Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • New Year |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khaleda Zia Death : खालिदा झिया यांना पतीच्या कबरीजवळ करण्यात येणार दफन; ७ दिवसांचा शोक जाहीर

Khaleda Zia Burial: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूने बांगलादेशवर शोककळा पसरली आहे. बुधवारी त्यांचे पार्थीव दफन करण्यात येणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 30, 2025 | 02:08 PM
Khaleda Zia Burial

Khaleda Zia Burial

Follow Us
Close
Follow Us:
  • बांगलादेशवर शोककळा
  • खालिदा झिया यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन
  • पतीच्या कबरीजवळ करण्यात येणार दफन
Khaleda Zia Death News Marathi : ढाका : बांगलादेशच्या (Bangladesh) पहिल्या महिला पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनल पार्टीच्या अध्यक्षा खालिदा झिया (Khaleda Zia) यांचे निधन झाले आहे. मंगळवारी (३० डिसेंबर २०२५) सकाळी ६ वाजात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खालिदा झिया गेल्या अनेक वर्षांपासून अनेक आजारांनी ग्रस्त होत्या. त्यांना ढाकाच्या एव्हरकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशभर शोककळा पसरली आहे.

भारत बांगलादेश संबंधात पुन्हा तणाव! ढाक्याने उच्चायुक्तांना तातडीने बोलावले, कारण काय?

सध्या ढाकासह अनेक शहरांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या दु:खद काळात बीएनपीने देशभरात खालिदा झिया यांच्या स्मरणार्थ सात दिवसांचा अधिकृत शोकसभा जाहीर केली आहे. तसेच अंतरिम सरकारचे मोहम्मद युनूस यांनी देखील यावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. दरम्यान बीएनपी पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (३१ डिसेंबर) खालेदा झिया यांना ढाकाच्या संसद संकुलाजवळ दफन केले जाणार आहे. त्यांचे पती आणि माजी राष्ट्रपती झियाउर रहमान यांच्या समाधीजवळ त्यांना दफन केले जाईल असे बीएनपीने म्हटले आहे.

खालिदा झिया गेल्या काही आठवड्यांपासून रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होत्या. त्या छातीत संसर्ग, यकृत, मूत्रपिंड, मधूमेह, संधिवात आणि डोळ्यांच्या आजारांनी ग्रस्त होत्या. त्यांच्या उपचारासाठी एक विशेष पथक बोलावण्यात आले होते. परंतु मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

खालेदा झिया यांनी १९९१ ते १९९६ आणि २००१ ते २००२६ या काळात दोन वेळा बांगलादेशचे पंतप्रधान पद भूषणवले होते. त्या शेख हसीनांच्या कट्टर विरोधकही मानल्या जायच्या. दोन्ही महिल्या नेत्यांमधील लढाईला बेगमांची लढाई म्हटले जायचे. सत्तेत असताना खालिदा झिया या त्यांच्या कठोर राजनैतिक भूमिकेसाठी ओळखल्या जायच्या. दरम्यान त्यांच्या निधनाने बांगलादेश राजकारणातील बेगमांचे युद्ध आता अधिकृतपणे संपले आहे.

निवडणूकांवर होणार परिणाम ? 

फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांवर खालिदा झिया यांच्या निधनाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाने बांगलादेशच्या निवडणूक प्रक्रियेत बदल होऊ शकतात. सध्या त्यांच्या पक्षाचे नेतृत्व त्यांचा मुलगा तारिक रहमान यांच्या हाती आहे. तारिक रहमान बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत. सध्या हसीना यांच्या निधनाने बीएनपी पक्षात दु:खाचे वातावरण पसरले आहे.

बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे निधन; वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

💡

Frequently Asked Questions

  • Que: खालिदा झिया यांचे निधन कधी आणि कुठे झाले?

    Ans: खालिदा झिया यांनी मंगळवारी ३० डिसेंबर २०२५ रोजी ढाक्याच्या एव्हरकेअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या ८० वर्षाच्या होत्या.

  • Que: खालिदा झिया कोणत्या आजारांनी ग्रस्त होत्या?

    Ans: खालिदा झिया गेल्या काही आठवड्यांपासून रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होत्या. त्या छातीत संसर्ग, यकृत, मूत्रपिंड, मधूमेह, संधिवात आणि डोळ्यांच्या आजारांनी ग्रस्त होत्या.

Web Title: Khaleda zia death burial next to husbads grave seven days mourning declared

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 01:06 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Khalida Zia
  • World news

संबंधित बातम्या

इराणमध्ये खामेनी सरकारविरोधात उसळले आंदोलन; हजारो Gen Z रस्त्यावर, कारण काय?
1

इराणमध्ये खामेनी सरकारविरोधात उसळले आंदोलन; हजारो Gen Z रस्त्यावर, कारण काय?

भारत बांगलादेश संबंधात पुन्हा तणाव! ढाक्याने उच्चायुक्तांना तातडीने बोलावले, कारण काय?
2

भारत बांगलादेश संबंधात पुन्हा तणाव! ढाक्याने उच्चायुक्तांना तातडीने बोलावले, कारण काय?

Israel Hamas War : ‘… वेळ संपत चाललीय’ ; नेतन्याहूंशी बैठकीनंतर ट्रम्प यांचा हमासला कडक इशारा
3

Israel Hamas War : ‘… वेळ संपत चाललीय’ ; नेतन्याहूंशी बैठकीनंतर ट्रम्प यांचा हमासला कडक इशारा

बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन; वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4

बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांचे निधन; वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.