Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

War Update : बलुचिस्तान की खैबर पख्तूनख्वा…कोण आधी मुक्त होणार? पाकिस्तानवरून मोठी बातमी; मुनीरचे कंबरडे मोडणार

Balochistan : पाकिस्तान गंभीर सुरक्षा आणि राजकीय संकटाचा सामना करत आहे. बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये बंडखोरी वाढत आहे, दहशतवादी हल्ले वाढले आहेत आणि लष्कर-सरकार संघर्ष परिस्थिती आणखी चिघळवत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 04, 2025 | 02:04 PM
khyber pakhtunkhwa balochistan conflict pakistan update

khyber pakhtunkhwa balochistan conflict pakistan update

Follow Us
Close
Follow Us:
  1. बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये बंडखोरी आणि दहशतवादाने टोक गाठले आहे.
  2. लष्कर आणि सरकारमधील संघर्षामुळे पाकिस्तान अधिक अस्थिर होत चालला आहे.
  3. असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा व्यवस्था अपयशी ठरत असल्याचा आरोप होतो.
Khyber Pakhtunkhwa violence 2025 : पाकिस्तान (Pakistan) सध्या इतिहासातील सर्वात गंभीर सुरक्षा आणि राजकीय संकटाचा सामना करत आहे. देशाच्या पश्चिम सीमेवर स्थित असलेले बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा हे दोन प्रमुख प्रांत उघड बंडखोरी, सशस्त्र चकमकी आणि वाढत्या दहशतवादी हल्ल्यांमुळे जळत आहेत. याचा परिणाम केवळ स्थानिक नागरिकांवरच नाही, तर संपूर्ण दक्षिण आशियातील स्थैर्यावरही होत आहे. वाढत्या हिंसाचारामुळे पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय प्रतिमाही मोठ्या प्रमाणावर डागाळत चालली आहे.

इस्लामाबादस्थित ‘सेंटर फॉर रिसर्च अँड सिक्युरिटी स्टडीज’च्या अहवालानुसार, जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत पाकिस्तानात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये २,४१४ लोकांचा मृत्यू झाला, तर २०२४ मधील याच कालावधीत ही संख्या १,५२७ इतकी होती. म्हणजेच अवघ्या एका वर्षात मृत्यूंमध्ये जवळपास ५८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. केवळ जुलै ते सप्टेंबर या तिसऱ्या तिमाहीतच ९०१ जणांचा मृत्यू आणि ५९९ जण जखमी झाल्याची नोंद आहे. यातील ९६ टक्क्यांहून अधिक हिंसाचार केवळ खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान या दोन प्रांतांमध्ये घडला असून, सर्वाधिक म्हणजे सुमारे ७१ टक्के मृत्यू हे केवळ खैबर पख्तूनख्वामध्ये अधिक नोंदवले गेले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ban Munir: पाकिस्तानच्या सत्ताकाठावर पडझड सुरूच! असीम मुनीर प्रकरणात अमेरिकाही सहभागी; 49 कायदेकर्त्यांनी केली ‘ही’ मागणी

खैबर पख्तूनख्वामध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान अर्थात टीटीपीचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे. शरिया कायद्याची अंमलबजावणी आणि सरकारविरोधी प्रचार यांच्या जोरावर या संघटनेने अनेक भागांत आपली पकड निर्माण केली आहे. त्याच वेळी अफगाण तालिबानचे वैचारिक आणि कधी-कधी प्रत्यक्ष हस्तक्षेपही या प्रांतात आढळून येतात. दुसरीकडे, बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) आणि इतर सशस्त्र गट संसाधनांचे शोषण, राजकीय उपेक्षा आणि लष्करी अत्याचारांच्या विरोधात अनेक दशके संघर्ष करत आहेत. परिणामी, काही भागात पाकिस्तानी सैन्याला प्रवेश करणेही कठीण झाले आहे, इतकी बंडखोरांची ताकद वाढली आहे.

या सर्व परिस्थितीत पाकिस्तान सरकार आणि लष्कर यांच्यातील अंतर्गत संघर्षही अधिक वाढला आहे. नागरी सरकार आपली पकड गमावत असताना लष्कर आपल्या निर्णयांवर थेट अंमलबजावणी करत असल्याचे चित्र दिसते. अनेकदा या हल्ल्यांसाठी भारतावर आरोप ठेवले जातात आणि प्रत्येक घटनेला ‘परकीय कट’ म्हणून रंगवले जाते. लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी या सशस्त्र उठावांना ‘फितना अल-खवारीज’ असे संबोधत त्यांना धार्मिक दृष्टिकोनातून बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थितीत सुधारणा झालेली दिसत नाही.

