बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे निधन; वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
दरम्यान बांग्लादेश नॅशनल पार्टीने याची पुष्टी केली असून निवेदनात त्यांनी सांगितले की, BNP च्या अध्यक्षा आणि माजी पंतप्रधान बेगम खालिदा जिया यांचे निधन झाले आहे. आज मंगळवार (३० डिसेंबर २०२५) पहाटे ६ वाजता नमाज पाठणानंतर अखेरचा श्वास घेतला. BNP पक्षाने म्हटले की, आम्ही खालिदा यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतो तसेच सर्वांना देखील यासाठी प्रार्थना करण्याची विनंती करतो.
खालिदा जिया यांनी गेल्या अनेक वर्षांपासून छातीत संसर्ग झाला होता. तसेच त्यांनी यकृत, मूत्रपिंड, मधूमेह, संधिवात आणि डोळ्यांच्या आजारांनी देखील त्या ग्रस्त होत्या. त्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. खालिदा जिया यांनी १९९१ ते १९९६ आणि २००१ ते २००२६ या काळात दोन वेळा बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून कार्य केले आहे. त्या माजी राष्ट्रापती झियाउर रहमान यांच्या पत्नी होत्या. त्यांना दोन मुले आहेत. बीएनपीचे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान हे त्यांचे मोठे पुत्र तर धाकटा अराफत रहमान ज्यांचे याच वर्षी २०२५ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.
खालिदा जिया या बांगलादेशच्या माजी पदच्युत पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या कट्टर विरोधक होत्या. १९८० मध्ये बांग्लादेश लष्करा राजवटीविरोधात दोन्ही महिला नेत्या एकत्र आल्या होत्या. त्यांनी लष्कराविरोधात जोरदार बंड पुकारला होता. पण पुढे जाऊन दोन्ही महिला नेत्यांमध्ये पंतप्रधान पदासाठी चुरशीची लढत झाली. १९९० मध्ये सत्ता स्थापन झाल्यानंतर खालिदा जिया १९९१ च्या निवडणुकीत विजयी झाल्या आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. तेव्हापासून खालिदा आणि हसीना यांच्यात कट्टर राजकीय स्पर्धी सुरु झाली. त्यावेळी त्यांच्या लढाईला बेगमांची लढाई असे म्हटले जायचे.






