Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?

Khamenei Funeral Update : इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम ४ ते ८ जुलै दरम्यान होणार आहे. यापूर्वी इराणने अमेरिकेला कडक इशारा दिला आहे. तसेच दोन्ही देशांतील चर्चाही रखडली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 02, 2026 | 05:09 PM
Khamenei

Khamenei

Follow Us
Follow Us:
  • खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा
  • अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडणार?
  • काय म्हणाला इराण?
Khamenei Funeral : अमेरिका आणि इराणमध्ये ६० दिवसांचा युद्धविराम लागू आहे. परंतु दोन्ही देशांतील तणाव निवळण्याचे नाव घेईना. इराणने माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारापूर्वी अमेरिकेला कडक इशारा दिला आहे. तसेच अमेरिकेसोबतची चर्चा सध्या नाकारली आहे.

US Iran Negotiations : ५७,००० कोटींची मालमत्ता इराणला परत मिळणार? दोहामधील अमेरिका-इराण चर्चा यशस्वी

दोन्ही देशांतील युद्ध थांबले असले तरी मतभेद कायम आहेत. दोहा येथे शांतता आणि अणु कार्यक्रमावर कतार-पाकिस्तानच्या मध्यस्थीने चर्चा होणार होती. पण इराणने अमेरिकेलसोबतच खामेनेईंच्या अंत्यसंस्कार होईपर्यंत कोणतीही चर्चा करणार नसल्याचे म्हटले आहे. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहम्मद बाकर झोलकद्र यांनी या संदर्भात एक संदेश जारी केला आहे. या संदेशानुसार, अयातुल्ला खामेनेई यांच्या मृत्यूचा बदला आम्ही निश्चित घेऊ असे म्हटले आहे.

खामेनेईंचा अमेरिका-इस्रायली हल्ल्यात मृत्यू

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलने इराणनविरोधात संयुक्त लष्कीर मोहिम सुरु केली होती. यामध्ये इस्रायलने इराणवर भीषण हल्ले केले होते. या हल्ल्यात अयातुल्ली अली खामेनेई यांचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर मध्यपूर्वेत युद्धाने पेट घेतला. या हल्ल्यात इराणचे अनेक वरिष्ठ अधिकारीही ठार झाले होते.

सध्या खामेनेईंच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम ४ ते ८ जुलैगरम्यान आयोजति करण्यात आला आहे. यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी इराणी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. खामेनेई यांचे निधन इराणसाठी शेवट नसून नव्या अध्यायाची सुरुवात आहे, असे त्यांनी म्हटले.

चर्चेला इराणचा नकार

दुसरीकडे इराणने अमेरिका जोपर्यंत दोन्ही देशांतील MoU करारांतील अटी पूर्ण करत नाही तोपर्यंत कोणतीही थेट चर्चा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच इराणने लेबनॉनमधून इस्रायली सैन्य माघारी घेतल्याशिवाय पुढील वाटाघाटी चर्चा सुरु होणार नाहीत असेही सांगितले आहे. सध्या दोहामध्ये केवळ अप्रत्यक्ष चर्चा सुरु आहे. इराणी अधिकाऱ्यांनी थेट अमेरिकन अधिकाऱ्यांची भेट देण्यास नकार दिला आहे.

इराणची जप्त संपत्ती परत मिळणार?

दुसरीकडे इराणचे उपपरराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या चर्चेत इराणच्या ६ अब्ज डॉलरच्या म्हणजे ५७ हजार कोटींच्या जप्त केलेल्या मालमत्तेबद्दल चर्चा झाली. ही मालमत्ता इराणला टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे. परंतु अमेरिकेकडून यावर अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

Thailand Accident : थायलंडमध्ये भीषण अपघात! अल्पवयीन मुलाने यात्रेकरुंच्या अंगावर चढवला ट्रक; ८ बौद्ध भिक्षूंचा दुर्दैवी मृत्यू

Web Title: Khamenei funeral iran warning us talks delay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

Captain Smit Machchhar: भारत-इस्रायल मैत्रीचे अनोखे उदाहरण; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या अतुलनीय शौर्याला इस्रायली राजदूतांचा सलाम
1

Captain Smit Machchhar: भारत-इस्रायल मैत्रीचे अनोखे उदाहरण; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या अतुलनीय शौर्याला इस्रायली राजदूतांचा सलाम

AI Survey : डिजिटल ट्विनने वाढवले चुकीचे आकडे; एका जगप्रसिद्ध सर्वेक्षण कंपनीने केली स्वतःच्याच डेटाची तुलना, अहवाल धक्कादायक
2

AI Survey : डिजिटल ट्विनने वाढवले चुकीचे आकडे; एका जगप्रसिद्ध सर्वेक्षण कंपनीने केली स्वतःच्याच डेटाची तुलना, अहवाल धक्कादायक

Nobel Peace Prize : ट्रम्प यांना यंदाही नोबेल शांतता पुरस्कार का मिळणार नाही? जाणून घ्या 5 मोठी कारणे
3

Nobel Peace Prize : ट्रम्प यांना यंदाही नोबेल शांतता पुरस्कार का मिळणार नाही? जाणून घ्या 5 मोठी कारणे

Flydubai Hijack: ‘धार्मिक कट्टरपंथी, इराणवरील हल्ल्याच्या वेळी झाला होता फ्लायदुबईमध्ये सामील…’; कोण आहे तो ओमानचा पायलट?
4

Flydubai Hijack: ‘धार्मिक कट्टरपंथी, इराणवरील हल्ल्याच्या वेळी झाला होता फ्लायदुबईमध्ये सामील…’; कोण आहे तो ओमानचा पायलट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.