Israeli says they has begun airdrops of aid into Gaza amid increased starvation deaths
गाझातील इस्रायल आणि हमास युद्धाने अनेक पॅलेस्टिनींचे जनजीवन विस्कळीत झाले होते. यामुळे लोकांना पायाभूत सुविधा, अन्न-पाणी, निवारा, औषधे देखील मिळणे कठीण झाले होते. दरम्यान इस्रायलने हमासोबतच्या युद्धात गाझातील मानवतावादी मदतीवर बंदी घातली होती. परंतु रविवारी (२७ जुलै) रोजी अखेर इस्रायलने गाझामध्ये मानतवादी मदत पोहोचवली आहे. यामुळे युद्धबंदीसाठी हे अत्यंत महत्वाचे पाऊल मानले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने गाझामध्ये पीठ, साखर, औषधे आणि अन्नाचे कॅन हवाई मार्गे सोडले आहे. आंतरराष्ट्रीय स्थंस्थांच्या मदतीने हे पहिले सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे गाझातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. शिवाय गाझाच्या काही भागांमध्ये इस्रायलने युद्धबंदीची देखील घोषणा केली आहे. यामुळे संयुक्त राष्ट्रांना आता सुरक्षितपणे गाझामध्ये मानतावादी मदत पोहोचवणे शक्य होणार आहे. मार्च २०२५ ते मे २०२५ च्या काळात इस्रायलने या मदतीवर बंदी घातली होती. मदत घेऊन जाणाऱ्या लोकांना देखील इस्रायलने पकडले होते.
मात्र आता इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या मदत पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण करणार नसल्याचे म्हटले आहे. दिड वर्षांपासून सुरु असलेल्या या संघर्षात हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. शिवाय उपासमारीमुळे देखील १२४ लोकांचा बळी गेला आहे. यामध्ये सर्वात जास्त लहान मुलांचा समावेश आहे. जुलै महिन्यांत ४० हून अधिक लोकांचा उपासमारीने मृत्यू झाला होता, यामध्ये १६ मुलांचा समावेश होता.
रशियन तेल खरेदीवरुन पाश्चत्य देशांची टीका; भारताने दिले सडेतोड उत्तर, म्हणाला…
दरम्यान इस्रायलच्या लष्कराने गाझामध्ये हवाई मार्गे मदत पुरवण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलने याची पुष्टी देखील केली आहे. दरम्यान गाझातील दुष्काळाच्या संकटावर वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. इस्रायलने परदेशी देशांना देखील गाझाला मदत करण्याची परवानगी दिली आहे.
दरमान इस्रायलचे अमेरिकेतील राजदूत येचियल लीटर यांनी, इस्रायली सैन्य रविवारपासून गाझामध्ये ‘मानवतावादी कॉरिडॉर’ उघडणार असल्याचे म्हटले होते. गाझातील मोठ्या लोकसंख्येसाठी मानवतावादी मदत गरजेची आहे. उपासमारीमुळे मृत्यूच्या संख्येत वाढ होत असल्याने हा निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. विशेष करुन कुपोषणामुळे लहान मूलांच्या मृतांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली होती. लोक मीठ खाऊन आणि पाणी पिऊन जीवन काढत होते. मात्र आता ही परिस्थिती सुधारण्याची आशा निर्माण झाली आहे.
US-EU Trade Deal : अमेरिकेचा टॅरिफवॉर! युरोपियन युनियनवर लादले १५ टक्के शुल्क