LeT joined State Khorasan Province under ISIS funding
Pakistan News in Marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानने (Pakistan) दहशतवादाला पुन्हा खतपाणी घालण्यास सुरुवात केली आहे. याचे ठोस पुरावे देखील सापडले आहे. एका गुप्तचर डोजियरने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची लष्करी गुप्तचर संस्था ISIS च्या निधीवर चालणाऱ्या लष्कर-ए-तैयबा (LeT) ने एका खतरनाक दहशतवादी संघटनेशी हातमिळवणी केली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, LeT ने इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत (ISKP) या कुख्यात दहशतवादी संघटनेशी हातमिळवणी केली आहे. या भागीदाराची उद्देश काश्मीरपुरता मर्यादित नसून बलूचिस्तानला लक्ष्य केले जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान लष्कर या संघटनांना पाठिंबा देत असून बलूचिस्तानमध्ये सुरु असलेल्या स्वातंत्र्यवादी चळवळींना चिरडत आहेत. तसेच पाकिस्तान काश्मीरमध्ये देखील या दोन संघटनांनी अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे उघड झाले आहे.
मीडिया रिपोर्टुसार, अफगाण तालिबानने यापूर्वी ISKP ला गैर-इस्लामिक संघटना म्हणून घोषित केले आहे. पण पाकिस्तानच्या डीप स्टेटने या संघटनेच्या मदतीने बलूच जनतेचा आवाज आवळण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. नुकतेच ISKP ने काश्मीरमध्ये आपली कारवाई सुरु ठेवणार असल्याची सार्वजनिक घोषणा केली होती.
सध्या ISIS, LeT, आणि ISKP च्या एकत्र येण्याने मोठी खळबळ माजली आहे. या संघटनांमध्ये एक शस्त्रास्त्र करारही ISIS च्या देखरेकीखाली करण्यात आला आहे. २०२५ मार्च पासून बलूच बंडखोरांनी मुस्तंग भागा हल्ले सुरु केले आहे. त्यांनी ISKP च्या अनेक दहशतवाद्यांना ठार केले आहे. परंतु मोहम्मद अशफाकने बलूचिस्तानमध्ये पाकिस्तानविरोधात जिहाद संकल्पना सुरु केली आहे.
पाकिस्तानामधील वाढता दहशतवाद सध्या दक्षिण आशियासाठी धोकादायक ठरत आहे. यामुळे दक्षिण आशियातील भागांमध्ये अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्वात जास्त धोका हा भारताला असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तान हा भारताचा सर्वात कट्टर शत्रू आहे. अनेक वेळा पाकिस्तानने भारताविरोधी कट रचण्याचे प्रयत्नही केले आहेत.
प्रश्न १. पाकिस्तानच्या ISIS च्या देखरेखी खाली कोणत्या दहशतवादी संघटना आल्या एकत्र?
पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIS च्या देखरेखीखाली LeT आणि ISKP या दहशवादी संघटना एकत्र आल्या आहेत.
प्रश्न २. या संघटनांच्या एकत्र येणाचा काय आहे उद्देश?
LeT ने इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत (ISKP) या कुख्यात दहशतवादी संघटनेशी हातमिळवणी केली आहे. या भागीदाराची उद्देश काश्मीरपुरता मर्यादित नसून बलूचिस्तानला लक्ष्य केले जात आहे.
US PAK Deal : पळपुट्या पाकिस्तानवर अमेरिकेच्या वरदहस्त; दहशतवादी पाळणाऱ्यांना देणार AMRAAM मिसाईल