फोटो सौजन्य: सोशल मीडिया
ढाका: बांगलादेशातील हिंदूंवरील वाढच्या हल्ल्यांचे प्रमाण पाहून अमेरिका आणि भारत तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे हल्ले थांबवण्याचे आणि शांतता प्रस्थापित करण्याचा सल्ला बांगलादेशाला दिला. दरम्यान, बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत आणि भारताशी संबंधांबाबत बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद यूनुस यांचे प्रमुख सचिव शफीकुल आलम यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
शेख हसीना यांच्यावर टिका
शफीकुल यांनी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर कठोर टीका करत त्यांना “सामूहिक हत्यारी” असे संबोधले आहे. शफीकुल यांनी असेही नमूद केले की, शेख हसीना यांनी क्रूर हुकूमशाही राबवली आहे. तर, भारत-बांग्लादेश संबंधांवर बोलताना शफीकुल यांनी म्हटले आहे की, देशांतील संबंध सध्या चांगले आहेत आणि त्यांना आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी आशा व्यक्त केली की आगामी महिन्यांमध्ये भारत आणि बांग्लादेश यांचे संबंध अधिक सुधारतील.
बांगलादेशाचे ISKCON वर बंदी घालण्याचा कोणताही हेतू नाही
याशिवाय, त्यांनी हे ही स्पष्ट केले आहे की, बांग्लादेशमध्ये ISKCON संस्थेवर बंदी घालण्याचा कोणताही विचार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांनी बांग्लादेशातील हिंदू समुदायावर होणाऱ्या हल्ल्यांविषयी विचारल्यावर मौन बाळगले. हिंदू नेते चिन्मय दास यांच्या अटकेनंतर इस्कॉनवर बंदी येण्याच्या अफवांवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, ISKCON वर बंदी घालण्याचा बांगलादेश सरकारचा कोणताही हेतू नाही.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
भारताकडून ही मागणी केली
दरम्यान, बांग्लादेशच्या अंतरिम सरकारने भारताकडे एका ऐतिहासिक मागणीवर लक्ष वेधले आहे. शफीकुल आलम यांच्या मते, भारताने बांग्लादेशातील जुलै-अगस्ट 2024 मध्ये झालेल्या विद्रोहाला मान्यता दिली पाहिजे, यामुळे शेख हसीना सरकार सत्तेवरून हटवले गेले असे त्यांनी म्हटले आहे. शफीकुल आलम यांनी नमूद केले की, भारताने या विद्रोहाला “अतिवादी, हिंदूविरोधी आणि इस्लामी कट्टरतावादी” असा रंग देण्याचा प्रयत्न केला.
आलम यांनी भारताला 1975 नंतरची रणनीती बदलण्याची आणि बांग्लादेशातील नवीन राजकीय वास्तवाला समजून घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या मते, जुलैच्या विद्रोहाला मान्यता न दिल्यास भारत आणि बांग्लादेश यांच्यातील संबंधांवर नकारात्मक परिणाम होईल. दोन्ही देशांनी परस्पर हितसंबंध मजबूत करण्यासाठी इतिहासाच्या या टप्प्यावर एकमेकांना पाठिंबा दिला पाहिजे, असे त्यांनी अधोरेखित केले.