Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Przewalski Horse : कझाकस्तानमध्ये 200 वर्षांनंतर गवताळ प्रदेशात जन्मला दुर्मिळ घोडा; जागतिक पर्यावरण जगतात आनंद

Przewalski Horse : २०० वर्षांनंतर, जगातील शेवटचा खरा जंगली घोडा कझाकस्तानच्या गवताळ प्रदेशात परतला आहे. यावर्षी २२ ऑगस्टच्या सकाळी, कझाकस्तानच्या स्टेप प्रदेशातील एका वन्यजीव अभयारण्यात, एका ७ वर्षांच्या प्रझेवाल्स्की घोडीने एका शिंगराला जन्म दिला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 10, 2026 | 11:50 AM
Przewalski horse birth Kazakhstan Rare wild horse species Kazakhstan

Przewalski horse birth Kazakhstan Rare wild horse species Kazakhstan

Follow Us
Follow Us:
  • ऐतिहासिक घटना
  • नामशेष होण्यापासून पुनरुज्जीवन
  • पर्यावरणवाद्यांमध्ये आशेचा किरण

निसर्गाच्या चमत्काराची आणि मानवी प्रयत्नांच्या यशाची एक अद्भूत गाथा कझाकस्तानच्या विशाल गवताळ प्रदेशातून समोर आली आहे. सुमारे दोन शतकांनंतर कझाकस्तानच्या मोकळ्या हवेत जगातील एकमेव खऱ्या जंगली घोड्याची (Przewalski’s Horse) दोन लहान शिंगरे जन्मली आहेत. या घटनेने केवळ कझाकस्तानमध्येच नव्हे, तर जगभरातील वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरणप्रेमींमध्ये एका नव्या आशेची ज्योत पेटवली आहे. मानवी हस्तक्षेप, शिकार आणि शेतीमुळे नैसर्गिक अधिवासातून नामशेष मानल्या गेलेल्या या प्रजातीचे पुनरागमनाला मिळालेले हे यश म्हणजे जैवविविधतेच्या रक्षणातील सर्वात मोठा विजय मानला जात आहे.(Przewalski Horse)

मध्य आशियातील अथांग पसरलेल्या गवताळ प्रदेशात एकेकाळी हे घोडे हजारोच्या संख्येने मुक्तपणे संचार करत असत. मात्र, १९व्या शतकाच्या शेवटी त्यांची संख्या वेगाने घटत गेली. १९६९ मध्ये गोबीच्या वाळवंटात हे घोडे शेवटचे नैसर्गिक वातावरणात मुक्तपणे फिरताना दिसले होते. त्यानंतर हे घोडे जंगलातून पूर्णपणे गायब झाले आणि केवळ प्राणिसंग्रहालयांच्या पिंजऱ्यांपुरते मर्यादित राहिले. आज तब्बल दोन शतकांनंतर जेव्हा कझाकस्तानच्या भूमीत या घोड्यांच्या नव्या पिढीने जन्म घेतला, तेव्हा हा केवळ एका प्राण्यांचा जन्म नव्हता, तर निसर्गाने स्वतःच्या समृद्ध परंपरेला दिलेली पुनरुज्जीवनाची संजीवनी ठरली.

ऑगस्ट महिन्यातील तो ऐतिहासिक भावनिक क्षण

संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या (UNEP) अहवालानुसार, २२ ऑगस्टच्या सकाळी कझाकस्तानमधील अलिबी पुनर्वसन केंद्र (Alibi Rehabilitation Centre) आणि वन्यजीव अभयारण्यात एका ७ वर्षांच्या प्रझेवाल्स्की घोडीने एका शिंगराला जन्म दिला. तज्ज्ञांच्या मते, या मोकळ्या गवताळ प्रदेशात नैसर्गिकरित्या जन्मलेले हे गेल्या दोन शतकांतील पहिलेच शिंगरू असू शकते. या घटनेचा आनंद ओसरतो न ओसरतो तोच, अवघ्या आठ दिवसांनंतर ‘उंब्रा’ नावाच्या ६ वर्षांच्या दुसऱ्या घोडीने आणखी एका नर शिंगराला जन्म दिला. या लागोपाठ झालेल्या दोन जन्मांमुळे वन्यजीव संरक्षकांच्या आनंदाला उधाण आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Russia Oil Deal : इंधनाचे दर विक्रमी वेगाने घटणार? रशिया आणि अमेरिकेने केली एका मोठ्या ‘तेल’ कराराची घोषणा

