'जंग करनी है तो...' भारताच्या कृतीवर पाकिस्तानी लोकांचा स्वतःवरच 'मीम अटॅक', तणावातही हास्याचा वर्षाव ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
India Pakistan meme war : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलल्याने दोन्ही देशांमधील तणाव प्रचंड वाढला आहे. भारताने पाच महत्त्वाचे निर्णय घेतले असून त्यात पाकिस्तानातील भारतीय दूतावास बंद करणे, अटारी सीमा सील करणे, ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार स्थगित करणे आणि पाकिस्तानी राजदूतांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश देणे यांचा समावेश आहे.
भारताच्या या तीव्र कारवाईला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने वाघा सीमा बंद केली आहे तसेच शिमला करार रद्द करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्रदेखील बंद केले आहे. परंतु या गंभीर आणि युद्धजन्य परिस्थितीतही पाकिस्तानच्या सामान्य जनतेने अनोखा मार्ग स्वीकारला आहे. स्वतःचीच खिल्ली उडवण्याचा! सोशल मीडियावर पाकिस्तानी नागरिकांनी आपली विदारक परिस्थिती मीम्स आणि विनोदांद्वारे मांडण्यास सुरुवात केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘जय महाकाली,अयो गोरखाली…’ दुश्मनांचाही थरकाप उडवणारी भारतीय रेजिमेंटची घोषवाक्ये, एकदा वाचाच
पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची स्थिती आधीच डगमगलेली आहे. वीज, पाणी आणि गॅसच्या तीव्र कमतरतेचा सामना करणाऱ्या देशातील नागरिकांना आता भारताकडून संभाव्य हल्ल्याची भीतीही सतावत आहे. देशातील गडगडलेल्या आर्थिक परिस्थितीला आता युद्धाचा नव्याने धोका निर्माण झाला आहे. अशा बिकट काळातही पाकिस्तानी लोकांनी सोशल मीडियावर आपली ‘हास्यफटाके’ फोडण्याची शैली स्वीकारली आहे. अनेक मीम्समध्ये त्यांनी व्यंगात्मक पद्धतीने सांगितले आहे की, “आमच्याकडे आधीच वीज नाही, पाणी नाही, आता बॉम्ब टाकायचा म्हणजे काय फक्त वाळूच उडेल!” काही मीम्समध्ये, पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद केल्यावर लोक म्हणाले, “हवाई क्षेत्र बंद केले, पण उडणार तरी काय? विमानात पेट्रोल भरायला पैसे तरी आहेत का?”
Inka INS Vikrant aye na aye hamra tyar haipic.twitter.com/uLGtRaO1z4 https://t.co/xf7Y6o3PsH
— Chilli Butter (@ChilliButter_) April 25, 2025
credit : social media
कोणीतरी म्हटले की भारताकडे INS विक्रांत आहे, तर आपल्याकडे हे आहे.
‘जंग करनी है तो पहले बिजली ला’ (युद्ध करायचं असेल तर आधी वीज आणा), अशा प्रकारचे संदेश प्रचंड व्हायरल होत आहेत. काहींनी भारताला उद्देशून मजेदार टोले लगावले आहेत — “आमच्याकडे येताना स्वतःची लाईट, गॅस आणि पाणी घेऊन या!” या मीम्सवरून स्पष्ट होते की, जरी देशाची परिस्थिती गंभीर असली, तरी पाकिस्तानातील सामान्य जनतेने आपला आत्मा अद्याप जिवंत ठेवला आहे. कटु वास्तव आणि भीतीच्या काळात विनोदाच्या माध्यमातून ते स्वतःची मानसिकता हलकी करत आहेत.
एका X युजरने लिहिले की, आम्ही अर्ध्या जगाकडून कर्ज घेतले आहे, कोणीही आम्हाला हल्ला करू देणार नाही, आता झोपा.
( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘रक्ताची शपथ आणि बलिदान…’ पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे पहलगामवर पहिलेच विधान
ट्विटर, फेसबुक, आणि इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर पाकिस्तानी लोकांनी मीम्सच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करत विनोदी शैलीने स्वतःवरच टीका केली आहे. काही मीम्समध्ये तर पाकिस्तानच्या अशक्त लष्करी आणि आर्थिक स्थितीचे कारुण्यदर्शक चित्रण करण्यात आले आहे. या विनोदी प्रतिक्रियांमधून पाकिस्तानच्या जनतेचा संयम, स्वावलंबन आणि थोड्याफार प्रमाणात वास्तवाची स्वीकारशक्ती दिसून येते. तणावपूर्ण वातावरणातही त्यांनी हास्याच्या मार्गाने परिस्थितीचा सामना करण्याचा प्रयत्न केला आहे.
These Pak people are roasting themselves on a different level 😭 pic.twitter.com/ckAA4F2So1
— Phunsuk Wangdu (@Phunsukwangduji) April 25, 2025
credit : social media
ही केवळ नेहमीची राजकीय निराशा नाही. हे काहीतरी अधिक खोल, अधिक प्राणघातक आहे. आपण आज जे पाहतो आहोत, ते म्हणजे पतनानंतरचा विडंबनात्मक उद्रेक — प्रतिकारातून नव्हे, तर आत्मसमर्पणातून जन्मलेला. ही अवज्ञा नाही, तर अलिप्ततेची अभिव्यक्ती आहे.
पाकिस्तानी जनता आपल्या लष्कराची, राजकारण्यांची किंवा अपयशी संस्थांची खिल्ली उडवत आहे, कारण ते संतापलेले आहेत असे नव्हे, तर हसण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय त्यांच्या हातात उरलेला नाही.
Pani kholo bc pic.twitter.com/cOOTaVJ4eM
— Abdullah (@ohnoanywayy) April 24, 2025
credit : social media
please bhaizaan 😭🙏 pic.twitter.com/hbLUnLbtob
— Faizan (@faizannriaz) April 24, 2025
credit : social media
Sleep tight, Pakistan social media force is awake. pic.twitter.com/uQVpZCbDwa
— Faizan (@faizannriaz) April 23, 2025
credit : social media
Pakistanis in Pakistan rn: https://t.co/E4xMi2gb4F pic.twitter.com/3ZVUQLGG7g
— Faraz (@albertpainstein) April 23, 2025
credit : social media
Funniest part of it is Indians threatening to nuke Lahore coz they think it’s an important city for Pakistanis. Meanwhile Pakistanis are like https://t.co/Hz22oIyLdY pic.twitter.com/i2IFiTkBSz
— غفران خالد (@maybe_ghuf) April 23, 2025
credit : social media
अल्बर्ट कामू म्हणतो स्वातंत्र्य म्हणजे काय?
ते क्षणभरच प्रकटते जेव्हा तुम्ही विचार करणे थांबवता आणि पुन्हा एकदा तोच दगड ढकलण्यास सुरुवात करता. हाच आहे सिसिफसचा शाप आणि त्यातच त्याचे उत्तरही सामावलेले आहे. भारत सर्व त्रुटींनिशी अजूनही थॉमस जेफरसनच्या आनंदाच्या अधिकाराचा पाठपुरावा करतो. वाढ, असमाधान आणि लोकशाही या मार्गे तो एक उज्वल भविष्य घडवण्याचा प्रयत्न करतो.
पाकिस्तान?
त्याने आता कुठलीही अपेक्षा ठेवणेच सोडून दिले आहे. आणि त्या शांत आत्मसमर्पणात त्याच्या नागरिकांनी स्वतःला एक वेगळ्याच प्रकारच्या दृष्टीकोनात ढाळले आहे. ते विनोदी झाले आहेत, तत्त्वचिंतक झाले आहेत आणि कधीकधी अनिच्छेने का होईना, पण वास्तववादीही झाले आहेत. ते आता निषेध करत नाहीत. बंड करीत नाहीत. ते फक्त मीम करतात. कारण पाकिस्तानात, लोडशेडिंगसोबतच दुःखही येते. आणि वेळेवर पोहोचणारी एकमेव गोष्ट म्हणजे… विनोद.