हा एक प्रभावशाली देश आहे. तो दहशतवादाचे आव्हान समजून घेतो. भारताला या संकटाचीही चांगली जाणीव आहे. यावेळी हे महत्वाचं आहे की, आमच्या युद्ध क्षमतेमुळे आम्ही हमासचे अत्याचार चालू ठेवू शकणार नाही.

दरम्यान हमासने 150 पेक्षा जास्त इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवल्याचे वृत्त येत आहे. इस्राइलच्या प्रतिहल्ल्यानंतर हमासची पिछेहाट झालीआहे. गाझा पट्टीचा काही भाग इस्राइलच्या सैन्याने आपल्या ताब्यात घेतला आहे.

Web Title: Israel prime minister phone call to prime minister narendra modi nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2023 | 07:02 PM

Topics:  

  • india
  • international news
  • Israel
  • narendra modi

संबंधित बातम्या

Przewalski Horse : कझाकस्तानमध्ये 200 वर्षांनंतर गवताळ प्रदेशात जन्मला दुर्मिळ घोडा; जागतिक पर्यावरण जगतात आनंद
1

Przewalski Horse : कझाकस्तानमध्ये 200 वर्षांनंतर गवताळ प्रदेशात जन्मला दुर्मिळ घोडा; जागतिक पर्यावरण जगतात आनंद

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा

Jewar Airport ला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव! योगी सरकारचा मोठा निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत ३९ प्रस्तावांना मंजुरी
3

Jewar Airport ला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव! योगी सरकारचा मोठा निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत ३९ प्रस्तावांना मंजुरी

अभिमानास्पद! इस्राइल व अमेरिकेकडून Captain Smit Machhar यांचा होणार नागरी शौर्य सन्मान
4

अभिमानास्पद! इस्राइल व अमेरिकेकडून Captain Smit Machhar यांचा होणार नागरी शौर्य सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.