
Khyber Pakhtunkhwa CM assaulted military role alleged Imran’s health sparks turmoil
सोहेल आफ्रिदी गुरुवारी आदियाला तुरुंगासमोर पोहोचले होते, जिथे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) चे प्रमुख इम्रान खान कैदेत आहेत. आफ्रिदी हे इम्रान खान यांच्या सुरक्षिततेच्या मागणीसाठी आणि प्रकृतीविषयी सत्य माहिती बाहेर यावी यासाठी निदर्शने करत होते. मुस्लिम लीग (न) सरकारकडून सुरू असलेल्या दडपशाहीविरोधात पीटीआय समर्थकांची मोठी गर्दी तुरुंगाबाहेर जमा झाली होती. परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानंतर पोलिसांनी अचानक लाठीचार्ज केला आणि या कारवाईत मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप पीटीआयने केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : FACT CHECK : अखेर समोर आले किंग खान आणि PM मोदींच्या VIRAL ‘जिहाद’ व्हिडिओमागचे तथ्य; वाचा नक्की काय आहे सत्य?
स्थानिक माध्यमे आणि सूत्रांनुसार, पोलिसांनी केलेली ही कठोर कारवाई पाकिस्तानी लष्कराच्या सूचनेवरच झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. आदियाला तुरुंगाबाहेर कडक सुरक्षा तैनात असून, समर्थकांनी आत जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी अत्यधिक बळाचा वापर केला. आफ्रिदी व त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे त्यांना जमिनीवर फेकण्यात आले. त्यांच्या तब्येतीबद्दलही चिंता व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर पीटीआयने या मारहाणीला “लोकशाही अधिकारांवरील हल्ला” असे संबोधले असून सरकारला कठोर इशारा दिला आहे. इम्रान खान यांच्या प्रकृती आणि सुरक्षिततेबाबत खरी माहिती देण्यात आली नाही तर जनतेसह मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा आफ्रिदी यांनी दिला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “सरकार इम्रान खान यांच्या तब्येतीची खरी स्थिती लपवत आहे आणि देशाच्या बिघडलेल्या वातावरणासाठी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनाही जबाबदार धरले पाहिजे.”
🚨 #BREAKING
पाकिस्तान में खैबर पख्तूनख्वा के मुख्यमंत्री को सरेआम पीटा गया।
रिपोर्ट्स के मुताबिक सुहैल अफरीदी को पाकिस्तान सेना के इशारे पर बेरहमी से पीटा गया।
हालात और खराब होने के आसार#KhyberPakhtunkhwa #Pakistan #Pashtuns #SuhailAfridi #HumanRights pic.twitter.com/5V6JewFXOQ — Madhurendra kumar मधुरेन्द्र कुमार (@Madhurendra13) November 27, 2025
credit : social media
दरम्यान, सोशल मीडियावर इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा जोर धरत आहेत. ऑगस्ट 2023 पासून इम्रान खान आदियाला तुरुंगात आहेत. त्यांच्या बहिणी अनेक दिवसांपासून तुरुंगाबाहेर उभ्या असून, त्यांना भेटण्यास मनाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. या घटनेमुळे इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. तथापि, तुरुंग प्रशासनाने निवेदन जारी करत त्यांच्या प्रकृती “सामान्य” असल्याचा दावा केला आहे. मात्र, पीटीआय आणि खान यांच्या कुटुंबीयांना हा दावा मान्य नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Border Dispute: एका नव्या नोटेमुळे भारत-नेपाळमध्ये पेटली वादाची ठिणगी; सुगौली करारापासून आजपर्यंतचा 200 वर्षांचा वाद पुन्हा चिघळला
इम्रान खान यांच्या बहिणी अलिमा खान, नूरीन नियाझी आणि डॉ. उज्मा खान अनेक दिवसांपासून तुरुंगाबाहेर निदर्शने करत आहेत. त्यांच्या मते, त्यांना भावाला भेटू दिले जात नाही आणि आंदोलनादरम्यान त्यांच्यावरही लाठीचार्ज करण्यात आला. त्या म्हणतात की हे सर्व “क्रूरता” असून सरकार आणि लष्कर त्यांच्या भावाला पूर्णपणे बाहेरच्या जगापासून विलग करत आहे. परिणामी, पाकिस्तानातील राजकीय तणाव शिगेला पोहोचला असून या घटनांनी सरकार, लष्कर आणि न्यायव्यवस्था यांविषयी जनतेचा विश्वास अधिकच ढासळला आहे.
Ans: इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत माहितीची मागणी व PTI आंदोलनावर पोलिसांनी कारवाई केली.
Ans: स्थानिक सूत्रांनुसार, लष्कराच्या सूचनेवर कारवाई झाल्याचा आरोप.
Ans: तुरुंग प्रशासन त्यांची प्रकृती “सामान्य” असल्याचे सांगत असले तरी कुटुंबीय व PTI यावर विश्वास ठेवत नाहीत.