 

Pakistan is in turmoil—facing rising #conflict with #India and a raging civil war in #Balochistan. The #BLA killed 14 #Pakistani soldiers, including top commanders. 3 blasts and a #HAROP drone strike hit #Lahore. #Pakistan is bleeding—badly.#IndiaPakistanWar #balochistanfreedom pic.twitter.com/f6Fcq1U4pk — Buddha D. (@itsbuddhadebpan) May 8, 2025

credit : social media and Twitter 

असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची अंतर्गत स्थिती अधिकच ढासळत असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. आक्रमक वक्तव्ये करून, सीमावाद उकरून काढून आणि भारतासोबत तणाव वाढवून आंतरराष्ट्रीय लक्ष वेधून घेणे, तसेच परकीय आर्थिक मदत मिळवणे ही त्यांची प्रमुख रणनीती मानली जाते. काही अहवालांनुसार, ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानी लष्कराला मोठ्या प्रमाणावर फटका बसला असूनही मुनीर यांनी स्वतःसाठी ‘फील्ड मार्शल’ ही पदवी मिळवून स्वतःचे राजकीय आणि लष्करी स्थान अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. मात्र याचा जनतेवर आणि देशाच्या भविष्यासाठी उलट परिणाम होत असल्याची भावना वाढत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Powerful Women : जगातील सर्वात मोठ्या महासत्तेवरही नारीशक्तीचाच वरदहस्त; पुतिनची ‘Lady Brigade’ ठरवते रशिया आणि जगाचे भविष्य

सध्याची परिस्थिती पाहता, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा हे केवळ बंडखोरीचे केंद्र न राहता पाकिस्तानच्या एकात्मतेला आणि अस्तित्त्वालाच आव्हान देणारे भटके अग्नीकुंड बनत चालले आहेत. जर वेळीच ठोस आणि शांततामय राजकीय तोडगा काढला गेला नाही, तर ‘कोण आधी स्वतंत्र होणार?’ हा प्रश्न फक्त चर्चेपुरताच न राहता एक भयावह वास्तव ठरू शकतो.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानमध्ये सध्या सर्वाधिक हिंसाचार कुठे आहे?

    Ans: खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये.

  • Que: बंडखोरीमागे प्रमुख कारण काय आहे?

    Ans: राजकीय उपेक्षा, संसाधनांचे शोषण आणि दहशतवादी संघटनांचा प्रभाव.

  • Que: पाकिस्तानवर काय परिणाम होऊ शकतो?

    Ans: देशाची एकता आणि स्थैर्य धोक्यात येऊ शकते.

Web Title: Khyber pakhtunkhwa balochistan conflict pakistan update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 02:04 PM

Topics:  

  • Asim Munir
  • pakistan
  • Pakistan News
  • Pakistan Politics

संबंधित बातम्या

Ban Munir: पाकिस्तानच्या सत्ताकाठावर पडझड सुरूच! असीम मुनीर प्रकरणात अमेरिकाही सहभागी; 49 कायदेकर्त्यांनी केली ‘ही’ मागणी
1

Ban Munir: पाकिस्तानच्या सत्ताकाठावर पडझड सुरूच! असीम मुनीर प्रकरणात अमेरिकाही सहभागी; 49 कायदेकर्त्यांनी केली ‘ही’ मागणी

Pakistan Politics: पाकिस्तानात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे; PM शरीफांनी राजकारणाचा फास मुनीरभोवती घट्ट आवळला
2

Pakistan Politics: पाकिस्तानात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे; PM शरीफांनी राजकारणाचा फास मुनीरभोवती घट्ट आवळला

India-Pakistan युद्धाला इस्लामी कट्टरपंथी Asim Munir जबाबदार; अलिमा खान यांचे ‘मुल्ला जनरल’वर गंभीर आरोप
3

India-Pakistan युद्धाला इस्लामी कट्टरपंथी Asim Munir जबाबदार; अलिमा खान यांचे ‘मुल्ला जनरल’वर गंभीर आरोप

CDF Delay : पाकिस्तानच्या सत्ताकारणाची लंडनमध्ये लिहिली जातेय स्क्रिप्ट; आता नवाज शरीफ करणार असीम मुनीरसोबत मोठा गेम
4

CDF Delay : पाकिस्तानच्या सत्ताकारणाची लंडनमध्ये लिहिली जातेय स्क्रिप्ट; आता नवाज शरीफ करणार असीम मुनीरसोबत मोठा गेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.