Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचा सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय; ISRO तीन वर्षांत देशासाठी 150 नवे उपग्रह प्रक्षेपित करणार

ISRO 150 satellites : भारताने राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि सीमावर्ती तसेच किनारी भागांचे अधिक व्यापक निरीक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ISRO तीन वर्षांत १०० ते १५० नवीन उपग्रह प्रक्षेपित करणार.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 26, 2025 | 05:00 PM
ISRO to launch 150 satellites in 3 years for India's security

ISRO to launch 150 satellites in 3 years for India's security

Follow Us
Close
Follow Us:

ISRO 150 satellites : भारताने राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि सीमावर्ती तसेच किनारी भागांचे अधिक व्यापक निरीक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) पुढील तीन वर्षांत १०० ते १५० नवीन उपग्रह प्रक्षेपित करणार असून, यामुळे संपूर्ण देशाच्या सीमांचे आणि समुद्रकिनाऱ्यांचे बारीक निरीक्षण शक्य होणार आहे.

इस्रोचे अध्यक्ष आणि अवकाश विभागाचे सचिव व्ही. नारायणन यांनी बुधवारी एका कार्यक्रमात ही माहिती दिली. ते म्हणाले, “सध्या भारताकडे सुमारे ५५ उपग्रह कार्यरत आहेत, मात्र भारतासारख्या विस्तृत सीमा असलेल्या आणि ७,५०० किलोमीटर लांब समुद्रकिनाऱ्याच्या देशासाठी ही संख्या अपुरी आहे. त्यामुळेच अधिक उपग्रहांची नितांत गरज आहे.”

आंतरिक्ष सुधारणा आणि खाजगी क्षेत्राचा सहभाग

नारायणन यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अवकाश क्षेत्रात मोठ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारणांमुळे खाजगी कंपन्यांनाही उपग्रह आणि रॉकेट निर्मितीत सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळाली आहे. “आज आपण फक्त इस्रोवर अवलंबून नाही, तर खाजगी क्षेत्रालाही या प्रक्रियेत सामील करून घेत आहोत. त्यामुळे उपग्रहांची निर्मिती वेगाने होईल आणि आपली सुरक्षा क्षमता भक्कम होईल,” असे ते म्हणाले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘जंग करनी है तो…’ भारताच्या कृतीवर पाकिस्तानी लोकांचा स्वतःवरच ‘मीम अटॅक’, एकदा पहाच

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रोची भूमिका

नुकत्याच काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने इस्रो काय पावले उचलू शकतो, याबद्दल विचारण्यात आले असता नारायणन यांनी वरील योजनांची माहिती दिली. त्यांनी ठामपणे सांगितले की, “उपग्रहांच्या वाढत्या संख्येमुळे देशाच्या कोणत्याही भागाचे सतत निरीक्षण शक्य होईल, जे दहशतवादी हालचाली लवकर ओळखण्यात आणि वेळीच उपाययोजना करण्यात मदत करेल.”

स्पाडेक्स मोहिमेतील ऐतिहासिक यश

इस्रोने नुकतेच स्पाडेक्स (स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट) मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. नारायणन यांच्या माहितीनुसार, भारताने १६ जानेवारीला पहिल्यांदा दोन उपग्रहांचे यशस्वी डॉकिंग केले होते आणि त्यानंतर १३ मार्चला यशस्वी अनडॉकिंग केले. गेल्या आठवड्यात दुसऱ्यांदा यशस्वी डॉकिंग करण्यात आले.  हे यश मिळवणारा भारत जगातील केवळ अमेरिका, रशिया आणि चीन नंतरचा चौथा देश ठरला आहे. यामुळे भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात एक नवा मैलाचा दगड ठरला आहे.

हवामान बदल अभ्यासासाठी उपग्रह प्रकल्प

नारायणन यांनी आणखी एका महत्त्वाच्या उपक्रमाची माहिती दिली. हवामान बदलाचा सखोल अभ्यास करण्यासाठी एक विशेष उपग्रह विकसित करण्याचे काम इस्रोने सुरू केले आहे. हा उपग्रह मुख्यतः G20 राष्ट्रांना सेवा देण्यासाठी वापरला जाईल. या उपग्रहाच्या सुमारे ५० टक्के उपकरणे भारतात विकसित केली जातील, तर उर्वरित उपकरणे इतर G20 देशांकडून दिली जातील. हा उपक्रम हवामान बदलाच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी जागतिक सहकार्याचे उदाहरण ठरेल.

आरोग्य क्षेत्रात एआयचा प्रभावी वापर

या कार्यक्रमात कावेरी रुग्णालय यांच्या वतीने प्रगत आरोग्यसेवेच्या क्षेत्रात एक नवे तंत्रज्ञानही सादर करण्यात आले. “एआय पॉवर्ड रोबोटिक कंपॅटिबल ओ-एआरएम विथ स्टेल्थ नेव्हिगेशन सिस्टीम” या नव्या प्रणालीमुळे मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रिया अधिक प्रभावी आणि किफायतशीर पद्धतीने करता येणार आहेत, अशी माहिती रुग्णालयाचे सहसंस्थापक डॉ. अरविंदन सेल्वराज यांनी दिली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Lahore Airport Fire: पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर भीषण आग, सर्व उड्डाणे रद्द

 भारताचा अवकाश क्षेत्रात प्रगतीचा नवा अध्याय

या उपक्रमांद्वारे भारत राष्ट्रीय सुरक्षेला बळकट करत असून, अंतराळ संशोधन आणि हवामान बदलाशी संबंधित जागतिक पातळीवरील योगदानातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. इस्रोच्या पुढाकाराने भारताचा अवकाश क्षेत्रातील ठसा अधिक गडद होणार, यात शंका नाही.

Web Title: Isro to launch 150 satellites in 3 years for indias security

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 05:00 PM

Topics:  

  • india
  • international news
  • ISRO
  • ISRO Scientists

संबंधित बातम्या

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
1

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय
2

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस
3

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?
4

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.