Khamenei's first post-conflict move emerged from bunker gave nationalist signal
Khamenei first post-conflict move : इस्रायलसोबतच्या १२ दिवसांच्या तीव्र संघर्षानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई अखेर सार्वजनिकरित्या दिसले आहेत. युद्धाच्या काळात “बेपत्ता” असलेले आणि गुप्त बंकरमध्ये लपले असल्याचे गुप्तचर अहवाल सुचवत असताना, खामेनी यांनी शनिवारी तेहरानमधील मशिदीत हजेरी लावत समर्थकांना राष्ट्रवादी संदेश दिला.
इराणच्या सरकारी माध्यमांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये, खामेनेई एका धार्मिक समारंभात सहभागी होताना दिसतात. ही उपस्थिती शिया मुस्लिम धर्मगुरूंनी साजऱ्या होणाऱ्या आशुराच्या आदल्या दिवशीची आहे. यावेळी त्यांनी उपस्थित उपासकांना अभिवादन केले आणि इराणविरोधी शक्तींना अप्रत्यक्ष इशारा दिला.
१३ जून रोजी इस्रायलने इराणवर भीषण हवाई हल्ले चढवले, ज्यामध्ये इराणी लष्कराचे वरिष्ठ कमांडर आणि अणुशास्त्रज्ञ ठार झाल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर इराणनेही इस्रायलवर क्षेपणास्त्र व ड्रोनद्वारे जोरदार हल्ला चढवला. या काळात खामेनी यांनी एकदाही प्रत्यक्षपणे दर्शन दिले नव्हते. त्यांनी केवळ रेकॉर्ड केलेले तीन व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करून इराणी जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला होता. गुप्तचर अहवालांनुसार, इस्रायली हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी खामेनेई एका सुरक्षित बंकरमध्ये लपले होते. यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
After 3 weeks of hiding in tunnels like a rat, Khamenei has reemerged from his bunker just in time for the final day of Ashura.
Look at this congregation of zombies, clinging to an Islamic Dictatorship that has collapsed and is slowly imploding.
Meanwhile, defections continue. pic.twitter.com/9M6fgeMRs0
— Goldie Ghamari | گلسا قمری (@gghamari) July 5, 2025
credit : social media
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : टेक्सासमध्ये विनाशकारी पुराचा कहर; 51 मृत, अनेक बेपत्ता, ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
इराणी टीव्हीवर खामेनेईंच्या या सार्वजनिक उपस्थितीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. समर्थकांनी टीव्हीवर त्यांना पाहून आनंदाने घोषणा दिल्या. एका व्हिडिओमध्ये, खामेनी वरिष्ठ धर्मगुरू महमूद करीमी यांना “ओ इराण” हे देशभक्तीपर गाणे गाण्यास सांगताना दिसतात. हे गाणे इस्रायलशी झालेल्या संघर्षादरम्यान इराणमध्ये विशेषतः लोकप्रिय झाले होते.
ही उपस्थिती केवळ धार्मिकतेपुरती मर्यादित नव्हती, तर ती एक राजकीय आणि मनोवैज्ञानिक रणनिती देखील होती. खामेनेई यांनी अशा वेळी स्वतःला जनतेसमोर आणले, जेव्हा मोहरम महिना सुरू आहे आणि शिया समुदाय शोक व्यक्त करतो. याच काळात सर्वोच्च नेत्यांची सार्वजनिक उपस्थिती ही पारंपरिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
खामेनेई यांची ही उपस्थिती तेहरानमधील इमाम खामेनेई मशिदीत होती. ही मशिद इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे संस्थापक आयातुल्ला खामेनेई यांच्या नावावर आहे. येथे खामेनेई यांनी उपस्थित उपासकांना संबोधित करत इराणची एकजूट आणि राष्ट्रनिष्ठा अधोरेखित केली. इराणी टीव्हीने नागरिकांना खामेनींच्या या उपस्थितीबद्दल आपले अनुभव, अभिप्राय व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करण्याचं आवाहन केलं आहे. हेही एक प्रकारचं प्रचारतंत्र आणि भावनिक एकात्मतेचं साधन मानलं जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? चीनमध्ये सत्ता बदलाची जोरदार चर्चा, ‘हे’ 5 दावेदार सर्वाधिक चर्चेत
खामेनेईंची ही उपस्थिती इराणच्या अंतर्गत राजकारणासाठी आणि जागतिक स्तरावर एक महत्त्वाचा संकेत मानली जात आहे. युद्धकाळात गुप्ततेत असलेले नेतृत्व पुन्हा जनतेसमोर आले आहे, पण याचा अर्थ शांतता असेल की संघर्षाची नव्याने सुरुवात हे येत्या काळात स्पष्ट होईल. इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर खामेनेई यांची सार्वजनिक पुनरागमन ही केवळ धार्मिक पारंपरिकता नाही, तर एक ठाम राजकीय संदेश आहे, की इराण अजूनही शरण गेलेला नाही, आणि सर्वोच्च नेतृत्व पुन्हा मैदानात उतरले आहे.