मध्यपूर्वेत अमेरिकेला मोठा धक्का! इराण मोहिमेवरील इंधन भरणारे विमान इराकमध्ये कोसळले; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
US Aircraft Crash Iraq 2026: मध्यपूर्वेतील युद्ध (US-Israel Iran War) आता अधिक भीषण आणि गुंतागुंतीचे होत चालले आहे. इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईचा भाग असलेल्या अमेरिकन हवाई दलाच्या एका मोठ्या विमानाला इराकमध्ये भीषण अपघाताचा सामना करावा लागला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम इराकमध्ये अमेरिकेचे ‘केसी-१३५’ (KC-135) हे इंधन भरणारे टँकर विमान कोसळले आहे. या अपघातामुळे अमेरिकन गोटात खळबळ उडाली असून तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी अमेरिकेची दोन ‘केसी-१३५’ इंधन भरणारी विमाने इराणविरुद्धच्या मोहिमेसाठी उड्डाण करत होती. ही विमाने आकाशातच लढाऊ विमानांना इंधन भरण्याचे काम करतात. यापैकी एक विमान तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम इराकमध्ये कोसळले, तर दुसरे विमान सुरक्षितपणे तळावर उतरवण्यात वैमानिकाला यश आले. अमेरिकन सैन्याने स्पष्ट केले आहे की, हा अपघात कोणत्याही शत्रूच्या गोळीबारामुळे झालेला नाही, तर ही एक तांत्रिक दुर्घटना आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iron Beam: इस्रायलचं अजेय ‘ब्रह्मास्त्र’ पडलं थंड; सर्वात महागड्या लेझर सिस्टीमचा हिजबुल्लाहच्या ड्रोन आर्मीने उडवला धुव्वा
या भीषण अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले असले तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विमानात असलेले सर्व सहा क्रू मेंबर्स (F-15E Strike Eagles पथकातील) सुरक्षितपणे बाहेर पडले आहेत. अमेरिकन लष्कराने सांगितले की, बचाव पथकाने त्यांना सुरक्षित स्थळी हलवले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सेंट्रल कमांडने या घटनेचा तपास सुरू केला असून परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
🟥 According to CBS News, another KC-135 was involved in the crash of a KC-135 Stratotanker refueling aircraft belonging to the US Air Force, which occurred this evening over western Iraq. ✈️ There were six military personnel on board the plane that crashed in Iraq, while the… pic.twitter.com/bE6REftou7 — Visioner (@visionergeo) March 12, 2026
credit – social media and Twitter
हा अपघात अशा वेळी झाला आहे जेव्हा इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. इराण युद्धात आतापर्यंत ७ अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर १४० हून अधिक सैनिक जखमी झाले आहेत. पेंटागॉनच्या अहवालानुसार, जखमींपैकी ८ जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. गेल्या आठवड्यातही कुवेती लष्कराच्या चुकून झालेल्या गोळीबारात अमेरिकेची तीन लढाऊ विमाने पाडली गेली होती. त्यामुळे लष्करी विमानांचा हा चौथा मोठा अपघात मानला जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz: समुद्रातील ती ‘अदृश्य’ भिंत! भारतीय टँकर झालं गायब आणि प्रगटलं थेट मुंबईत; वाचा कसा चुकवला सुरक्षा घेरा?
‘केसी-१३५ स्ट्रॅटोटँकर’ हे अमेरिकन हवाई दलाचा कणा मानले जाते. ही विमाने आकाशातच लढाऊ विमानांना इंधन पुरवतात, ज्यामुळे विमानांना जमिनीवर न उतरता तासनतास शत्रूवर हल्ले करता येतात. अशा महत्त्वाच्या विमानाचा अपघात होणे हा अमेरिकन हवाई दलासाठी मोठा धोरणात्मक फटका आहे. सध्या पश्चिम इराकमध्ये लष्करी हालचाली वाढल्या असून अमेरिकन सेंट्रल कमांड परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
Ans: अमेरिकन हवाई दलाचे 'केसी-१३५' (KC-135) हे इंधन भरणारे (Refueling Tanker) विमान पश्चिम इराकमध्ये कोसळले.
Ans: या विमानात ६ क्रू मेंबर्स होते आणि ते सर्व सुरक्षित आहेत. मात्र, संपूर्ण इराण युद्धात आतापर्यंत ७ अमेरिकन सैनिक शहीद झाले आहेत.
Ans: नाही, अमेरिकन सेंट्रल कमांडने स्पष्ट केले आहे की हा अपघात शत्रूच्या गोळीबारामुळे झालेला नाही.