प्रझेवाल्स्की घोड्यांच्या या संवर्धन मोहिमेत रात्रंदिवस कार्यरत असलेले वन्यजीव संरक्षणकर्ते अल्बर्ट सालेमगेरेयेव्ह (Albert Salemgareyev) यांनी या क्षणाचा अनुभव सांगताना अत्यंत भावूक भावना व्यक्त केल्या. २२ ऑगस्टच्या सकाळी जेव्हा त्यांना अभयारण्यातील सहकाऱ्याचा फोन आला, तेव्हा त्यांनी कझाकस्तानची राजधानी अस्ताना येथून अलिबी पुनर्वसन केंद्रापर्यंतचा तब्बल १२ तासांचा खडतर प्रवास केला. जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले, तेव्हा ते शिंगरू आपल्या आईच्या कुशीत शांतपणे विसावले होते आणि त्याचे चिमुकले पाय अजूनही जमिनीवर लडखडत होते. अल्बर्ट यांनी सांगितले की, “माझ्यासाठी तो अत्यंत भावनिक क्षण होता. हे केवळ एक घोडा किंवा शिंगरू नाही, तर कझाकस्तानमधील एका नव्या पिढीची आणि समृद्ध निसर्गाची नवी सुरुवात आहे.”

DID YOU KNOW: the first people to tame and ride horses lived in Kazakhstan, around 3500 BCE? At Botai, on the northern Kazakh steppe, archaeologists found corrals, bit wear on horse teeth, and traces of mare’s milk in pottery: signs of a people who had learned to tame, ride, and milk horses 5,500 years ago. It changed everything. The horse became the first fast land transport, and mounted nomads went on to reshape continents, from the Huns to the Mongols. The Turkic nomadic tradition itself rides on this moment. Kazakhstan still calls itself the homeland of the horse. — Daily Turkic (@DailyTurkic) October 9, 2026

credit – social media and Twitter

मध्य आशियातून ही दुर्मिळ प्रजाती कशी नष्ट झाली होती?

प्रझेवाल्स्की घोडे (Przewalski’s Horse) हे पृथ्वीवर शिल्लक राहिलेले एकमेव खरे ‘जंगली’ घोडे मानले जातात. आपण आज पाहतो ते बहुतेक घोडे हे पाळीव घोड्यांच्या प्रजातींमधून आलेले असतात, परंतु प्रझेवाल्स्की घोड्यांची जीन्स आणि डीएनए मानवाने कधीही पाळीव न केलेल्या मूळ जंगली प्राण्यांचे प्रतिनिधित्व करतात. लहान परंतु अत्यंत मजबूत शरीर, मानावर उभी राहणारी ताठ आयाळ आणि कडक हिवाळ्यात शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्याची विशेष शारीरिक क्षमता ही या घोड्यांची खासियत आहे.

१९०० च्या दशकाच्या मध्यापर्यंत मानवी हस्तक्षेप वाढल्याने त्यांचा विनाश सुरू झाला. अनियंत्रित शिकार, शेती व पशुपालनासाठी गवताळ प्रदेशाचा झालेला नाश आणि पाळीव जनावरांशी अन्नासाठी झालेली स्पर्धा यामुळे या घोड्यांचे कळप हळूहळू नष्ट झाले. १९६९ नंतर ते जंगलात दिसेनासे झाले. सुदैवाने, युरोपमधील काही प्रमुख प्राणिसंग्रहालयांमध्ये हे घोडे सुरक्षित ठेवण्यात आले होते. तिथे शास्त्रज्ञांनी अतिशय वैज्ञानिक पद्धतीने प्रजननाचा कार्यक्रम राबवून त्यांचा जनुकीय साठा (Genetic Pool) जपून ठेवला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Panama Earthquake: जमीन हादरली, इमारती कोसळल्या! पनामामध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप, अनेक देशांमध्ये त्सुनामी अलर्ट; थरारक VIDEO VIRAL

