इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा खतरनाक लीडर ठार? कोण आहे मुहम्मद सिनावर? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: इस्रायलने नुकतेच दक्षिण गगाझाचे शहर खान युनूसरवर मोठा हल्ला केला आहे. हा हल्ला मंगळावीर १३ मे रोजी करण्यात आला. या हल्ल्यात इस्रायलने हमासाचा कमांडर मुहम्मद सिनवार याला लक्ष करण्यात आले होते. परंतु इस्रायल सिनवारला मारण्यात अपयशी ठरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हमासच्या सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली नेत्यामद्ये मुहम्मद सिनवारला गणले जाते. युरोपियन हॉस्पिटलच्या कमांड सेंटरजवळ मुहम्मद सिनवलार असल्याची माहिती इस्रायलला मिळाली होती. इस्रायला माहिती मिळताच त्यांनी सिनवारला टार्गेट करुन हल्ला केला. परंतु मुहम्मद सिनवार हल्ल्यापासून वाचला आणि तिथून गायब झाला. या हल्ल्यानंतर इस्रायलने म्हटले की, मुहम्मद सिनवारच्या हत्येमुळे हमास पूर्णत: नष्ट होऊ शकतो.
मुहम्मद सिनवार हा हमासच्या माजी नेत्याचा याह्या सिनवारचा धाकटा भाऊ मानला जातो. २०२३ मध्ये इस्रायलने याह्या सिनवारला ठार केले होते. ७ ऑक्टोरबर २०२३ रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा याह्या सिनवार मास्टमाइंड होता. याह्या सिवार मारला गेला की पळून गेला हे अद्याप अस्पष्ट आहे. याह्या सिनवार इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाला असेल तर हमासच्या रणनीतीला मोठा धक्का आहे. तसेच त्याचा धाकटा भाऊ देखील याह्या सिनवारपेक्षा खतरनाक मानला जातो. गेल्या २० वर्षापासून इस्रायल याह्या सिनावर आणि मुहम्मह सिनवारचा खात्मा करण्याच्या प्रयत्नात आहे.
मुहम्मद सिनवार हा हमासच्या सर्वात शक्तीशाली लष्करी कमांडर आहे. २०२३च्या हल्ल्यात याह्या सिनावरला त्याने साथ दिली होती. १९९० मध्ये त्याने याह्या सिनवारसोबत काम करम्यास सुरुवात केली. त्यानंतर अनेक दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली त्याला १९९१मध्ये अटक करण्यात आली होती, परंतु मुहम्मद इस्रायलच्या कैदूतून फरार होण्यास यशस्वी झाला.
इस्रायल गुप्तचर संस्था २००६ पासून मुहम्मह सिनवारच्या शोधता आहे. २०२१ पासून इस्रायलने अनेक वेळा त्याच्यावर हल्ले केले आहेत. परंतु प्रत्येक वेळी मुहम्मद सिनवार हल्ल्यातून वाचला आणि फरार होण्यात यशस्वी झाला आहे. २०२२ मध्ये अल-जझीराला मिळालेल्या माहितीनुसार, सिनवारने त्याची ओळख गुप्त राहावी म्हणून त्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारातही उपस्थित नव्हता.
मुहम्मद सिनवार हा हमासचा कट्टर लष्करी कमांडर म्हणून ओळखला जातो. इस्रायलच्या म्हणण्यानुसारस २०२५ पर्यंत हमासध्ये नवीन लष्कराची भरती करण्यात सिनावराचा हात आहे. याचा खात्मा केल्यास हमासचे कंबरडे मोडेल. हमास पूर्णत: नष्ट होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलचे सैनिक गिलाद शालितचे हमासने २००६ मध्ये अपहरण केले होते. या अपहरणाचा कट मुहम्मद सिनावरने रचला होता असे इस्रायलने म्हटले आहे. इस्रायलच्या म्हणण्यानुसार, इस्रायलने अनेक वेळा मुहम्मद सिनवारवर हल्ला केला आहे, यामुळे तो ठार झाला असण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप हमासने त्याच्या मृत्यूबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही, यामुले मुहम्मद सिनावरच्या हत्येबद्दल अनिश्चितता कायम आहे. त्याचा खात्मा झाल्यास हमासचला क्षमतेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.