
Japan's new PM Sane Takaichi's talks with Trump
Japan PM Sane Takaichi Talks with Trump : टोकियो/वॉशिंग्टन : जपानच्या (Japan) नव्या पंतप्रधान साने ताकाइची यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याशी चर्चा केली आहे. २५ ऑक्टोबर रोजी फोनवरुन दोन्ही नेत्यांमध्ये पहिली अधिकृत चर्चा झाली. साने ताकाइची यांनी पंतप्रधान म्हणून पदाभार स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांच्याशी पहिली थेट संवाद होता.
पुन्हा शाहबाज आणि मुनीरच्या प्रेमात ट्रम्प! ASEAN परिषदेदरम्यान ‘महान व्यक्ती’ म्हणत केले कौतुक
ही चर्चा अशा वेळी झाली आहे, जेव्हा ट्रम्प मलेशियात होणाऱ्या ASEAN शिखर परिषदेसाठी गेले आहेत. तसेच या परिषदेतनंतर ट्रम्प २७ ऑक्टोबर रोजी जपानला जाणार आहेत. यावेळी ते साने ताकाइची यांची भेट घेतील. या भेटीत दोघांमध्ये जपान अमेरिकेतील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यातवर चर्चा होईल.
या संवादादरम्यान ट्रम्प यांना साने ताकाइची यांच्या निवडणूकीतील विजयाबद्दल आणि पंतप्रधान पद स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच त्यांनी जपानचे माजी पंतप्रधान आणि ताकाइची यांचे गुरु शिंजो आबे यांना आदरांजली
वाहली. ताकाइची यांनी सांगितले की, ट्रम्प यांनी त्यांच्या अगदी हसतमुखपणे संवाद साधला. दोघांमधील चर्चा फलदायी ठरली. ताकाइची आणि ट्रम्प यांचा संवाद आशिया प्रांताच्या धोरणात्मक भागादारीसाठछी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
सध्या ट्रम्प मलेशियात ४७ व्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पोहोचले आहे. येथे ते द्विपक्षीय परिषदेत भाग घेतील. याशिवाय यानंतर ट्रम्प जपान, दक्षिण कोरियाला भेट देणार आहेत. या परिषदेत चीन, भारत, रशिया, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांचा समावेश आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. कोण आहेत जपानच्या नव्या पंतप्रधान?
साने ताकाइची यांची जपानच्या पहिला महिल्या नव्या पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे.
प्रश्न २. साने ताकाइची यांनी ट्रम्प यांच्याशी काय चर्चा केली?
साने ताकाइची यांनी ट्रम्प यांच्याशी अमेरिका आणि जपानमधील संबंध नव्या उंचीवर नेण्यावर चर्चा केली.
प्रश्न ३. ट्रम्प जपानच्या दौऱ्यावर कधी जाणार आहेत?
मलेशियातील ASEAN परिषदेनंतर २७ ऑक्टोबर रोजी ट्रम्प जपानला जाणार आहेत.
Japan’s 1st Women Prime Minister: साने ताकाइची बनणार जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान