
us seizes russian oil tanker marinera nuclear threat putin ally reaction 2026
US Navy seizes Russian tanker Marinera 2026 : रशिया (Russia) आणि अमेरिका (America) यांच्यातील संबंध आतापर्यंतच्या सर्वात खालच्या पातळीवर पोहोचले आहेत. अटलांटिक महासागरात अमेरिकन नौदलाने रशियाचा ‘मरीनेरा’ हा तेल टँकर जप्त केल्याने क्रेमलिनमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. या कारवाईकडे थेट व्लादिमीर पुतिन यांचा वैयक्तिक अपमान म्हणून पाहिले जात असून, रशियन अधिकाऱ्यांनी आता अमेरिकेला अणुबॉम्बने (Nuclear Attack) उडवून देण्याची धमकी दिली आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून अटलांटिक महासागराच्या थंड लाटांवर एक थरार सुरू होता. रशियाने ‘मरीनेरा’ या टँकरला संरक्षण देण्यासाठी आपली अत्याधुनिक पाणबुडीही तैनात केली होती. मात्र, अमेरिकन नौदलाच्या ‘युएससीजी मुनरो’ (USCGC Munro) या युद्धनौकेने सर्व अडथळे पार करत या टँकरला घेरले. अमेरिकेच्या विशेष दलाने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जहाजावर उतरून त्याचा ताबा घेतला. अमेरिकेचा दावा आहे की, हा टँकर व्हेनेझुएलातून प्रतिबंधित तेल चोरून नेण्याचा प्रयत्न करत होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Politics: अमेरिका तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज! 500% कर अन् 7 देशांची उडाली झोप, Trumpने रशियासह भारताचेही वाढवले टेन्शन
या घटनेवर रशियन स्टेट ड्यूमाचे वरिष्ठ सदस्य अलेक्सी झुरावलेव्ह यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “जहाजावर रशियाचा राष्ट्रीय ध्वज होता, याचा अर्थ तो रशियाचा भूभाग आहे. अमेरिकेने केलेली ही कारवाई ‘चाचेगिरी’ आहे. आम्हाला आता टॉर्पेडोने हल्ला करून अमेरिकन बोटी बुडवाव्या लागतील. आमचा लष्करी सिद्धांत अशा वेळी अणुशस्त्रांचा वापर करण्यास परवानगी देतो.” रशियाने या घटनेला आंतरराष्ट्रीय सागरी कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.
American forces seized the oil tanker Marinera russian warships and a submarine were near the tanker during the seizure but they did nothing and just watched wouldn’t be surprised if even the tanker team was just watching and placing bets on polymarket about it 😹 pic.twitter.com/t80FcDLQQ3 — poezdec 🫵😹 (@poesdec) January 7, 2026
credit : social media and Twitter
दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही कारवाई कायदेशीर असल्याचे समर्थन केले आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट इशारा दिला की, “जेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प काही बोलतात, तेव्हा ते विनोद करत नसतात. व्हेनेझुएलाच्या तेलावरील नाकेबंदी पूर्णपणे लागू आहे आणि आमचे सैन्य रशियाशी संबंधित कोणत्याही अवैध जहाजावर कारवाई करण्यास सज्ज आहे.” ट्रम्प प्रशासनाने मागील आठवड्यातच निकोलस मादुरो यांना अटक करून अमेरिकेत आणले होते, त्यानंतर ही दुसरी मोठी लष्करी कारवाई आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Viral Video: ‘जर भारत आणि तालिबानला मजा आली नाही तर पैसे परत’; पाकिस्तान लष्कर प्रमुखाला ‘फिल्मीगिरी’ नडली, जगभरात बनले हसे
तज्ज्ञांच्या मते, हा संघर्ष केवळ एका टँकरपुरता मर्यादित नाही. रशियाच्या ‘शॅडो फ्लीट’वर (Shadow Fleet) अमेरिकेने घातलेला हा पहिलाच थेट घाला आहे. जर रशियाने प्रत्युत्तरादाखल अमेरिकेच्या कोणत्याही व्यापारी किंवा लष्करी जहाजावर हल्ला केला, तर त्याचे रूपांतर थेट तिसऱ्या महायुद्धात होऊ शकते. सध्या रशियाचे वाहतूक मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय अमेरिकेकडे आपल्या नागरिकांच्या आणि जहाजाच्या सुरक्षिततेची मागणी करत आहेत.
Ans: अमेरिकेचा दावा आहे की 'मरीनेरा' हा टँकर व्हेनेझुएलावर लादलेल्या तेल निर्बंधांचे उल्लंघन करत होता आणि तो रशिया, इराण व व्हेनेझुएला यांच्या 'शॅडो फ्लीट'चा भाग आहे.
Ans: आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, खुल्या समुद्रात कोणत्याही देशाच्या ध्वजांकित जहाजावर दुसऱ्या देशाने जबरदस्तीने प्रवेश करणे बेकायदेशीर मानले जाते, म्हणून रशिया याला चाचेगिरी म्हणत आहे.
Ans: होय, रशियाने आपल्या 'न्यूक्लियर डॉक्ट्रीन'चा हवाला देत प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. जर रशियाने लष्करी कारवाई केली तर अमेरिका-रशिया थेट युद्ध सुरू होऊ शकते.