Kim Jong Un's destruction inevitable now A north korean Woman Retunrs to take revenge
प्योंगयोंग : उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांच्या संबंधी एक मोठी बातमी समोर आली हे. किम जोंग विरोधात पहिल्यांदाच कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियातून पळून गेलेल्या एका व्यक्तीने किम जोंग उन यांच्या विरोधात न्यायालयात गंभीर खटला दाखल केला आहे. दक्षिण कोरियाच्या न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार किम जोंग उनवर मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या आरोप दाखल करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. डेटाबेस सेंटर फॉर नॉर्थ कोरियन ह्युमन राईट्स (NKDB) च्या मानवाधिकार केंद्राने याबाबत माहिती दिली. केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (११ जुलै) सोलच्या मध्यवर्ती जिल्ह्या न्यायालयात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. ही तक्रार उत्तर कोरियाच्या तुरुंगातील पीडीताच्या कुटुंबांचे प्रतिनिधीत्व करणारे संस्थेचे प्रमुख चोई मिन-क्योंग यांच्या वतीने दिली जात आहे.
उत्तर कोरियामध्ये मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या पीडिताने कायदेशीर लढाई पुकारली आहे. किम जोंग विरोधात आणि उत्तर कोरियात पहिल्यांदाच असे प्रकरण समोर येत आहे. हे प्रकरण ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय जागतिक व्यासपीठांवर हा मुद्दा उपस्थित करणार आहेत. यासाठी योजना देखील आखली जात आहे. उत्तर कोरियाच्या नेते किम जोंगवर अनेकवेळा मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच उत्तर कोरियाच्या सततच्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांमुळे अमेरिकेने देखील त्यांच्यावर अनेक निर्बंध लादले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १९९७ मध्ये उत्तर कोरियातून चोई मिन-क्योंग या महिला पळून गेल्या होत्या. २००८ पर्यंत त्यांनी चीनमध्ये आश्रय घेतला. परंतु २००८ मध्ये चीनमधून त्यांना जबरदस्तीने उत्तर कोरियाला परत पाठवण्यात आले. त्यांनी आरोप केला आहे की, उत्तर कोरियात परतल्यावर त्यांना एका डिटेंशन सेंटरमध्ये पाच महिने ठेवण्यात आले. तिथे त्यांच्यावर, शारीरिक छळ, लैंगिक अत्याचार करण्यात आला. २०१२ मध्ये त्यांनी पुन्हा उत्तर कोरियातून बाहेर पडल्या आणि दक्षिण कोरियात स्थायिक झाल्या.
चोई मिन-क्योंग यांनी सध्या उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यावर मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षा मंत्रालयाच्या पाच अधिकाऱ्यांविरोधातही आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली आहे. सध्या या घटनेने संपूर्ण जगभर खळबळ उडाली आहे. चोई मिन-क्योंग यांनी म्हटले आहे की, “किमच्या राजवटीत मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी जबाबादर असलेल्यांना मला न्याय मिळवून द्यायचा आहे. मला विश्वास आहे की, कायदेशीररित्या हे शक्य आहे. तसेच जगाचे लक्ष्य उत्तर कोरियाकडे आहे.”