कॅनडात प्रशिक्षणादरम्यान दोन विमानांची जोरदार टक्कर; भारतीय वंशाच्या विद्यार्थी पायलटचा अपघातात मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ओटावा : कॅनडामध्ये एक दुर्घटना घडली आहे. कॅनडात दोन प्रशिक्षण विमानांची जोरदार टक्कर झाली आहे. यामध्ये दोन प्रशिक्षणार्थींचा मृत्यू झाला आहे. भारतीय वाणिज्य दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये भारतीय वंशाच्या विद्यार्थी पायलटचाही समावेश आहे. दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (८ जुलै) सकाळी कॅनडाच्या दक्षिण मॅनिटोबात ही घटना घडली. एका स्टाईनबाख साउथ विमानतळाजवळ वैमानिकांचे प्रशिक्षण सुरु होते. यावेळी हा अपघात घडला. अपघातानंतर धावट्टीपासून सुमारे ४०० मीटर अंतरावर विमानाचे अवशेष पडले. हार्वेज एअर पायलट स्कूलचे वैमानिक विद्यार्थी यावेळी प्रशिक्षण घेत होते.
यासंबंधी कॅनडातील भारतीय वाणिज्य दूतावासाने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात सांगण्यात आले आहे की, मॅनिटोबाच्या स्टीनबाखजवळ एक विमान अपघात झाला. या अपघातात तरुण भारतीय वैमानिक विद्यार्थी श्रीहरी सुकेश याचे निधन झाले. या बद्दल आम्ही दुख व्यक्त करतो. आम्ही विद्यार्थ्याच्या कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. तसेच कुटुंबीयांना आवश्यक ती मदत आम्ही पुरवू. सध्या आम्ही शोकग्रस्त कुटुंब आणि पायलट प्रशिक्षण शाळा आणि स्थानिक पोलिसांच्या संपर्कात आहोत. असे भारतीय दूतावासाने म्हटले आहे.
With profound sorrow, we mourn the tragic passing of Mr. Sreehari Sukesh, a young Indian student pilot, who lost his life in a mid-air collision near Steinbach, Manitoba. We extend our deepest condolences to his family. The Consulate is in contact with the bereaved family, the…
— IndiainToronto (@IndiainToronto) July 9, 2025
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, श्रीहरीने खाजगी पायलट परवाना मिळवला होता. सध्या तो व्यावसायिक पायलट विमानाचे प्रशिक्षण घेत होते. हार्वेच्या एअर पायलट ट्रेनिंग स्कूलमध्ये तो प्रशिक्षण घेत होता. या स्कूलचे अध्यक्ष ॲडम पेनर यांनी म्हटले की, घटनेच्या वेळी दोन्ही विद्यार्थी पायलट लहान सेस्ना सिंगल-इंजिन विमानांच्या टेकऑफ आणि लॅंडिगचे प्रशिक्षण घेत होते.
यावेळी दोन्ही विद्यार्थ्यांनी एकाच वेळी विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. धावपट्टी लहान असल्यामुळे दोन्ही विमानांची टक्कर झाली आणि अपघात घडला. अपघातनंतर रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
हार्वेज एअर पायलट ट्रेनिंग स्कूलची सुरुवात १९७० मध्ये करण्यात आली होती. दरवर्षी जगभरातून अंदाजे ४०० विद्यार्थी या स्कूलमध्ये विमानाचे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात.