Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Japan Earthquake: जपानमध्ये शक्तिशाली भूकंपाचा धक्का; २३ जण जखमी, टोकियोमध्ये वीजपुरवठा खंडित, रेल्वे सेवा थांबली

पूर्व जपान आणि राजधानी टोकियोला ५.९ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. या घटनेत तेवीस जण जखमी झाले, परंतु त्सुनामीचा धोका नव्हता. भूकंपाचा केंद्रबिंदू इबाराकीजवळ जमिनीखाली ७० किलोमीटर खोल होता.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 23, 2026 | 05:30 PM
Japan Earthquake 2026 Today Tokyo Earthquake magnitude 5.9

Japan Earthquake 2026 Today Tokyo Earthquake magnitude 5.9

Follow Us
Follow Us:
  • शक्तिशाली धक्का आणि नागरिक जखमी
  • वाहतूक अन् सेवांवर परिणाम
  • प्रशासकीय पावले

पूर्व जपान (japan) आणि राजधानी टोकियोसह आसपासच्या अनेक प्रांतांमध्ये पहाटेच्या सुमारास शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची प्राथमिक तीव्रता ५.९ इतकी नोंदवली गेली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास नागरिक गाढ झोपेत असताना अचानक आलेल्या या हादऱ्यांमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड घबराट पसरली. भूकंपाचा धक्का इतका तीव्र होता की, अनेक घरांमधील वस्तू खाली पडल्या तर इमारतींना मोठे हादरे बसले. सुदैवाने या भूकंपानंतर सागरी त्सुनामीचा कोणताही धोका निर्माण झालेला नाही, ज्यामुळे प्रशासनाने आणि नागरिकांनी मोठा सुटकेचा निश्वास सोडला आहे.

जपानच्या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू दक्षिण इबाराकी प्रांतात जमिनीखाली सुमारे ७० किलोमीटर खोलीवर होता. हा भाग जपानमधील अत्यंत संवेदनशील आणि भूकंपप्रवण क्षेत्रांपैकी एक मानला जातो. तर दुसरीकडे, अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेने (USGS) या भूकंपाची तीव्रता ५.८ नोंदवली आहे. भूकंपाचे केंद्र जमिनीच्या आत खोल असल्यामुळे धक्क्यांची तीव्रता व्यापक क्षेत्रावर जाणवली आणि राजधानी टोकियोतही जोरदार थरथर अनुभवायला मिळाली.

गाढ झोपेत बसला धक्का, २३ जण जखमी

या आपत्कालीन घटनेत चार वेगवेगळ्या प्रांतांमध्ये मिळून एकूण २३ नागरिक जखमी झाले आहेत. यामध्ये सैतामा प्रांतात ९, कानागावामध्ये ९, चिबा प्रांतात ४ आणि इबाराकीमध्ये १ व्यक्तीचा समावेश आहे. बहुतांश नागरिक भूकंप झाला तेव्हा घरात झोपलेले होते. धक्क्यांमुळे घाबरून पळताना किंवा घरातील फर्निचर अन् दारांवर आपटल्याने अनेक जण दुखापतग्रस्त झाले. कानागावा प्रांतातील योकोहामा शहरात एका ८० वर्षीय ज्येष्ठ महिलेचा पलंगावरून खाली पडून नितंबाला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : OperationSindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त झालेला जैशचा तळ 15 महिन्यांत पुन्हा उभा; बहावलपूरमधून सॅटेलाइट फोटोंद्वारे खुलासा

भूकंपाचा थेट फटका स्थानिक वाहतूक आणि सार्वजनिक सुविधांना बसला. टोकियो आणि नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस ट्रेन सेवा विस्कळीत झाल्या असून गाड्यांना मोठा विलंब झाला. ईशान्य भागातील लोकल ट्रेन सेवेवरही परिणाम झाला होता. मात्र, ईस्ट जपान रेल्वे कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, देशातील हाय-स्पीड ‘शिंकांसेन बुलेट ट्रेन’ सेवा सुरक्षिततेच्या तपासणीनंतर नियमितपणे सुरू ठेवण्यात आल्या.

सरकारकडून कृती दल स्थापन; वीज आणि पाणीपुरवठा पूर्ववत

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की, आपत्कालीन नुकसानीचा तातडीने अंदाज घेण्यासाठी सरकारने विशेष कृती दल (Task Force) स्थापन केले आहे. भूकंपाचे धक्के बसताच नागरिकांच्या मोबाईलवर आपत्कालीन अलर्ट मेसेज पाठवण्यात आले होते. टोकियोमधील कोटो भागात जमिनीखालील पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते, मात्र पालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती कार्य पूर्ण करून गळती रोखली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  Russia-Ukraine War : रशियाविरुद्ध युक्रेनला मिळणार ‘कवचकुंडल’; फ्रान्स पुरवणार अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रतिबंधक प्रणाली

याशिवाय, टोकियोतील सुमारे ४६० घरांचा वीजपुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता, जो सकाळी टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आला. अणुऊर्जा नियामक प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे की, आसपासच्या अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये किंवा अणुसाहित्य हाताळणाऱ्या सुविधांमध्ये कोणतीही अनियमितता वा धोका आढळून आलेला नाही. गेल्या महिन्यातही जपानच्या क्युशू बेटावरील कुमामोटो भागात ७.१ तीव्रतेचा विनाशकारी भूकंप झाला होता, ज्यामध्ये ३८ जणांचा मृत्यू तर शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या होत्या. त्यामुळे जपान प्रशासन सध्या हाय अलर्टवर असून नागरिकांना पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Japan earthquake today tokyo ibaraki 5 9 magnitude 23 injured marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • Earthquake
  • japan news
  • World news

संबंधित बातम्या

US-Iran War : ‘युरेनियमचा एक ग्रॅमही नाही’, पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या मध्यस्थीवर इराणचा बिनधास्त पवित्रा
1

US-Iran War : ‘युरेनियमचा एक ग्रॅमही नाही’, पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या मध्यस्थीवर इराणचा बिनधास्त पवित्रा

Oregon Shooting: वाढदिवसाची भेट ठरली काळ! आईने भेट दिलेल्या बंदुकीने मुलाने शाळेत केले हत्याकांड; 3 चिमुकल्यांसह शिक्षिकेचा अंत
2

Oregon Shooting: वाढदिवसाची भेट ठरली काळ! आईने भेट दिलेल्या बंदुकीने मुलाने शाळेत केले हत्याकांड; 3 चिमुकल्यांसह शिक्षिकेचा अंत

Israel Election: ‘लक्ष अमेरिकेवर, इस्रायलवर नाही’ उपराष्ट्रपती JD Vance यांचा नेतान्याहूंना पाठिंबा देणास नकार; ट्रम्प सोबत मतभेद
3

Israel Election: ‘लक्ष अमेरिकेवर, इस्रायलवर नाही’ उपराष्ट्रपती JD Vance यांचा नेतान्याहूंना पाठिंबा देणास नकार; ट्रम्प सोबत मतभेद

Marco Rubio: 3 दिवसांच्या भारत यात्रेसाठी मुंबईत धडकले मार्को रुबियो, जयशंकरसह करणार बैठक; जामनगरलाही जाणार
4

Marco Rubio: 3 दिवसांच्या भारत यात्रेसाठी मुंबईत धडकले मार्को रुबियो, जयशंकरसह करणार बैठक; जामनगरलाही जाणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.