Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Noor Khan Airbase: पाकिस्तानमध्ये आणीबाणी! Pakistan हवाई दलाचा प्रमुख हवाई तळ जाळून खाक; तालिबानचा सर्वात मोठा प्रहार

Pakistan Military Base:तालिबानने पाकिस्तानच्या नूर खान हवाई तळावर हल्ला केला आहे. सरकार इराणला तोंड फोडत असतानाच, ते कराचीमध्ये स्वतःच्या नागरिकांवर गोळ्या झाडत आहे, त्यांचे रक्त सांडत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 02, 2026 | 09:35 AM
taliban attacks noor khan airbase rawalpindi pakistan civil war karachi violence

taliban attacks noor khan airbase rawalpindi pakistan civil war karachi violence

Follow Us
Close
Follow Us:
  • हवाई तळावर भीषण हल्ला
  • कराचीमध्ये रक्ताचा सडा
  • तालिबानचा सूड

Taliban attack on Noor Khan Airbase Rawalpindi : शेजारील देश पाकिस्तान सध्या इतिहासातील सर्वात भीषण संकटातून जात आहे. एकीकडे अफगाण तालिबानने पाकिस्तानच्या (Afghanistan-Pakistan Conflict) लष्करी तळांना लक्ष्य करून युद्ध पुकारले आहे, तर दुसरीकडे पाकिस्तान सरकार स्वतःच्याच जनतेचा आवाज दाबण्यासाठी कराचीच्या रस्त्यांवर रक्ताची होळी खेळत आहे. रावळपिंडी येथील अत्यंत महत्त्वाच्या नूर खान हवाई तळावर (Noor Khan Airbase) तालिबानने केलेल्या हवाई हल्ल्याने पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेचे धिंदवडे निघाले आहेत. या हल्ल्यामुळे पाकिस्तान आता चहुबाजूंनी वेढला गेला असून देशाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

तालिबानचा ‘नूर खान’ एअरबेसवर सर्जिकल स्ट्राईक

अफगाणिस्तानच्या तालिबान राजवटीतील संरक्षण मंत्रालयाने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, त्यांनी रावळपिंडीतील नूर खान हवाई तळावर आणि क्वेट्टामधील १२ व्या कॉर्प्सच्या मुख्यालयावर यशस्वी हवाई हल्ले केले आहेत. तालिबानच्या मते, पाकिस्तानी विमानांनी काबूल आणि बग्राममधील त्यांच्या तळांवर केलेल्या घुसखोरीचा हा सूड आहे. या हल्ल्यात खैबर पख्तूनख्वामधील घेलानी लष्करी तळाचेही मोठे नुकसान झाले आहे. रावळपिंडीसारखा सुरक्षित भागही आता तालिबानच्या टप्प्यात आल्याने पाकिस्तानी लष्कराची झोप उडाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Israel-Iran War: ‘Black Tomahawk’ युद्धातील अदृश्य शिकारी; रडारलाही न सापडणाऱ्या अमेरिकन ब्रह्मास्त्राची ‘अशी’ थरारक कहाणी

स्वतःच्याच रक्ताने माखलेले कराचीचे रस्ते

देशाच्या सीमा असुरक्षित असताना पाकिस्तानी प्रशासन कराचीमध्ये आपल्याच नागरिकांवर अत्याचार करत आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर कराचीमध्ये सुरू असलेल्या निदर्शकांना चिरडण्यासाठी पोलिसांनी थेट गोळीबार केला आहे. “बाहेरून सहानुभूती दाखवणारे सरकार घरात मात्र हैवान बनले आहे,” अशा शब्दांत आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. इराणबद्दल पुतना मावशीचे प्रेम दाखवणाऱ्या शाहबाज शरीफ सरकारचा खरा चेहरा आता जगासमोर आला आहे, जिथे हक्क मागणाऱ्या निष्पाप लोकांच्या छातीवर गोळ्या झाडल्या जात आहेत.

#BREAKING: Taliban in a statement says it has hit Pakistan’s Nur Khan Airbase in Rawalpindi as well as 12th Corps HQs of Pakistan Army in Quetta, Balochistan using armed drone. Af-Pak Border clashes also being reported. This is a developing story. — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) March 2, 2026

credit – social media and Twitter

लष्करी सज्जता की निव्वळ पोकळ वल्गना?

