Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Japan Crisis: जपानमध्ये ‘लोकसंख्या क्रांती’ की सांस्कृतिक संकट? मशिदींच्या संख्येत विक्रमी वाढ झाल्याने गदारोळ

Japan फुजिसावामध्ये मुस्लिम लोकसंख्येत विक्रमी वाढ होत असताना, एका प्रस्तावित मशिदीमुळे गदारोळ माजला आहे. शिंटो देवस्थानांपेक्षा मोठ्या असलेल्या या धार्मिक वास्तूला स्थानिक रहिवासी विरोध करत आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 18, 2026 | 12:39 PM
japan muslim population growth fujisawa mosque protest shinto shrine 2026

japan muslim population growth fujisawa mosque protest shinto shrine 2026

Follow Us
Follow Us:
  • जपानमध्ये जनआक्रोश
  • लोकसंख्येचा स्फोट
  • सांस्कृतिक संघर्षाची ठिणगी

Muslim population growth in Japan 2026 : निसर्गरम्य आणि आपल्या शिस्तबद्ध संस्कृतीसाठी ओळखला जाणारा जपान सध्या एका अभूतपूर्व सामाजिक संकटातून जात आहे. जपानच्या फुजिसावा (Fujisawa) शहरात एका भव्य मशिदीच्या बांधकामाला स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या विरोधामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. हा वाद केवळ एका इमारतीचा नसून, तो जपानच्या बदलत्या लोकसंख्येचा आणि धोक्यात आलेल्या ‘शिंटो’ (Shinto) परंपरेचा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये हजारो जपानी नागरिक या प्रकल्पाविरोधात निदर्शने करताना दिसत आहेत.

शिंटो देवस्थानांसमोर मशिदीचे आव्हान?

फुजिसावामधील रहिवाशांचा मुख्य आक्षेप मशिदीच्या आकारावर आहे. येथील स्थानिक रहिवाशांच्या मते, प्रस्तावित मशीद ही जवळच असलेल्या पारंपरिक शिंटो देवस्थानांपेक्षा मोठी आणि भव्य आहे. यामुळे परिसराची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख पुसली जाईल, अशी भीती त्यांना सतावत आहे. अनेक सार्वजनिक सभांमध्ये या मुद्द्यावरून वाद झाले असून, परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. आंदोलकांचे म्हणणे आहे की, जपानने आपल्या परंपरा जपल्या पाहिजेत आणि कोणत्याही विदेशी संस्कृतीला स्थानिक वारशापेक्षा मोठे होता कामा नये.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Paris Summit: ‘मॅक्रॉन यांनी मेलोनींना मारली मिठी अन् Kiss…’ पॅरिस शिखर परिषदेतील ‘तो’ VIDEO VIRAL; मेलोनींची खास प्रतिक्रिया

लोकसंख्येची धक्कादायक आकडेवारी

वासेदा विद्यापीठाचे तज्ज्ञ हिरोफुमी तानादा यांच्या आकडेवारीनुसार, जपानमध्ये मुस्लिम समुदायाची वाढ थक्क करणारी आहे. २०१० मध्ये जपानमध्ये केवळ १ लाख १० हजार मुस्लिम होते, जे २०२४ च्या अखेरीस ४ लाख २० हजार झाले आहेत. अवघ्या १०-१५ वर्षांत ही लोकसंख्या चौपट झाली आहे. परिणामी, २००८ मध्ये संपूर्ण जपानमध्ये केवळ ५० मशिदी होत्या, ज्यांची संख्या २०२५ पर्यंत १६० च्या पार पोहोचली आहे. टोकियो, ओसाका आणि योकोहामा यांसारखी मोठी शहरे आता मुस्लिमांचे केंद्र बनू लागली आहेत.

🚨 Thousands of Japanese gathered to protest the construction of the first mosque in Fujisawa. The proposed mosque would be much larger than the nearby sacred Shinto shrine, an act of provocation! pic.twitter.com/BpfrPydAxw — Global News & Geopolitics 🌍 (@GlobalNewsGeo) April 13, 2026

credit – social media and Twitter

बदलत्या धोरणांचा परिणाम

जपानमधील हा बदल आकस्मिक नाही. देशातील घटता जन्मदर आणि वेगाने वृद्ध होत चाललेली लोकसंख्या यामुळे जपानला ‘वर्कफोर्स’ची (कामगारांची) प्रचंड कमतरता भासत आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी जपानी सरकारने इंडोनेशिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि इराणमधील कामगारांना आपले दरवाजे उघडले. हे कामगार प्रामुख्याने आयटी, तांत्रिक क्षेत्र आणि नर्सिंगमध्ये काम करत आहेत. मात्र, त्यांच्यासोबत आलेल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आता जपानच्या मूळ संस्कृतीशी संघर्षात येत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Islamabad Talks: युद्धाच्या सावटात शांततेची नवी पहाट! US-Iran पुन्हा आमनेसामने; इस्लामाबादमध्ये ‘या’ दिवशी ठरणार जगाचे भवितव्य

धार्मिक स्वातंत्र्य विरुद्ध सांस्कृतिक रक्षण

जपानच्या घटनेने धार्मिक स्वातंत्र्य दिले असले तरी, जपानी समाजात आपली ओळख जपण्याची भावना खूप तीव्र आहे. फुजिसावा मशिदीच्या प्रतिनिधींनी आम्ही जपानच्या नियमांचे पालन करू, असे आश्वासन दिले असले तरी स्थानिकांचे समाधान झालेले नाही. जपानमधील अनेक तज्ज्ञांचे मते, जर हीच गती कायम राहिली, तर येत्या काही दशकांत जपानचे लोकसंख्याशास्त्रीय चित्र पूर्णपणे बदललेले असेल. हा प्रश्न आता केवळ धर्माचा नसून जपानच्या भविष्यातील अस्तित्वाचा बनला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जपानमध्ये मुस्लिम लोकसंख्या वाढण्याचे मुख्य कारण काय?

    Ans: जपानमधील कामगारांची कमतरता भरून काढण्यासाठी सरकारने परदेशी कामगारांसाठी धोरणे शिथिल केली आहेत, ज्यामुळे इंडोनेशिया, पाकिस्तान आणि बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले आहे.

  • Que: फुजिसावामध्ये मशिदीला विरोध का होत आहे?

    Ans: प्रस्तावित मशीद स्थानिक पारंपरिक शिंटो देवस्थानांपेक्षा मोठी असल्याने ती परिसराची सांस्कृतिक ओळख नष्ट करेल, असा रहिवाशांचा आरोप आहे.

  • Que: जपानमध्ये सध्या किती मशिदी आहेत?

    Ans: २००८ मध्ये मशिदींची संख्या ५० होती, जी २०२५ पर्यंत १६० पेक्षा जास्त झाली असल्याचा अंदाज आहे.

Web Title: Japan muslim population growth fujisawa mosque protest shinto shrine 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 12:39 PM

Topics:  

  • Japan
  • Muslim Community
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.