US Iran Negotiations : ५७,००० कोटींची मालमत्ता इराणला परत मिळणार? दोहामधील अमेरिका-इराण चर्चा यशस्वी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इराणचे उपपरराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या चर्चेत इराणच्या ६ अब्ज डॉलरच्या म्हणजे ५७ हजार कोटींच्या जप्त केलेल्या मालमत्तेबद्दल चर्चा झाली. ही मालमत्ता इराणला टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीतील व्यापारी वाहतूकही सुरळित करण्यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न केले.
भविष्यात कोणताही वाद झाल्यास तो संवादातून सोडवण्यासाठी स्वतंत्र संपर्क यंत्रणा उभारण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली असल्याचे गरीबाबादी यांनी सांगितले. पंरतु या चर्चेत इराणच्या अणु कार्यक्रमाबाबत कोणतीही वाटाघाटी करण्यात आलेली नाही.
सध्या अमेरिका-इराण चर्चेत कतार आणि पाकिस्तान मध्यस्थ म्हणून कार्य करत आहे. या देशांच्या प्रनिधींमार्फत स्वतंत्र चर्चा सुरु आहे. दोन्ही देश आपल्या अटी या देशांमार्फत एकमेकांपर्यंत पोहोचवत आहे. कतारने ही वाटाघाटी सकारात्मक झाली असल्याचे सांगितले असून पुढील चर्चा ०९ जुलै नंतर होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेंस यांनी चर्चा योग्य दिशेने सुरु असल्याचे म्हटले. पंरतु या कराराचे भवितव्य इराणवर अवलंबून असेल, हेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या होर्मुझ सामुद्रधुनीतील ताणाव कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पुढील चर्चेत इराणच्या अणु कार्यक्रमावरही चर्चा केली जाईल असे व्हेंस यांनी सांगितले.
सध्या संपूर्ण जगाचे लक्ष्य दोन्ही देशांतील चर्चेकडे लागले आहे. दोन्ही देशांमधील चर्चा यशस्वी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरच मध्यपूर्वेत स्थिरता येईल आणि होर्मुझचा मार्ग सुरळित झाल्यास इंधन आणि गॅस वाहतूक पुन्हा सुरळितपणे सुरु होईल. यामुळे पुढी वाटाघाटीत इराणच्या अणु कार्यक्रमावर काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






