Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Italy News : बालविवाहाचे समर्थन करणाऱ्या पाकिस्तानी इमामला इटलीतून दिले हाकलून

Italy News : नऊ वर्षांच्या मुलींच्या विवाहाचे समर्थन केल्याची विधाने गुप्त स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आल्यानंतर इटलीने पाकिस्तानी इमाम अली काशिफ याला हद्दपार केले. ब्रेशियातील दोन इस्लामिक केंद्रांमध्ये तो अधूनमधून इमाम म्हणून काम करत होता. ३ एप्रिल रोजी त्याला मालपेन्सा विमानतळावरून इस्लामाबादला रवाना करण्यात आले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 01, 2026 | 08:19 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • गुप्त कॅमेऱ्यात चित्रित झालीत वादग्रस्त विधाने
  • सहा वर्षांपासून इटलीत वास्तव्य ; दोन मशिदींमध्ये इमाम म्हणून काम
  • मालपेन्सा विमानतळावरून पाकिस्तानला रवाना
Italy News : बालविवाहाचे समर्थन केल्याच्या आरोपावरून इटली सरकारने कठोर कारवाई केली आहे . २५ वर्षीय पाकिस्तानी इमाम अली काशिफ याला देशातून हद्दपार करण्यात आले आहे . एका गुप्त स्टिंग ऑपरेशनमध्ये त्याने नऊ वर्षाच्या मुलींच्या लग्नाचे समर्थन केल्याचे समोर आले आहे .

या सगळ्या प्रकारामुळे इटलीमध्ये बालविवाह , धार्मिक शिकवण आणि स्थलांतरितांच्या कायदेशीर जबाबदाऱ्यांवर नव्याने चर्चा सुरु झाली आहे . गेल्याच महिन्यात इटलीमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा वापरावर बंदी घालण्यात आली आहे . यामुळे इटलीमध्ये मुस्लिम आणि बिगर मुस्लिम यांच्यात वाद निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत .

गुप्त कॅमेऱ्यात चित्रित झालीत वादग्रस्त विधाने

या प्रकरणाची सुरवात २५ जानेवारी २०२६ रोजी प्रसारित झालेल्या Fuori dal Coro या इटालियन दूरचित्रवाणी कार्यक्रमातून झाली . या कार्यक्रमातील पत्रकाराने स्वतःला इस्लाम धर्माबद्दल माहिती घेण्यास इच्छुक विद्यार्थी असल्याचे भासवले होते . त्यानंतर ब्रेशियामधील दोन इस्लामिक केंद्रामध्ये गुप्त कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यात आले .

या वेळी दोघेही चर्चा करत असताना काशीफने मुलगी पहिल्या मासिक पाळीनंतर प्रौढ मनाली जाऊ शकते आणि तिचे लग्न होऊ शकते . अशी भूमिका मांडली नऊ वर्षाच्या मुलीसोबत लग्नाचे समर्थन करणारी त्याची विधाने सगळीकडे प्रसारित झाल्यानंतर इटलीमध्ये खूपच तीव्र प्रतिक्रिया उमटल्या . सगळीकडे चर्चा जोरदार सुरु झाल्या . तेव्हा या प्रकरणाची दखल स्थानिक पोलिसांनी घेतली .

Russia Ukraine War : रशियाला अब्जावधींचा फटका! युक्रेनियन सैन्याने उडवला रशियन तेल प्रकल्प; आकाशात धुराचे लोट, पहा VIDEO

सहा वर्षांपासून इटलीत वास्तव्य ; दोन मशिदींमध्ये इमाम म्हणून काम

अली काशिफ हा गेल्या सहा वर्षांपासून इटलीमध्ये राहत होता . ब्रेशिया शहरातील दोन इस्लामिक केंद्रामध्ये तो अधूनमधून इमाम म्हणून धार्मिक मार्गदर्शन करत होता . दूरचित्रवाणीवरील स्टिंग ऑपरेशननंतर त्याच्या विधानांची चौकशी सुरु करण्यात आली . ब्रेशियाचे पोलीस प्रमुख पाओलो सार्तोरी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली .काशिफच्या वाक्यांचा त्याच्या वैचारिकतेचा सामाजिक सुरक्षितता या दृष्टीने विचार करण्यात आला . त्याच्या घराच्या परवानगीला रद्द करण्यात आले . आणि त्याची हद्दपारीची प्रक्रिया सुरु करण्यात आली .

Turkey News : चंद्रमोहीमेसाठी तुर्की सज्ज; २०२७ मध्ये चंद्राच्या दिशेने झेपावणार पहिले स्वदेशी अंतराळयान

मालपेन्सा विमानतळावरून पाकिस्तानला रवाना

इटालियन अधिकाऱ्यांनी अली काशिफला ताब्यात घेऊन मिलानमधील मालपेन्सा विमातळावर नेले . तेथून त्याला बँकॉक मार्गे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे जाणाऱ्या विमानात बसवण्यात आले . या कारवाईनंतर त्याला इटलीतून हद्दपार करण्यात आले . या घटनेमुळे बालविवाहाच्या मुद्यावर इटलीमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत . अल्पवयीन मुलांचे संरक्षण आणि देशातील कायद्यांचे पालन या मुद्द्यांवर इटालियन प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून दिसून आले .

Web Title: Italy deports pakistani imam ali kashif child marriage controversy cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 08:19 PM

Topics:  

  • Child Marriage
  • Italy
  • Marathi News
  • Pakistan News

संबंधित बातम्या

Satara News : महायुतीचा धर्म पाळण्यासाठी जागांवर पाणी सोडले; शिवेंद्रराजेंची कबुली
1

Satara News : महायुतीचा धर्म पाळण्यासाठी जागांवर पाणी सोडले; शिवेंद्रराजेंची कबुली

Turkey News : चंद्रमोहीमेसाठी तुर्की सज्ज; २०२७ मध्ये चंद्राच्या दिशेने झेपावणार पहिले स्वदेशी अंतराळयान
2

Turkey News : चंद्रमोहीमेसाठी तुर्की सज्ज; २०२७ मध्ये चंद्राच्या दिशेने झेपावणार पहिले स्वदेशी अंतराळयान

Neha Pendse Brown Silk Saree Look: ब्राऊन सिल्क साडीत नेहा पेंडसेचा शाही अंदाज; डिपनेक ब्लाऊजने वेधले चाहत्यांचे लक्ष
3

Neha Pendse Brown Silk Saree Look: ब्राऊन सिल्क साडीत नेहा पेंडसेचा शाही अंदाज; डिपनेक ब्लाऊजने वेधले चाहत्यांचे लक्ष

Mini Maldives News : सौंदर्याच्या आड विषारी वास्तव; संगमरवरी कचऱ्याच्या डंपिंग साइटचे पर्यटनस्थळात रूपांतर
4

Mini Maldives News : सौंदर्याच्या आड विषारी वास्तव; संगमरवरी कचऱ्याच्या डंपिंग साइटचे पर्यटनस्थळात रूपांतर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.