Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Hamas War: ‘गाझामध्ये दररोज रात्री 30 ते 40 लोकांचा बळी घ्या’; इस्रायलचे सुरक्षा मंत्री बेन-ग्विर यांच्या विधानाने जगात खळब

Israel-Hamas War: इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतामार बेन-ग्विर यांनी गाझामध्ये दररोज रात्री ३०-४० लोकांना लक्ष्य करण्याबाबत एक चिथावणीखोर विधान केले आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर एक नवीन वाद निर्माण झाला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 17, 2026 | 03:55 PM
Kill 30-40 people every day in Gaza Israeli Defense Minister's statement causes a stir worldwide

Kill 30-40 people every day in Gaza Israeli Defense Minister's statement causes a stir worldwide

Follow Us
Follow Us:
  • चिथावणीखोर विधान
  • पंतप्रधान नेतान्याहूंवर टीका
  • जागतिक स्तरावर तीव्र संताप

इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) यांच्यात सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र आणि भयानक वळण घेत आहे. अशा अत्यंत संवेदनशील परिस्थितीत इस्रायलचे अतिउजवे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतामार बेन-ग्विर (Itamar Ben-Gvir) यांनी एक अत्यंत चिथावणीखोर आणि वादग्रस्त विधान केले आहे. गाझामध्ये दररोज रात्री किमान ३० ते ४० लोकांना लक्ष्य करून ठार केले पाहिजे, अशी प्रक्षोभक मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या विधानामुळे केवळ इस्रायलच्या राजकारणातच नव्हे, तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इतामार बेन-ग्विर यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासने ओलीस ठेवलेल्या आणि नंतर मुक्त झालेल्या रोम ब्रास्लाव्हस्की (Rom Braslavski) या माजी नागरिकाच्या पॉडकास्टमध्ये सहभाग घेतला होता. या संभाषणादरम्यान त्यांनी गाझातील इस्रायली लष्कराच्या सध्याच्या कारवायांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “मी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या धोरणांशी सहमत नाही, हे लपवून ठेवायचे कारण नाही. माझे स्पष्ट मत आहे की, गाझामध्ये इस्रायलने दररोज रात्री ३० ते ४० लोकांना लक्ष्य करून संपवले पाहिजे.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia-Ukraine War: झेलेन्स्कींच्या होमटाऊनमध्ये रशियाचा धुमाकूळ; लक्ष्मी मित्तल यांच्या कारखान्यावर डागली क्षेपणास्त्रे, 2 ठार

आपल्या विधानाचा अधिक विस्तार करताना बेन-ग्विर यांनी मानवी हक्कांची उघडपणे पायमल्ली करणारी भाषा वापरली. ते म्हणाले की, इस्रायलने केवळ तात्काळ धोका निर्माण करणाऱ्यांनाच नव्हे, तर इतर लोकांनाही लक्ष्य केले पाहिजे. “गाझामध्ये असे अनेक लोक आहेत जे जगण्याच्या लायकीचेच नाहीत. त्यांना जिवंत ठेवणे योग्य नाही, कारण ते मुळात माणूस म्हणून जगण्याच्या योग्यतेचे नाहीत,” असा धक्कादायक दावा त्यांनी केला. एका जबाबदार मंत्र्याकडून आलेली ही अमानवी भाषा जागतिक स्तरावर टीकेचा विषय ठरली आहे.

इतामार बेन-ग्विर यांनी आंतरराष्ट्रीय नियमांना केराची टोपली दाखवत गाझामधून पॅलेस्टिनी नागरिकांना बाहेर हाकलून तिथे पुन्हा इस्रायली वस्त्या स्थापन करण्याचे उघडपणे समर्थन केले. गाझामधील सर्व जमीन इस्रायलचीच आहे, असे सांगत त्यांनी जागतिक समुदायाच्या शांततेच्या प्रयत्नांना थेट आव्हान दिले आहे. याशिवाय, इस्रायली तुरुंगात असलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांना देण्यात येणाऱ्या अन्नात कपात केल्याबद्दल त्यांनी यापूर्वीच अभिमानाने वक्तव्ये केली आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : General Dhiraj Seth: भारत-नेपाळ लष्करी परंपरेचा सुवर्ण क्षण; जनरल धीरज सेठ यांना मिळणार नेपाळचे मानद लष्करप्रमुखपद

दरम्यान, बेन-ग्विर यांच्या या प्रक्षोभक वक्तव्यांमुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) इस्रायलची अडचण अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या न्यायालयात इस्रायलवर असलेल्या वंशसंहाराच्या (Genocide) आरोपांच्या सुनावणीदरम्यान बेन-ग्विर यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांची विधाने पुरावे म्हणून मांडली जात आहेत. जरी बेन-ग्विर यांच्याकडे थेट लष्करी हल्ल्यांचे आदेश देण्याचे अधिकार नसले, तरी सुरक्षा यंत्रणेतील मुख्य मंत्री म्हणून त्यांचे हे वक्तव्य इस्रायलच्या युद्ध धोरणावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करते.

Web Title: Israel security minister itamar ben gvir controversial statement gaza marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Israel Hamas War
  • World news

संबंधित बातम्या

World News : चीनकडून इंधन निर्यातीला स्थगिती; आशियातील पुरवठ्यावर परिणाम होणार
1

World News : चीनकडून इंधन निर्यातीला स्थगिती; आशियातील पुरवठ्यावर परिणाम होणार

Flydubai Flight 1073 : फ्लायदुबई विमान पाडण्याचा प्रयत्न दहशतवाद?; तपासाला राजकीय कृत्याची दिशा
2

Flydubai Flight 1073 : फ्लायदुबई विमान पाडण्याचा प्रयत्न दहशतवाद?; तपासाला राजकीय कृत्याची दिशा

World News : युरोपचा मोठा निर्णय; साठवलेले डिझेल बाजारात आणणार, इंधनाच्या दरांना दिलासा मिळण्याची शक्यता
3

World News : युरोपचा मोठा निर्णय; साठवलेले डिझेल बाजारात आणणार, इंधनाच्या दरांना दिलासा मिळण्याची शक्यता

Mossad Agent : ‘कोसळणार विमान पुन्हा उडू लागलं…’ तो प्लंबर इस्रायली मोसादचा एजंट? सोशल मीडियावर रंगल्या चर्चा
4

Mossad Agent : ‘कोसळणार विमान पुन्हा उडू लागलं…’ तो प्लंबर इस्रायली मोसादचा एजंट? सोशल मीडियावर रंगल्या चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.