Israel-Yemen War Israel attack on Yemen Hodeidah and Salif ports
जेरुसेलम: गेल्या काही काळापासून इस्रायल आणि येमेनच्या हुथी विद्रोह्यांमध्ये संघर्ष सुरु आहे. हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून दोन्ही गट एकमेकांवर सतत हल्ले करत आहे. शुक्रवारी (१६ मे) पुन्हा एकदा इस्रायल येमेनच्या होदेदा बंदरावर आण सलिफ बंदरावर हवाई हल्ले केले. इस्रायलच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू आणि ९ जण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर इस्रायलच्या संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, हुथी दहशतवादी येमेनच्या बंदरावरून शस्त्रांची वाहतूक करत होते. यामुळे हुथी बंडखोरांना थांबवणे महत्त्वाचे होते. त्यांना थांबवले नाही, तर मोठा विनाश होऊ शकतो.
तसेच इस्रायलने हुथी बंडखोरांना इशाराही दिला की त्यांनी इस्रायलवरी हल्ले आणि शस्त्र वाहतूक थांबवली नाही, तर त्यांचेही हाल हमास आणि हिजबुल्लाहच्या नेत्यांसारखे होतील. इस्रायलनमे गेल्या वर्षी मोहम्मद देईफ, याह्या सिनवार आणि हसन नसरल्लाह या हमासच्या नेत्यांना ठार केले होते.
इस्रायलने पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हुथी बंडखोरांना इशारा दिला आहे की, त्यांनी हल्ले थांबवले नाहीत तर त्यांना पूर्णत: नष्ट करण्यात येईल. तसेच नेतन्याहूंनी असेही म्हटले की, हुथींना इराणचे समर्थन मिळत आहे, हुथी फक्त मोहरे आहेत.
नेतन्याहूंनी म्हटले की, इस्रायलच्या लष्कराने हुथी दहशतवाद्यांच्या तळांवर अचूक आणि यशस्वी हल्ले केले आहेत. हा हुथींना पाठिंबा देण्याऱ्यांसाठी एक इशारा आहे.
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी हुथींना इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, हुथींनी इस्रायलवरील क्षेपणास्त्रे हल्ले न थांबवल्यास त्यांना गंभीर परिणामांना सामोर जावे लागेल. त्यांनी सांगितले की, इस्रायलने हमासच्या अनेक नेत्यांना ठार केले आहे, तसेच हुथींच्या नेत्यांचाही खात्मा करण्यात येईल.
दरम्यान इस्रायने ऑक्टोबर २०२३ मध्ये गाझावर हल्ला केला होता. यामध्ये अनेक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला होता. यानंतर हुथींना पॅलेस्टिनींना साथ देत इस्रायलच्या लाल समुद्रातील जहाजांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली.
दरम्यान मार्चमध्ये इस्रायलने गाझातील हमाससोबतच्या युद्धबंदीचा करार मोडला आहे. त्यानंतर इस्रायलने गाझातील हमासच्या अनेक ठिकांणांवर हल्ले केले. यामध्येही पुन्हा अनेक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. यावरही हुथी बंडखोरांनी निषेध दर्शवला आहे. याला निषेध म्हणून हुथींनी इस्रायलच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ बेन गुरियनवर हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलने देखील येमेनेच्या बंदरावरील हुथींच्या तळांना लक्ष्य करण्यात आले.
इस्रायलने स्पष्ट केले आहे की, हुथींनी इस्रायलवर पुन्हा हल्ला केल्यास त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येईल. तसेच त्यांच्या नेत्यांचे हाल देखील हमासच्या नेत्यांसारखे होतील.