AMRAAM US PAK Deal : पळपुट्या पाकिस्तानवर अमेरिकेच्या वरदहस्त; दहशतवादी पाळणाऱ्यांना देणार AMRAAM मिसाईल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pakistan US Relations : इस्लामाबाद/वॉशिंग्टन : गेल्या काही काळापासून अमेरिका (America) आणि पाकिस्तानचे (Pakistan) संबंध चांगले होताना दिसत आहे. पाकिस्तानला डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची जी हुजूरी करण्याचे, बक्षिस मिळाले आहे. नुकतेच पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी ट्रम्प यांना दुर्मिळ खनिजांची खास भेट दिली होती, तर आता अमेरिकेने देखील याबदल्यात पाकिस्तानला AMRAAM शस्त्रे पुरवण्यास मान्यता दिली आहे. पण ही भारतासाठी अत्यंत धोक्याीची बाब मानली जात आहे.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाने पाकिस्तानला AIM-120 AMRAAM ही अत्याधुनिक क्षेपणास्त्रे देण्याचे मान्य केले आहे. यामुळे पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे. पाकिस्तानच्या संरक्षण ताकदीची वाढ होणार आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, अमेरिकेच्या शस्त्रास्त्र करारात परदेशी लष्करी विक्रीत पाकिस्तानचाही समावेश आहे.
पाकिस्तानसाठी अमेरिकेसोबतची ही डील अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. सद्या पाकिस्तानकडे अमेरिकेचे F-16 लढाऊ जेट आहे. यामुळे AMRAAM ही मिसाइल खास या विमानांसाठी डिसाईन करम्यात आली आहे. या लढाऊ विमानामुळे २०१९ च्या बालाकोटच्या कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धात हे क्षेपणास्त्र वापरले गेले होचे. यामुळे याचे आधुनिक व्हर्जन पाकिस्तनला मिळाल्यास त्यांच्या हवाई दलाची ताकद अधिक वाढणार आहे.
याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पाकिस्तानेचे लष्करप्रमुख यांनी अमेरिकेला भेट दिली होती. या बैठकीनंतरच हा करार होत असल्याने पाकिस्तानने याला रेअर अर्थ खनिजांवरील करार असे म्हटले आहे. सध्या अमेरिकेचा रुख पुन्हा एकदा पाकिस्तानकडे झुकताना दिसत आहे.
याचा भारताच्या दृष्टीकोनातून मोठा धोका आहे. सध्या भारतही आपली हवाई ताकद वाढवत आहे. पण पाकिस्तानला मिळालेल्या अमेरिकेच्या या सर्वात अत्याधुनिक मिसाइमुळे दक्षिण आशियातील समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतासाठी सुरक्षेच्या दृष्टीने हे सर्वात मोठे आव्हान आहे.
प्रश्न १. अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये कोणता करार करण्यात आला?
अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये AIM-120 AMRAAM च्या अत्याधुनिक क्षेपणास्त्राचा करार करण्यात आला आहे.
प्रश्न २. पाकिस्तानसाठी AIM-120 AMRAAM च्या कराराचे काय महत्व आहे?
अमेरिकेसोबतच्या AIM-120 AMRAAM क्षेपणास्त्रांच्या करारामुळे पाकिस्तानच्या हवाई आणि संरक्षण ताकदीत वाढ होणार आहे.
प्रश्न ३. पाकिस्तान-अमेरिकेतील करारचा भारतावर काय परिणाम होणार?
पाकिस्तान-अमेरिकेच्या अत्याधुनिक मिसाइल्सच्या करारामुळे भारतासमोर सुरक्षेच्या दृष्टीने मोठी आव्हाने उभी राहणार आहेत.