Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel War: मिडल ईस्टमधील युद्धामुळे पाकिस्तानची कोंडी; शहबाज सरकारसमोर नवे संकट उभे

इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' हा महत्त्वाचा सागरी मार्ग बंद होण्याच्या शक्यतेने कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 09, 2026 | 04:57 PM
मिडल ईस्टमधील युद्धामुळे पाकिस्तानची कोंडी (Photo Credit - x)

मिडल ईस्टमधील युद्धामुळे पाकिस्तानची कोंडी (Photo Credit - x)

Follow Us
Close
Follow Us:

  • मिडल ईस्टमधील युद्धामुळे पाकिस्तानची कोंडी
  • शहबाज सरकारसमोर नवे संकट उभे
  • पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचे भीती
Middle East War Impact on Pakistan: मध्यपूर्वेमध्ये (Middle East) सुरू असलेल्या भीषण युद्धाचे विदारक परिणाम आता पाकिस्तानवर दिसू लागले आहेत. इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ हा महत्त्वाचा सागरी मार्ग बंद होण्याच्या शक्यतेने कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. या जागतिक घडामोडींमुळे आधीच डबघाईला आलेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले असून शहबाज शरीफ सरकारसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

तेल आयात बिलात ६०० दशलक्ष डॉलर्सची वाढ

पाकिस्तानचे अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब यांनी रविवारी आयोजित एका तातडीच्या बैठकीत देशाच्या आर्थिक स्थितीबाबत अत्यंत चिंताजनक आकडेवारी सादर केली. त्यांच्या माहितीनुसार, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पाकिस्तानचे मासिक तेल आयात बिल तब्बल ६०० दशलक्ष डॉलर्सनी वाढण्याची शक्यता आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानसाठी ही वाढ सोसणे अशक्य असल्याचे मानले जात आहे. विदेशी मुद्रा साठ्याची कमतरता आणि वाढत्या किमतींमुळे सरकारची झोप उडाली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरात ५५ रुपयांची मोठी वाढ

देशांतर्गत महागाईने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी सरकारने इंधनाच्या दरात मोठी वाढ करण्याची घोषणा केली आहे. पेट्रोल आणि हाय-स्पीड डिझेलच्या किमतीत थेट ५५ रुपये प्रति लिटर इतकी वाढ करण्यात आली असून, ही वाढ सुमारे २० टक्क्यांच्या घरात आहे. पेट्रोलियम मंत्री अली परवेज मलिक यांनी जनतेला इंधन बचतीचे आवाहन केले असून, देशातील सध्याचा साठा जास्तीत जास्त दिवस टिकवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्तान पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) दारात मदतीसाठी झोळी पसरवण्याच्या तयारीत आहे.

Israel Iran War: इराणचा नाश हेच सत्य? इस्त्रायलने नव्या सुप्रीम लीडरलाच उडवला? मुजतबा खामेनींवर थेट…

पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचे भीती

‘डॉन’ या वृत्तपत्राने दिलेल्या अहवालानुसार, जर हे युद्ध अधिक काळ लांबले, तर कच्च्या तेलाच्या किमती १२० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकतात. अशा परिस्थितीत पाकिस्तानला एलएनजी (LNG) पुरवठ्यातही मोठ्या अडचणी येतील. या संकटावर मात करण्यासाठी पाकिस्तान आता ओमान, सौदी अरेबिया आणि यूएई सारख्या मित्रदेशांशी राजनैतिक चर्चा करत असून ‘होर्मुज स्ट्रेट’ला पर्यायी मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

चुकीच्या परराष्ट्र धोरणाचा फटका?

पाकिस्तानमधील तज्ज्ञांच्या मते, पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे अमेरिकेप्रती असलेले मवाळ धोरण देशाला महागात पडत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रभावाखाली पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण लढाई न करताही या युद्धात अडकले आहे. पाकिस्तान या युद्धाचा पक्ष नाही किंवा त्याचा थेट फायदा घेत नाही, परंतु त्याला आर्थिकदृष्ट्या सर्वात जास्त फटका बसत आहे. सध्याची परिस्थिती अशी आहे की सरकारकडे पुरेसा परकीय चलन साठा नाही आणि वाढत्या किमती रोखण्यासाठी कोणतीही ठोस योजना नाही. येणारे दिवस पाकिस्तानसाठी आणखी आव्हानात्मक असू शकतात.

Middle East War : इस्रायलचे बराक ठरले ‘या’ अरब देशाचे कवच; इराणच्या मिसाईल अन् ड्रोन्स खेळ एका झटक्यात खल्लास

Web Title: Pakistans dilemma due to war in the middle east new crisis looms before shahbaz government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Iran-Israel War
  • pakistan

संबंधित बातम्या

Oil and LPG Stock: देशात 60 दिवसांचा पेट्रोल-डिझेल आणि 45 दिवसांचा गॅस शिल्लक, सरकारचा खुलासा आता…
1

Oil and LPG Stock: देशात 60 दिवसांचा पेट्रोल-डिझेल आणि 45 दिवसांचा गॅस शिल्लक, सरकारचा खुलासा आता…

Israel Secret Mission : इराणसाठी धोक्याची घंटा! इस्रायलने सीमेजवळच उभारला मृत्यूचा सापळा, अमेरिकेचाही पाठिंबा?
2

Israel Secret Mission : इराणसाठी धोक्याची घंटा! इस्रायलने सीमेजवळच उभारला मृत्यूचा सापळा, अमेरिकेचाही पाठिंबा?

LPG Reforms: घरगुती एलपीजी सिलिंडरच्या डिलीवरीसाठी OTP सिस्टीम रद्द करणार? Mumbai High Court ने दिला ‘हा’ निकाल
3

LPG Reforms: घरगुती एलपीजी सिलिंडरच्या डिलीवरीसाठी OTP सिस्टीम रद्द करणार? Mumbai High Court ने दिला ‘हा’ निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.