
thailand clarification on Lord Vishnu Idol Demolished in Cambodia
‘हा हिंदूंचा अपमान…’ ; कंबोडियात भगवान विष्णूच्या मूर्तीची तोडफोड; भारताने घेतला आक्षेप
या आवड्याच्या सुरुवातील कंबोडिया आणि थायलंडमध्ये सीमावर्ती भागात थाई सैन्याने भगवान विष्णूची मूर्ती पाडली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जगभरातील हिंदू भक्तांमध्ये तीव्र संताप उफाळला होता. तसेच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील यावर नाराजी व्यक्त केली होती. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाते प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले की, थाई-कंबोडिया सैन्यात झालेल्या सीमावादात प्रभावित झालेल्या एका भागात भगवान विण्षूच्या मंदिराची तोडफोड करण्यात आली असल्याची माहिती मिळाली असून ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. हा हिंदू संस्कृतीचा अनादर असून भाविकांच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचवणारा आहे.
दरम्यान भारत सरकारच्या या प्रतिक्रियेवर थाई-कंबोडियन सीमावर्तीत माध्यम विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ही कारवाई धर्म किंवा श्रद्धेला ठेच पोहोचवण्यासाठी करण्यात आलेली नाही. या प्रदेशावर थाई सैन्याने पुन्हा नियंत्रण मिळवले आहे. यामुळे या क्षेत्राचे व्यवस्थापन आणि सुरक्षा निश्चित करण्याचे काम सुरु आहे. तसेच या मूर्तीला धार्मिक स्थळ म्हणून मान्यता मिळाली नव्हती. हे केवळ सीमावर्ती भागातून संवेदनशील चिन्हे हटवण्यासाठी करण्यात आले असल्याचे थाई लष्कराने म्हटले आहे. थालंडच्या मते, कंबोडिाने जाणूनबुजून चोंग अन मा परिसरात ही मूर्ती उभारली होती.
थायलंडनने म्हटले आहे की, ते हिंदू धर्माचा इतर धर्मांप्रमाणेच आदर करतात. हिंदू धर्माशी, धर्मीयाशी थायलंडचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहे. यामुळे थाई लष्कराने स्पष्ट केले की, त्यांचा हिंदू धर्माचा अनादर करण्याचा किंवा धार्मिक भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता. दरम्यान कंबोडियाने मात्र थायलंडवर त्यांच्या हद्दीतील भगवान विष्णूची मूर्ती पाडल्याचा आरोप केला आहे.