पुन्हा शहबाज आणि मुनीरच्या प्रेमात ट्रम्प! ASEAN परिषदेदरम्यान 'महान लोक' म्हणते केले कौतुक (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Donald Trump praises Shehbaaz and Munir : क्वालालंपूर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे पाकिस्तानवरील प्रेम पुन्हा उफाळून आले आहे. गेल्या काही काळात ट्रम्प यांचा पाकिस्तानकडे झुकाव वाढत आहे. पाकिस्तानकडून जमीन, खनिजे आणि इतर फायदे मिळवण्याच्या स्वप्नात ट्रम्प वेडे झाले आहे. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशाची सतत प्रशंसा करत आहेत.
ट्रम्प सध्या मलेशियात आसियान शिखर परिषदेसाठी गेले आहे. यादरम्यान त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaaz Sharif) आणि लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) यांचे महान व्यक्ती म्हणून कौतुक केले आहे. यामुळे जागतिक पातळीवर चर्चांणा उधाण आले आहे. याशिवाय ट्रम्प यांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील विवाद लवकर सोडवण्याचे आश्वासनही दिले आहे.
मलेशियात थायलंड आणि कंबोडियाच्या शांतता करारवर स्वाक्षरी दरम्यान ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. त्यांनी थायलंड-कंबोडियाच्या युद्धबंदीच्या पार्श्वभूमीवर म्हटले की, दशकांपासून सुरु असलेला संघर्ष त्यांनी थांबवला असून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये देखील ते शांतता प्रस्थापित करतील असे म्हटले. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानचे शाहबाज आणि मुनीर महान व्यक्ती आहे, यामुळे यामध्ये लवकरच यश मिळेल.
VIDEO | Kuala Lumpur, Malaysia: USA President Donald Trump (@POTUS) said, “Ended 8 wars in 8 months. I heard that Pakistan and Afghanistan have started up, but I will solve it very quickly. Pakistan Field Marshal and PM are great people.” (Full video available on PTI Videos-… pic.twitter.com/l8yYpyZo8h — Press Trust of India (@PTI_News) October 26, 2025
पुन्हा मुनीरला व्हाइट हाउस भेटीचे आमंत्रण
ट्रम्प यांनी या वर्षी अनेक वेळा पाकिस्तानच्या लष्करप्रमुख असीम मुनीर यांची भेट घेतली आहे. त्यांनी अनेक वेळा पत्रकारांशी बोलताना शरीफ आणि मुनीरची विशेष प्रशंसा केली आहे. ट्रम्प यांनी दोघांना पुन्हा एक महान व्यक्तिमत्त्व संबोधत व्हाइट हाइसमध्ये भेटीचे आंमत्रण दिले आहे. सध्या ट्रम्प यांच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे. जागतिक स्तरावर याचीच चर्चा सुरु आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. ट्रम्प यांनी कोणाचे केले कौतुक?
डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख यांचे महान व्यक्तीमत्त्व म्हणून कौतुक केले आहे.
प्रश्न २. ट्रम्प यांना पाकिस्तानला कोणते आश्वासन दिले?
ट्रम्प यांना पाकिस्तानला अफगाणिस्तानसोबतचा संघर्ष लवकरात लवकर थांबवण्याचे आश्वासन दिले आहे.
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा कॅनडावर नाराज! ‘या’ कारणावरुन उसळला वाद ; लावला १०% अतिरिक्त कर






