इस्त्रायली रणगाड्यांचा गाझा पट्टीत पुन्हा कहर; 47 लोकांचा मृत्यू, एकही क्षेत्र सुरक्षित नाही
गाझा: इस्त्रायली लष्कराचे गाझा पट्टीवरील हल्ले अजूनही सुरूच आहेत. इस्त्रायली रणगाडे आता गाझाच्या दक्षिण भागातील खान युन्स भागात रणगाड्यांसह घुसले आहेत. खान युनिस भागातील हल्ल्यामुळे 47 लोकांचा मृत्यू झाला आहे. पॅलेस्टिनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायच्या हल्ल्यांमुळे प्रचंड नुकसान जाले आहेत. अनेक लोक जखमी झाले आहेत तर काही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
गाझा पट्टीत एकही क्षेत्र सुरक्षित नाही
मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायली सैन्याने लोकांना बाहेर पडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही तासांतच सैन्य रणगाडे घेऊन खान युन्स भागांत शिरले. याशिवाया अतिरेक्यांनीही या भागांमध्ये रॉरेट्सही डागले होते. यामुळे अनेक कुटूंबे घरे सोडून गेली आहेत. तसेच अनेक मदत छावण्यांवरही हल्ले करण्यात आले आहेत. यामुळे लोकांना अन्न, पाणी आणि राहण्याच्या सोयी देखील मिळणे कठीण झाले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझामध्ये एकही क्षेत्र सुरक्षित राहिलेले नाही.
यामुळे दोन दशलक्षहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. इस्त्रायलने अल-मावसी छावणीवर हल्ल्या केल्याने आग लागली होती. या आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले असल्याची माहिती पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी दिली. या लोकांना प्राथमिक उपचार मिळणे देखील कठीण झाले आहे. या हल्ल्यांवर इस्त्रायलने म्हटले आहे की, खानयुन्स भागांतून हमासच्या अतिरेक्यांन लक्ष्य करण्यात आले आहे.
हमासच्या अतिरेक्यांना लक्ष्य केल्याचा इस्त्रायलचा दावा
मात्र, हा हल्ला अतिरेक्यांपासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी करण्यात आला असल्याचे इस्त्रायचे म्हणणे आहे. मात्र, या हल्ल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक लोक इमारतींवर झालेल्या स्फोटात अडकले आहेत. आत्पातकालिन सेवेच्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या घटनेवर इस्त्रायली लष्कराकडून कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही. अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांवरही हल्ले झाले आहेत.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
पॅलेस्टिनींना भारताची साथ
संयुक्त राष्ट्र महासभेत भारताने इस्रायलविरोधी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रस्तावात इस्रायलने 1967 पासून कब्जा केलेल्या पूर्व जेरुशलमसह पॅलेस्टिनी प्रदेशातून माघार घ्यावी आणि पश्चिम आशियात व्यापक, न्याय व शाश्वत शांतता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली होती. 193 सदस्यीय महासभेत सेनेगलने मांडलेला “पॅलेस्टिनी प्रश्नाचे शांततामय समाधान” असा हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला.
या प्रस्तावाला भारतासह एकूण 157 देशांनी मंजूरी दिली. दरम्यान, इस्रायल, अमेरिका, अर्जेंटिना, हंगेरी, माइक्रोनेशिया, नाउरू, पलाऊ आणि पापुआ न्यू गिनी या देशांनी प्रस्तावाला विरोध केला आहे. तर कॅमेरून, झेकिया, इक्वाडोर, जॉर्जिया, पॅराग्वे, युक्रेन आणि उरुग्वे या देशांनी मतदान टाळले.