Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jewar Airport ला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव! योगी सरकारचा मोठा निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत ३९ प्रस्तावांना मंजुरी

Jewar Airport Name Change : उत्तर प्रदेशातील नोएडा येथील जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सार्वजनिक सेवेतील २५ वर्षांच्या प्रवासानिमित्त हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 09, 2026 | 06:17 PM
जेवर विमानतळाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव! योगी सरकारचा मोठा निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत ३९ प्रस्तावांना मंजुरी

जेवर विमानतळाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव! योगी सरकारचा मोठा निर्णय; मंत्रिमंडळ बैठकीत ३९ प्रस्तावांना मंजुरी

Follow Us
Follow Us:
  • नोएडाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळणार मोदींचे नाव
  • सार्वजनिक सेवेच्या २५ वर्षांनिमित्त योगी सरकारचा निर्णय
  • उत्तर प्रदेश सरकारची मोठी घोषणा!
Jewar Airport Name Change : उत्तर प्रदेशातील नोएडा येथील जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने या विमानतळाचे नामकरण करण्याच्या प्रस्तावाला उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर यासंदर्भात घोषणा केल्याचे सांगण्यात येत आहे.

सार्वजनिक सेवेच्या २५ वर्षांनिमित्त निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक पदावरील सेवेची २५ वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. योगी आदित्यनाथ यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदी यांनी सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्माण यांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण केल्याचेही त्यांनी नमूद केले.

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचा मुद्दा आता थेट राष्ट्रपती भवनात! राहुल गांधी, ममता बॅनर्जींसह इतर खासदार घेणार राष्ट्रपतींची भेट

मंत्रिमंडळ बैठकीत ३९ प्रस्तावांना मंजुरी

उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण ३९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन या निर्णयांची माहिती दिली. या वेळी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक आणि सहयोगी पक्षांचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांच्या सार्वजनिक सेवेतील २५ वर्षांच्या प्रवासाबद्दल उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने अभिनंदनाचा प्रस्तावही मंजूर केल्याचे सांगण्यात आले.

उत्तर प्रदेशात ४२ नवीन महामार्गांची उभारणी

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील विकासकामांचाही आढावा घेतला. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात ४२ नवीन महामार्गांची उभारणी झाल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वयामुळे उत्तर प्रदेशात पायाभूत सुविधांचा विकास वेगाने होत असल्याचा दावाही त्यांनी केला.

२८ मार्च रोजी जेवर विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मार्च २०२६ रोजी जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. हे विमानतळ एकूण चार टप्प्यांमध्ये विकसित करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासी क्षमतेच्या दृष्टीने ते आशियातील प्रमुख विमानतळांपैकी एक ठरू शकते.

पहिल्या टप्प्यात वर्षाला १.२ कोटी प्रवाशांची क्षमता

जेवर विमानतळाच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ३,३०० एकर जमिनीवर टर्मिनल आणि धावपट्टी विकसित करण्यात आली आहे. या टप्प्यात विमानतळाची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता सुमारे १.२ कोटी असल्याचे सांगण्यात येते. या विमानतळामुळे नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील प्रवाशांना हवाई वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच पर्यटन, उद्योग, व्यापार आणि रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

अभिमानास्पद! इस्राइल व अमेरिकेकडून Captain Smit Machhar यांचा होणार नागरी शौर्य सन्मान

Web Title: Noida jewar international airport to be named after pm narendra modi yogi cabinet decision sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 06:17 PM

Topics:  

  • international airport
  • narendra modi
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

India Mobile Congress 2026: देशाच्या कानाकोपऱ्यात 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य!
1

India Mobile Congress 2026: देशाच्या कानाकोपऱ्यात 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य!

‘क्या यही प्यार है…’, वय 38, प्रियकर अवघ्या 18 वर्षांचा! Instagram वर जडलं प्रेम; 3 मुलांना सोडून महिला पोहोचली प्रियकराकडे
2

‘क्या यही प्यार है…’, वय 38, प्रियकर अवघ्या 18 वर्षांचा! Instagram वर जडलं प्रेम; 3 मुलांना सोडून महिला पोहोचली प्रियकराकडे

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम
3

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम

MSRTC News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढणार; दादर, बोरिवली अन् स्वारगेटहून ST बससेवा
4

MSRTC News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढणार; दादर, बोरिवली अन् स्वारगेटहून ST बससेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.