तालिबानने केवळ नूर खान एअरबेसवरच नाही, तर मोहंमद एजन्सीमधील लष्करी कमांड सेंटर्सवरही अचूक प्रहार केले आहेत. तालिबानने इशारा दिला आहे की, जर त्यांच्या हवाई क्षेत्राचे पुन्हा उल्लंघन झाले, तर इस्लामाबादला यापेक्षाही भयंकर परिणाम भोगावे लागतील. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या हल्ल्यांवर पाकिस्तानी लष्कराने अद्याप मौन बाळगले आहे. लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पंतप्रधान आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर स्वतःला महान सिद्ध करण्यात व्यस्त असताना, सीमेवर जवान आणि शहरात नागरिक मारले जात आहेत.

#BREAKING: First visuals on @NDTV of Afghan Taliban Armed Drone used to target Pakistan’s Most Sensitive Nur Khan Airbase in Rawalpindi, 10 months after India destroyed the same airbase causing huge embarrassment to Asim Munir. pic.twitter.com/6NF6TnQIp7 — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) March 2, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait of Hormuz: इराणने कापली जगाची ‘लाईफलाईन’! ‘या’ देशांच्या गळ्याभोवती आवळला होर्मुझचा फास; विश्वावर आर्थिक मंदीचं सावट

दक्षिण आशियात महायुद्धाचा धोका

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील हा वाढता तणाव आता केवळ दोन देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तालिबानने उघडपणे हवाई हल्ले सुरू केल्यामुळे दक्षिण आशियात मोठ्या युद्धाची ठिणगी पडली आहे. चीन आणि रशिया या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली गृहयुद्धाची परिस्थिती आणि सीमेवरील तालिबानी आक्रमण यामुळे हा अण्वस्त्रधारी देश विखुरण्याच्या मार्गावर आहे का? असा प्रश्न आता जागतिक स्तरावर विचारला जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: तालिबानने नूर खान हवाई तळावर हल्ला का केला?

    Ans: पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या काबूल आणि बग्राम भागात केलेल्या हवाई हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी तालिबानने हा प्रतिहल्ला केला आहे.

  • Que: कराचीमध्ये सध्या काय परिस्थिती आहे?

    Ans: कराचीमध्ये नागरिक सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरले असून, त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनेक निष्पाप नागरिक मारले गेले आहेत.

  • Que: या हल्ल्यात किती नुकसान झाले आहे?

    Ans: तालिबानच्या दाव्यानुसार, रावळपिंडीतील नूर खान एअरबेस आणि क्वेट्टातील १२ व्या कॉर्प्सच्या मुख्यालयाचे मोठे नुकसान झाले असून अनेक लष्करी अधिकारी ठार झाले आहेत.

Web Title: Taliban attacks noor khan airbase rawalpindi pakistan civil war karachi violence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • Afghanistan-Pakistan Conflict
  • pakistan army
  • World War 3

संबंधित बातम्या

US Iran Conflict : ‘मृत्यूसाठी तयार रहा…’ ; ट्रम्प यांनी इराणच्या सैन्याला पुन्हा धमकावले;  दिला आत्मसमर्पण करण्याचा इशारा
1

US Iran Conflict : ‘मृत्यूसाठी तयार रहा…’ ; ट्रम्प यांनी इराणच्या सैन्याला पुन्हा धमकावले; दिला आत्मसमर्पण करण्याचा इशारा

Iran-Israel War: महायुद्ध संपले नाही! इराणच्या मशिदीवर ‘लाल झेंडा’, रक्ताचा बदला घेण्याची गर्जना; ट्रम्पनेही दिली ‘भयंकर’ धमकी
2

Iran-Israel War: महायुद्ध संपले नाही! इराणच्या मशिदीवर ‘लाल झेंडा’, रक्ताचा बदला घेण्याची गर्जना; ट्रम्पनेही दिली ‘भयंकर’ धमकी

Strait of Hormuz: इराणने कापली जगाची ‘लाईफलाईन’! ‘या’ देशांच्या गळ्याभोवती आवळला होर्मुझचा फास; विश्वावर आर्थिक मंदीचं सावट
3

Strait of Hormuz: इराणने कापली जगाची ‘लाईफलाईन’! ‘या’ देशांच्या गळ्याभोवती आवळला होर्मुझचा फास; विश्वावर आर्थिक मंदीचं सावट

US-Israel Iran war: खामेनींच्या मृत्यूचे पडसाद पाकिस्तानात; आंदोलकांचा अमेरिकन दूतावासावर हल्ला, गोळीबारात 8 जणांचा करुण अंत
4

US-Israel Iran war: खामेनींच्या मृत्यूचे पडसाद पाकिस्तानात; आंदोलकांचा अमेरिकन दूतावासावर हल्ला, गोळीबारात 8 जणांचा करुण अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.