Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Israel Iran war: खामेनींच्या मृत्यूचे पडसाद पाकिस्तानात; आंदोलकांचा अमेरिकन दूतावासावर हल्ला, गोळीबारात 8 जणांचा करुण अंत

Shia Protest: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्युची बातमी आल्यानंतर, कराचीतील अमेरिकन वाणिज्य दूतावासाबाहेर निदर्शने करण्यात आली. पाकिस्तानातील कराचीमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू झाली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 01, 2026 | 01:35 PM
karachi us consulate attacked ali khamenei death protest 8 killed

karachi us consulate attacked ali khamenei death protest 8 killed

Follow Us
Follow Us:
  • कराचीत रक्ताचा सडा
  • युद्धभूमीसारखी परिस्थिती
  • संपूर्ण शहर वेढलं

US Consulate Karachi attacked news today : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्याचे सर्वात भीषण पडसाद शेजारील देश पाकिस्तानमध्ये उमटले आहेत. कराची शहरात रविवारी संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. खामेनी यांच्या हत्येला अमेरिका जबाबदार असल्याचा आरोप करत हजारो आंदोलकांनी कराचीतील अमेरिकन वाणिज्य दूतावासाला (US Consulate) लक्ष केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, पोलीस आणि आंदोलकांमधील चकमकीत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने पाकिस्तानमध्ये गृहयुद्धासारखी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

दूतावासावर ‘लष्करी’ थाटात हल्ला आणि तोडफोड

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास कराचीतील माई कोलाची परिसरात हजारो आंदोलक जमले होते. सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाचे रूपांतर अवघ्या काही मिनिटांत भीषण दंगलीत झाले. “अमेरिका मुर्दाबाद” आणि “खामेनींचा बदला घेणारच” अशा घोषणा देत जमावाने अमेरिकन दूतावासाच्या दिशेने कूच केली. आंदोलकांनी पोलीस बॅरिकेड्स तोडले आणि दूतावासाच्या इमारतीवर दगडफेक केली. काही आंदोलक संरक्षण भिंत ओलांडून आत घुसण्यात यशस्वी झाले, जिथे त्यांनी तोडफोड सुरू केली. या गोंधळात आणि चेंगराचेंगरीत ८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Epic Fury: युद्ध नाही, हा तर विनाश! अमेरिकेच्या ‘Scorpion Strike’ने आकाशातून पाठवले मृत्यूदूत,पहा ‘हा’ थरारक VIRAL VIDEO

पोलिसांचा अश्रूधूर आणि गोळीबाराचा वापर

परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून कराची पोलिसांनी आणि निमलष्करी दलाने (Rangers) बळाचा वापर सुरू केला. सामा टीव्हीच्या वृत्तानुसार, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी शेकडो अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. दूतावासाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी हवेत गोळीबार केल्याचेही वृत्त आहे. सध्या संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला असून, कोणालाही आत किंवा बाहेर जाण्याची परवानगी नाही.

#BREAKING: US Consulate in Karachi under attack in Trump’s favourite country Pakistan. Protestors have barged in and destroyed building and set portions on fire. pic.twitter.com/lZXYaVOtuY — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) March 1, 2026

credit – social media and Twitter

कराचीचे मुख्य रस्ते बंद; जनजीवन विस्कळीत

या हिंसाचाराचा मोठा फटका कराचीच्या वाहतुकीला बसला आहे. प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव माई कोलाची आणि सुलतानाबादला जोडणारे सर्व मुख्य मार्ग बंद केले आहेत. शहरात ठिकठिकाणी निदर्शने सुरू असल्याने भीतीचे वातावरण आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. खामेनी यांच्या निधनामुळे पाकिस्तानातील शिया समुदायामध्ये प्रचंड दुःख आणि संताप असून, हा भडका इतर शहरांमध्येही पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ayatollah Ali Khamenei: शिया राजकारणाचा मेरुमणी कोसळला; इराणला अण्वस्त्रशक्ती बनवणाऱ्या ‘अदृश्य’ सम्राटाचा ‘असा’ होता जीवनप्रवास

जागतिक तणाव आणि पाकिस्तानची कोंडी

खामेनींच्या मृत्यूनंतर अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध मुस्लीम जगात प्रचंड रोष आहे. पाकिस्तानमध्ये झालेला हा हल्ला अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अमेरिकन सरकारने पाकिस्तानला आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी देण्यास सांगितले आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते. आता संपूर्ण जगाचे लक्ष पाकिस्तान सरकारच्या पुढील पावलाकडे लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कराचीतील अमेरिकन दूतावासावर हल्ला का झाला?

    Ans: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूला अमेरिका जबाबदार असल्याचा दावा करत संतप्त आंदोलकांनी हा हल्ला केला.

  • Que: या हिंसाचारात आतापर्यंत किती लोकांचा मृत्यू झाला आहे?

    Ans: ताज्या वृत्तानुसार, कराचीतील आंदोलनादरम्यान आणि पोलिसांच्या कारवाईत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Que: कराचीमध्ये सध्या कोणकोणते रस्ते बंद आहेत?

    Ans: सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने माई कोलाची आणि सुलतानाबाद कडे जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत.

Web Title: Karachi us consulate attacked ali khamenei death protest 8 killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • America and Pakistan
  • Iran Israel Conflict
  • Iran-Israel War
  • World War 3

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.