Epstein च्या घराचे धक्कादायक वास्तव! सर्वत्र लटकवलेत अल्पवयीन मुलांचे अश्लील फोटो (फोटो सौजन्य: @nypost)
DoJ ने खुल्या केलेल्या नव्या कागदपत्रांनुसार, एपस्टीनच्या मॅनहॅटनमधील घरामध्ये भितींवर अल्पवयीन मुला-मुलींचे अश्लील, आक्षेपहार्य फोटो आणि भयावह कलाकृती लटकवलेल्या आहेत. DoJ ने तब्बल ३० हजार कागपत्रे खुली केली असून यामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण जग हादरले आहे. या फाइल्समध्ये अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा करण्यात आला आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, एपस्टीनच्या ७ मजली, २१ हजार स्क्वेअरफूट घरामध्ये मुलांच्या आकृत्या, अश्लील फोटो, विचित्र पेटिंग्स आणि धक्कादायक अशा सजावटी पाहायला मिळाल्या आहेत. याचे काही फोटो देखील शेअर करण्यात आले आहेत.
या नव्या फोटोंमध्ये एक असाही फोटो आहे, ज्यामध्ये एपस्टीनच्या खाद्यांवर एक लहान मुलगी बसलेली आहे. यामुळे एपस्टीनवर लावण्यात आलेल्या आरोपांना आणखी गंभीर वळणे मिळाले आहे. तसेच या प्रकरणाने अमेरिकेच्या राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.
दरम्यान या फाइल्समध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव आल्याने हा वाद अधिक उफळला आहे. काही कागदपत्रांमध्ये ट्रम्प यांनी एपस्टीनसोबत खासगी विमानांमधून प्रवास केल्याचा दावा केला जात आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या म्हणण्यानुसार, हे दावे आधीच तपासले गेले होते परंतु ते निराधार असल्याचे दाखवण्यात आले होते.
Latest Jeffrey Epstein file dump reveals troubling art of kids in NYC townhouse, disturbing role-play costumes https://t.co/N0knyj3wOP pic.twitter.com/L7foQGcfS5 — New York Post (@nypost) December 23, 2025
दरम्यान जेफ्री एपस्टीनचा २०१९ मध्ये तुरुंगात असताना मृत्यू झाला आहे. त्याने आत्महत्या केली असल्याचा दावा अधिकृतपणे केला जातो, पकंतु आजही त्याचा मृत्यू गूढ बनून आहे. एपस्टीनच्या मृत्यूनंतर त्याच्या फाइल्समधून अनेक रहस्य उघडकीस आली आहेत. सध्या जगभरात यावरच चर्चा केली जात आहे.
Jeffrey Epstein Files : असा मिळायचा अल्पवयीन मुलींना ‘भाव’ ; एक रशियन तब्बल ‘इतक्या’ डॉलर्सला
Ans: अमेरिकेच्या न्याय विभागाने (DoJ) ने जेफ्रीच्या मॅनहॅटनमदील आलिशान घराती काही फोटोज सार्वजनिक केली आहेत. या फोटोजमध्ये अल्पवयीन मुलांचे भयावर अश्लील, आक्षेपहार्य फोटो, कलाकृती दिसत आहेत.
Ans: जेफ्री एपस्टीन हा अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार होता. त्याच्यावर अल्पवयीन मुली आणि महिलांच्या लैंगिक शोषणाचा आणि मानवी तस्करीचा आरोप होता. त्याच्याशी संबंधित सरकारी कागदपत्रे, फोटो, आणि पुरावे उघड करण्यात आली आहेत.
Ans: अमेरिकेच्या न्याय विभागाने (DoJ) ने जेफ्रीच्या प्रकरणासंबंधी ३० हजार कागपत्रे सार्वजनिक केली आहेत.
Ans: एपस्टीन फाइल्स अमेरिकेच्या न्याय विभागाने १९ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक केल्या आहेत.
Ans: जेफ्री एपस्टीनकडे २०१९ मध्ये मृत्यूवेळी ५६० ते ६०० दशलक्ष डॉलर्स नेटवर्थ होते.






