Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Minamitorishima: जपानला समुद्राच्या 6 किलोमीटर खोलीवर सापडली मौल्यवान खनिजे; ड्रॅगनचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी टोकियो सज्ज

Rare Earth Minerals : जपानला पॅसिफिक महासागरात हजारो मीटर खोलवर दुर्मिळ खनिजांचा खजिना सापडला आहे, जो त्या देशाची शेकडो वर्षांची गरज भागवू शकतो. या शोधामुळे चीनच्या दादागिरीला पूर्णविराम लागू शकतो.'

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 18, 2026 | 03:30 PM
japan discovers huge rare earth minerals pacific ocean china monopoly ends 2026

japan discovers huge rare earth minerals pacific ocean china monopoly ends 2026

Follow Us
Follow Us:
  • समुद्राखाली सापडला खजिना
  • चीनच्या मक्तेदारीला सुरुंग
  • अमेरिका-जपान युती

China rare earth monopoly broken by Japan : जागतिक तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातील सत्तेचे केंद्र आता बदलण्याच्या उंबरठ्यावर आहे. जपानने पॅसिफिक महासागराच्या तळाशी एक अशी मोहीम फत्ते केली आहे, जी चीनच्या झोपा उडवणारी ठरणार आहे. टोकियोपासून २,००० किलोमीटर अंतरावर असलेल्या मिनामितोरिशिमा या प्रवाळ बेटाजवळ चक्क ६,००० मीटर खोल समुद्रात दुर्मिळ मृदा धातूंचा (Rare Earth Elements) महाकाय खजिना सापडला आहे. हा शोध केवळ विज्ञानाचा विजय नाही, तर जागतिक राजकारणातील एक मोठा सामरिक ‘मैलाचा दगड’ मानला जात आहे.

८०० वर्षांची सोय अन् १६ दशलक्ष टनाचा साठा

शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, या सागरी क्षेत्रात तब्बल १६ दशलक्ष टनांपेक्षा जास्त दुर्मिळ खनिजे दडलेली आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक वाहने, स्मार्टफोन आणि सेमीकंडक्टरसाठी लागणारे डायस्प्रोसियम आणि यट्रियम सारखे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हा साठा जपानची पुढील ७०० ते ८०० वर्षांची गरज आरामात भागवू शकतो. या शोधामुळे जपान आता खनिजांच्या बाबतीत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा साठा असलेला देश बनला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sheikh Hasina : शेख हसीना यांना भारत बांगलादेशच्या हवाली करणार? मोदी सरकारचा मोठा निर्णय; ढाकामध्ये ऐतिहासिक हालचालींना वेग

२०१० च्या जखमेवर जपानचा उतारा

जपानने ही मोहीम इतक्या गांभीर्याने घेण्यामागे एक ऐतिहासिक कारण आहे. २०१० मध्ये सेनकाकू बेटांजवळ झालेल्या वादानंतर चीनने जपानला होणारी खनिज निर्यात थांबवून आर्थिक नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी जपान ९०% खनिजांसाठी चीनवर अवलंबून होता. या संकटामुळे जपानचा वाहन उद्योग हादरला होता. तेव्हाच जपानने आपली रणनीती बदलली आणि चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी समुद्राच्या पोटात शोध सुरू केला. आज जपानचे चीनवरील अवलंबित्व ५० टक्क्यांपर्यंत खाली आले असून, नवीन शोधामुळे ते शून्यावर येण्याची शक्यता आहे.

A study to determine the suitability of Japan’s easternmost island of Minamitorishima as a permanent nuclear waste disposal site has received the nod from the local government. https://t.co/miKM39EvwU — The Japan Times (@japantimes) April 13, 2026

credit – social media and Twitter

‘टोकियो फ्रेमवर्क’ आणि उत्खननाचे आव्हान

६,००० मीटर खोलीवर असलेल्या चिखलातून ही खनिजे बाहेर काढणे हे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत कठीण आणि खर्चिक काम आहे. यासाठी जपानने आता महासत्ता अमेरिकेचा हात धरला आहे. दोन्ही देशांमध्ये ‘टोकियो फ्रेमवर्क’ नावाचा करार झाला असून, अत्याधुनिक ड्रिलिंग जहाजांच्या माध्यमातून हे उत्खनन केले जाणार आहे. यामुळे केवळ जपानलाच नाही, तर अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्राला (रडार, क्षेपणास्त्र प्रणाली) लागणाऱ्या कच्च्या मालासाठी चीनकडे हात पसरवावे लागणार नाहीत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sheikh Hasina : शेख हसीना यांना भारत बांगलादेशच्या हवाली करणार? मोदी सरकारचा मोठा निर्णय; ढाकामध्ये ऐतिहासिक हालचालींना वेग

चीनसोबतचा नवा तणाव आणि आर्थिक सुरक्षा

सध्या चीन आणि जपानमध्ये तैवानच्या मुद्द्यावरून पुन्हा तणाव वाढला आहे. चीनने पुन्हा एकदा निर्बंधांचे शस्त्र उपसले असून काही महत्त्वाच्या साहित्याची निर्यात कमी केली आहे. अशा वेळी मिनामितोरिशिमा बेटाजवळील हा शोध जपानसाठी ‘संजीवनी’ ठरला आहे. जर जपानने या खनिजांचे उत्खनन यशस्वीरीत्या केले, तर जागतिक बाजारपेठेत चीनची एकाधिकारशाही कायमची मोडीत निघेल. जपानचे पंतप्रधान सनाए ताकाइची यांच्या नेतृत्वाखालील सरकारने याला ‘आर्थिक सुरक्षा’ मोहिमेचा भाग म्हटले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जपानला हे खनिज साठे कोठे सापडले आहेत?

    Ans: टोकियोपासून २,००० किलोमीटर अंतरावर असलेल्या पॅसिफिक महासागरातील मिनामितोरिशिमा या प्रवाळ बेटाजवळ ६,००० मीटर खोलीवर हे साठे सापडले आहेत.

  • Que: या शोधामुळे चीनच्या वर्चस्वाला कसा फटका बसेल?

    Ans: सध्या जगभरातील ९०% दुर्मिळ खनिजांवर चीनचे नियंत्रण आहे. जपानला स्वतःचा ८०० वर्षांचा साठा मिळाल्याने चीनचे निर्बंध आणि दादागिरी आता चालणार नाही.

  • Que: 'दुर्मिळ खनिजे' (Rare Earth Elements) कशासाठी वापरली जातात?

    Ans: ही खनिजे इलेक्ट्रिक वाहने, पवनचक्की, स्मार्टफोन, सेमीकंडक्टर, क्षेपणास्त्रे आणि हाय-टेक रडार प्रणाली तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात.

Web Title: Japan discovers huge rare earth minerals pacific ocean china monopoly ends 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • China
  • Japan
  • World news

संबंधित बातम्या

Unique Business Idea : अजब कल्पना अन् गजब कमाई! लोकांची खाज घालवून ‘हा’ तरुण कमावतोय महिन्याला 1400000 रुपये!
1

Unique Business Idea : अजब कल्पना अन् गजब कमाई! लोकांची खाज घालवून ‘हा’ तरुण कमावतोय महिन्याला 1400000 रुपये!

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता
2

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त
3

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू
4

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.