Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

VIRAL VIDEO : ‘आज रात्री गोळीबार होणार आहे’ घटना घडण्यापूर्वीच ट्रम्प यांच्या प्रेस सेक्रेटरीने कसे केले होते याचे ‘भाकीत’?

Gunshot in White House : व्हाइट हाऊस डिनरमधील गोळीबारापूर्वी कॅरोलिन लेविट यांचे "गोळीबार होईल" हे वक्तव्य व्हायरल झाले, ज्यामुळे सुरक्षा आणि त्या भीषण घटनेबद्दल नवीन चर्चा सुरू झाली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 26, 2026 | 09:38 AM
karoline leavitt prediction white house dinner shooting trump security update 2026

karoline leavitt prediction white house dinner shooting trump security update 2026

Follow Us
Follow Us:
  • धक्कादायक ‘भाकीत’
  • हाय-प्रोफाईल हल्ला
  • ट्रम्प यांची प्रतिक्रिया

Karoline Leavitt fire shots video 2026 : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. सध्या एका अत्यंत नाट्यमय आणि तितक्याच भीतीदायक घटनेमुळे चर्चेत आहे. निमित्त होते ‘व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डंट्स डिनर’ (WHCD) या दिमाखदार सोहळ्याचे. मात्र, या सोहळ्याच्या झगमगाटात गोळ्यांच्या आवाजाने मिठाचा खडा टाकला. विशेष म्हणजे, या घटनेपेक्षाही जास्त चर्चा सध्या ट्रम्प (Donald Trump) यांच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांच्या एका व्हायरल व्हिडिओची होत आहे, ज्यामध्ये त्यांनी या घटनेचे जणू ‘भाकीत’ वर्तवले होते.

कॅरोलिन लेविट यांच्या ‘त्या’ शब्दांनी उडाली झोप!

कार्यक्रमाच्या काही तास आधी कॅरोलिन लेविट यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्या प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहण्याचे आवाहन करत होत्या. बोलता बोलता त्यांनी गमतीने म्हटले की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आज आक्रमक भूमिकेत असतील आणि ‘गोळीबार’ (There will be fire shots) होईल.” लेविट यांना त्यावेळी राजकीय टीका-टिप्पणीच्या संदर्भात ‘शाब्दिक गोळीबार’ अभिप्रेत होता, पण रात्री प्रत्यक्षात गोळ्या झाडल्या गेल्याने हा एक भयावह योगायोग ठरला आहे. नेटकऱ्यांनी यावरून “त्यांना आधीच काही माहित होते का?” अशा चर्चांना उधाण दिले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Safe : ‘मृत्यू समोर होता, पण सिक्रेट सर्व्हिसने वाचवलं!’ WCDच्या बडतर्फीवर ट्रम्प यांची पहिलीच प्रतिक्रिया; पाहा VIDEO

२,६०० पाहुणे अन् टेबलांखाली लपलेले जीव!

या वर्षीच्या डिनरला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांच्यासह पत्रकार, हॉलिवूड सेलिब्रिटी आणि उच्चपदस्थ सरकारी अधिकारी असे २,६०० अतिथी उपस्थित होते. कार्यक्रम रंगात आलेला असतानाच एका अज्ञात हल्लेखोराने शस्त्र घेऊन हॉलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि गोळीबार केला. एका क्षणात आनंदाचे वातावरण दहशतीत बदलले. उपस्थित पाहुण्यांनी जीवाच्या आकांताने टेबल आणि खुर्च्यांच्या खाली आश्रय घेतला. सुदैवाने, अमेरिकन सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी विलक्षण चपळता दाखवत हल्लेखोराला जागेवरच झडप घालून ताब्यात घेतले.

