
Epstein New File Release
Epstein च्या घराचे धक्कादायक वास्तव! सर्वत्र लटकवलेत अल्पवयीन मुलांचे अश्लील फोटो
अमेरिकेच्या न्याय विभागाने दक्षिण न्यूयॉर्क डिस्ट्रिक्टरमधील ॲटर्नी कार्यालय आणि FBI कडून ही नवी कागपत्रे प्राप्त झाली आहेत. ही कागपत्रे एपस्टीन फाइल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट, कायदे आणि न्यायालीन आदेशांचे पाल करुन तपासली आणि प्रसिद्ध केली जात आहे. कागपत्रांची संख्या अधिक असल्याने अमेरिकेच्या न्यायविभागाकडून योग्यरित्या तपासणीसाठी २४ तास काम करत आहे. यामुळे या प्रक्रियेला आणखी आठवडा लागण्याची शक्यता आहे. तसेच पीडीतांच्या ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी देखील काळजी घेतली जात असल्याचे न्याय विभागाने म्हटले आहे.
दरम्यान एक दिवापूर्वीच एपस्टीन प्रकरणात ३० हजार कागदपत्रे खुली करण्यात आली होती. या कागपत्रांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याबाबत खळबळजनक दावे करण्यात आले होते. तसेच यामध्ये ट्रम्प यांच्या मार-ए-लागो क्लबलशी संबंधित २०२१ मधील एक प्रकरण आणि १९९५ मधील काही जुन्या फाइल्सचा समावेश आहे. सध्या अमेरिकेच्या न्याय विभागाने ही कागपत्रे खोटी असल्याचा दावा केला असून ट्रम्पविरोधात शस्त्रे म्हणून वापरली जाऊ शकतात असे म्हटले आहे.
दरम्यान जेफ्री एपस्टीनचा २०१९ मध्ये तुरुंगात असताना मृत्यू झाला आहे. त्याने आत्महत्या केली असल्याचा अधिकृत दावा करण्यात आला होता. परंतु आजही त्याचा मृत्यू गूढ बनून आहे. तसेच एस्टीनचा मृत्यू झाला नसून त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने याची पुष्टी केली होती. परंतु एपस्टीनच्या मृत्यूची कागपत्रे बनावट असल्याचे अमेरिकेच्या न्याय विभागाने म्हटले आहे. न्याय विभागाच्या मते, एपस्टीनच्या सुसाइड नोटमधील हस्तक्षर आणि एपस्टीनचे मुळ हस्ताक्षर जुळत नसून त्याच्या मृत्यूच्या तीन दिवसानंतरच त्यावर शिक्का मारण्यात आला होता. या प्रकरणाची कोणत्याही प्रकारची तपासणी करण्यात आली नव्हती. एपस्टीनच्या मृत्यूनंतर त्याच्या फाइल्समधून अनेक रहस्य उघडकीस आली आहेत. सध्या जगभरात यावरच चर्चा केली जात आहे.
Jeffrey Epstein Files : असा मिळायचा अल्पवयीन मुलींना ‘भाव’ ; एक रशियन तब्बल ‘इतक्या’ डॉलर्सला