(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कनेक्टिकटमधील न्यू कनान येथील रहिवासी लेस्ली ग्रॉफ हिचे नाव एपस्टीनच्या फाइल्समध्ये १.५ लाख वेळा आहे. या महिलेच्या नावाने जगभरात खळबळ उडाली आहे. लेस्ली जेफ्रीची एक्झिक्यूटीव्ही अस्टिंट म्हणून काम करत होती. २००१ ते २०१९ मध्ये तिने जेफ्रीच्या मृत्यूपर्यंत लेस्ली सावलीसारखी सोबत राहिली होती असे सांगितले जाते. तिने जवळपास २० वर्षे एपस्टीनची सहाय्यक म्हणून काम केले आहे. एपस्टाईन आणि घिसलेन मॅक्सवेलने मिळून तिची नियुक्त केली होती. जेफ्रीसोबत काम करण्यापूर्वी ती इव्हेंट प्लॅनर म्हणून काम करायची.
कागपत्रांनुसार, २००१ ते २०१९ पर्यंतच्या जेफ्रीच्या लैंगिक तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये लेस्लीचाही सहभाग होता. ग्रॉफ एपस्टीनसाठी त्याचे वेळापत्रक, बैठका आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंटचे काम करायची. कोणालाही एपस्टीनशी संपर्क करायचा असेल तर आधी त्याचा कॉल लेस्ली ग्रॉफला जायचा. जेफ्रीच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत सर्वांचे व्यवस्थापन लेस्ली ग्रॉफ करत होती असे कागपत्रांमध्ये सांगण्यात आले आहे. वुडी अॅलन, स्टीव्ह बॅनन, प्रिन्स अँड्र्यू यांसारख्या सेलिब्रिटींच्या संपर्कात लेस्ली राहायची.
ग्रॉफविरुद्ध खटले
मीडिया रिपोर्टनुसार, लेस्ली ग्रॉफविरोधात अनेक दिवाणी खटले दाखल करण्यात आले आहेत. तिच्यावर मसाजच्या नावाखाली पीडितांसाठी बैठका आयोजित केल्याचा आरोप आहे. परंतु तिला कोर्टाने क्लीन चीट दिली असल्याने सर्व खटले मागे घेण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जेफ्री लेस्लीला लेस्लीला २००,००० डॉलर्सचा पगार होता. अहवालांमधील माहितीनुसार, तिच्याकडे सध्या कनानमध्ये असलेले घर ४.२ दशलत्र डॉलर्सचे असून गेल्या दहा वर्षांपासून आहे. तिला एपस्टीनने एक मर्सडिजही गिफ्टमध्ये दिली होती.
आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री