🚨 JUST NOW: Karoline Leavitt calls on everyone to watch tonight because Donald Trump will bring the heat and there will be “shots fired” LET’S FREAKING GO 🔥 pic.twitter.com/GMkccJ7qvw — MAGA Voice (@MAGAVoice) April 25, 2026

credit – social media and Twitter

ट्रम्प यांची ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्ट

या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी नेहमीच्या शैलीत ‘ट्रुथ सोशल’वर आपली भूमिका मांडली. त्यांनी लिहिले, “सिक्रेट सर्व्हिस आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी कमालीचे धैर्य दाखवले. हल्लेखोर आता गजाआड आहे. मला वाटले की कार्यक्रम पुढे सुरू ठेवावा, पण सुरक्षा यंत्रणांचा निर्णय अंतिम असेल. आजची संध्याकाळ आम्ही विसरू शकणार नाही.” ट्रम्प यांच्या या विधानाने त्यांच्या समर्थकांमध्ये पुन्हा एकदा सुरक्षेबाबत संतापाची लाट पसरली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sadhguru: विज्ञानाच्या पंढरीत सद्गुरू! अमेरिकेत IIT2026 परिषदेत भारताच्या सांस्कृतिक वारशाचा डंका; मांडले तंत्रज्ञानापलीकडील सत्य

सुरक्षा यंत्रणांसमोर मोठे आव्हान

व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डंट्स डिनर हा केवळ एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम नाही, तर तो अमेरिकन लोकशाही आणि पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचा उत्सव मानला जातो. अशा हाय-प्रोफाईल कार्यक्रमात सुरक्षेचा वेढा भेदून गोळीबार होणे, ही अमेरिकन गुप्तचर यंत्रणांसाठी मोठी नामुष्की मानली जात आहे. कॅरोलिन लेविट यांचा व्हिडिओ हा केवळ एक ‘योगयोग’ असल्याचे अधिकारी सांगत असले, तरी सोशल मीडियावरील तपास यंत्रणा मात्र या विधानाकडे वेगळ्या नजरेने पाहत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कॅरोलिन लेविट यांनी खरोखर गोळीबाराचे भाकीत केले होते का?

    Ans: लेविट यांनी 'फायर शॉट्स' हा शब्द राजकीय भाषणा संदर्भात वापरला होता, पण त्याच रात्री प्रत्यक्ष गोळीबार झाल्याने तो एक धक्कादायक योगायोग ठरला.

  • Que: या गोळीबारात कोणी जखमी झाले आहे का?

    Ans: सुरक्षा यंत्रणांच्या वेगवान कारवाईमुळे कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही आणि हल्लेखोराला तत्काळ अटक करण्यात आली.

  • Que: व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डंट्स डिनर म्हणजे काय?

    Ans: हा एक वार्षिक सोहळा आहे जिथे पत्रकार आणि राजकारणी एकत्र येतात. यात पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी निधी गोळा केला जातो.

Web Title: Karoline leavitt prediction white house dinner shooting trump security update 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • America news
  • Donald Trump
  • Firing in White House

संबंधित बातम्या

पेंटागॉनमध्ये हाय-ड्रामा! ‘Hazmat Alert’मुळे लष्करी मुख्यालयात लॉकडाऊन, पोलीस गॅस मास्कमध्ये; नेमके काय घडले वॉशिंग्टनमध्ये?
1

पेंटागॉनमध्ये हाय-ड्रामा! ‘Hazmat Alert’मुळे लष्करी मुख्यालयात लॉकडाऊन, पोलीस गॅस मास्कमध्ये; नेमके काय घडले वॉशिंग्टनमध्ये?

Donald Trump : वॉशिंग्टनमधील नॅशनल मॉलच्या गवतावर 8647 हा कोड; ट्रम्प यांच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी ‘ही’ कसली धमकी?
2

Donald Trump : वॉशिंग्टनमधील नॅशनल मॉलच्या गवतावर 8647 हा कोड; ट्रम्प यांच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी ‘ही’ कसली धमकी?

US Iran Peace Deal : ट्रम्प यांचा पुन्हा शांततेचा दावा; अमेरिका-इराण युद्ध थांबणार? होर्मुझबाबतही मोठे संकेत
3

US Iran Peace Deal : ट्रम्प यांचा पुन्हा शांततेचा दावा; अमेरिका-इराण युद्ध थांबणार? होर्मुझबाबतही मोठे संकेत

Donald Trump on Iran: डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने जग हादरले! म्हणाले– ‘आज रात्री इराणवर होणार सर्वात मोठा हल्ला’
4

Donald Trump on Iran: डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने जग हादरले! म्हणाले– ‘आज रात्री इराणवर होणार सर्वात मोठा हल्ला’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.