युरोपियन प्राणिसंग्रहालयातून कझाकस्तानमध्ये पुनर्वसन

२०२४ पासून कझाकस्तान सरकारने युरोपियन प्राणिसंग्रहालयांच्या सहकार्याने या घोड्यांना पुन्हा त्यांच्या मूळ भूमीत आणण्याची भव्य योजना आखली. पहिल्या टप्प्यात युरोपमधून २२ प्रझेवाल्स्की घोडे कझाकस्तानमधील अलिबी पुनर्वसन केंद्रात विमानाने आणण्यात आले. या घोड्यांना येथील हवामान आणि वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी विशेष देखरेखीत ठेवण्यात आले होते. २०२९ पर्यंत कझाकस्तानच्या गवताळ प्रदेशात अशा एकूण ४० घोड्यांना टप्प्याटप्प्याने मोकळे सोडण्याची योजना आहे.

युरोपमधून आणलेल्या या घोड्यांनी कझाकस्तानच्या नैसर्गिक वातावरणात न घाबरता जुळवून घेतले आणि अवघ्या काही महिन्यांतच त्यांनी दोन नव्या शिंगरांना जन्म दिला. यावरून हे स्पष्ट होते की, कझाकस्तानची माती आणि गवताळ प्रदेश या दुर्मिळ घोड्यांच्या वंशावळीसाठी पुन्हा एकदा पूर्णपणे सुरक्षित आणि अनुकूल बनले आहेत.

भविष्यातील आशा आणि जागतिक पर्यावरणाचा संदेश

प्रझेवाल्स्की घोड्यांचा हा पुनर्जन्म केवळ कझाकस्तानपुरता मर्यादित नसून संपूर्ण जगासाठी एक मोठा धडा आहे. जर मानवाने मनावर घेतले आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रामाणिक प्रयत्न केले, तर नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींनाही पुन्हा नवजीवन देता येते, हे या घटनेने सिद्ध केले आहे. कझाकस्तानचे हे गवताळ प्रदेश आता पुन्हा एकदा घोड्यांच्या टापांच्या आवाजाने आणि त्यांच्या स्वातंत्र्याने समृद्ध होणार आहेत. निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी आणि वन्यजीव संवर्धनासाठी हा क्षण इतिहासाच्या पानांवर सुवर्णअक्षरांनी नोंदवला गेला आहे.

Web Title: Przewalski wild horse birth kazakhstan steppe 200 years revival hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • animal
  • international news
  • World news

संबंधित बातम्या

ICC vs US Conflict : ‘आयसीसीने धमक्या देणे थांबवावे, नाहीतर आम्ही…’, निर्बंध लादून ट्रम्प प्रशासनाने काय म्हटले?
1

ICC vs US Conflict : ‘आयसीसीने धमक्या देणे थांबवावे, नाहीतर आम्ही…’, निर्बंध लादून ट्रम्प प्रशासनाने काय म्हटले?

Panama Earthquake: जमीन हादरली, इमारती कोसळल्या! पनामामध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप, अनेक देशांमध्ये त्सुनामी अलर्ट; थरारक VIDEO VIRAL
2

Panama Earthquake: जमीन हादरली, इमारती कोसळल्या! पनामामध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप, अनेक देशांमध्ये त्सुनामी अलर्ट; थरारक VIDEO VIRAL

Russia-Iran: ‘इराणची चूक नसतानाही…’, तुर्कमेनिस्तानमध्ये पुतिन-पेझेश्कियन यांची भेट; मध्य-पूर्वेतील युद्धावर रशियाची मोठी घोषणा
3

Russia-Iran: ‘इराणची चूक नसतानाही…’, तुर्कमेनिस्तानमध्ये पुतिन-पेझेश्कियन यांची भेट; मध्य-पूर्वेतील युद्धावर रशियाची मोठी घोषणा

US-Russia Oil Deal : इंधनाचे दर विक्रमी वेगाने घटणार? रशिया आणि अमेरिकेने केली एका मोठ्या ‘तेल’ कराराची घोषणा
4

US-Russia Oil Deal : इंधनाचे दर विक्रमी वेगाने घटणार? रशिया आणि अमेरिकेने केली एका मोठ्या ‘तेल’ कराराची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.