Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gatwick Airport: लंडन विमानतळावर मोठा गोंधळ; पाणी संपले अन् दोन्ही टर्मिनलमधील स्वच्छतागृहे, रेस्टॉरंट्स बंद, प्रवाशांचा संताप

London Gatwick Airport News: रविवारी लंडनच्या गॅटविक विमानतळावर वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्णपणे बंद पडला, परिणामी पाणीपुरवठा पूर्णपणे थांबला आणि प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 27, 2026 | 03:18 PM
london gatwick airport water supply outage power cut marathi news

london gatwick airport water supply outage power cut marathi news

Follow Us
Follow Us:
  • जलशुद्धीकरण प्रकल्पात तांत्रिक बिघाड
  • दोन्ही टर्मिनलमधील सुविधा बंद
  • प्रवाशांचा संताप व प्रशासनाचे स्पष्टीकरण

ब्रिटेनमधील सर्वात व्यस्त आणि महत्त्वाच्या विमानतळांपैकी एक असलेल्या लंडनच्या (London) गॅटविक विमानतळावर (Gatwick Airport) रविवारी अचानक एक मोठे संकट ओढवले. परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मुख्य जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम पूर्णपणे थांबले आणि त्याचा थेट फटका विमानतळाच्या संपूर्ण पाणीपुरवठ्याला बसला. ऐन गर्दीच्या वेळी पाणी बंद झाल्याने विमानतळावरील स्वच्छतागृहे, कॅफे, बार आणि रेस्टॉरंट्स तातडीने बंद करावी लागली. यामुळे हजारो आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवाशांना अत्यंत क्लेशदायक परिस्थितीचा सामना करावा लागला.

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, गॅटविक विमानतळाला पाणी पुरवठा करणाऱ्या ‘एसइएस वॉटर’ (SES Water) या कंपनीच्या ‘बो बीच’ (Bough Beech) येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात अचानक तांत्रिक बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाला. या वीज खंडिततेमुळे पाण्याच्या दाबात प्रचंड घट झाली आणि काही वेळातच विमानतळाच्या उत्तर (North) आणि दक्षिण (South) दोन्ही टर्मिनल्समधील नळांचे पाणी पूर्णपणे बंद झाले. या तांत्रिक समस्येचा फटका केवळ विमानतळालाच नाही, तर लंडनजवळील केंट आणि ससेक्स या परगण्यांमधील अनेक निवासी भागांनाही बसला.

शौचालयांना कुलूप आणि रेस्टॉरंट्स बंद; प्रवाशांचे अतोनात हाल

विमानतळावर पाणीच उपलब्ध नसल्यामुळे स्वच्छता आणि आरोग्याच्या कारणास्तव प्रशासनाला तातडीने कठोर पावले उचलावी लागली. दोन्ही टर्मिनलमधील सर्व स्वच्छतागृहांना (Toilets) टाळे ठोकण्यात आले, तसेच सर्व खाद्यपदार्थांची दुकाने आणि रेस्टॉरंट्स बंद करण्यात आली. यामुळे विमानाचे उड्डाण होण्याची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. पिण्यासाठी पाणी न मिळणे, हात धुण्याची सोय न असणे आणि लहान मुले व वृद्धांसाठी शौचालयाची सोय उपलब्ध न झाल्याने टर्मिनलवर प्रचंड गोंधळ उडाला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : NISAR: इस्रो-नासाच्या ‘निसार’ उपग्रहाचा मोठा खुलासा; व्हेनेझुएला भूकंपात जमीन 2 फूट सरकली, विनाशाचा भयानक चेहरा समोर

रेस्टॉरंट्स आणि बार बंद झाल्यामुळे प्रवाशांच्या बसण्याच्या जागांवरही मर्यादा आल्या. हजारो प्रवासी जागा न मिळाल्यामुळे थेट जमिनीवर आणि फरशीवर बसलेले दिसून आले. ब्रिटनचे माजी खासदार मायकल डुघर यांनी सोशल मीडियावर या गोंधळाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत विमानतळ प्रशासनावर कडक शब्दांत टीका केली. त्यांनी म्हटले की, “लहान मुले, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना अशा पद्धतीने जमिनीवर बसावे लागणे अत्यंत लज्जास्पद आहे. प्रशासनाने किमान लोकांना बसण्यासाठी बंद असलेली रेस्टॉरंट्स खुली करून दिली पाहिजेत.”

प्रशासनाचा दावा विरुद्ध प्रवाशांचा आरोप

परिस्थिती चिघळल्यानंतर गॅटविक विमानतळ प्रशासनाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर पोस्ट करत प्रवाशांची अधिकृत माफी मागितली. त्यांनी स्पष्ट केले की, विमानतळ कर्मचारी टर्मिनलवर उपस्थित असून प्रवाशांना मदतीचा हात देत आहेत. तसेच प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी मोफत बाटलीबंद पाण्याचे (Bottled Water) वाटप केले जात असल्याचा दावा प्रशासनाने केला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia-Ukraine War: युक्रेनियन ड्रोनच्या हल्ल्याने रशिया हादरला; बेलगोरोड आणि रोस्तोवमध्ये भीषण विध्वंस, 2 ठार अन् 17 जखमी

मात्र, अनेक प्रवाशांनी प्रशासनाचा हा दावा फेटाळून लावला. ‘पॉल’ नावाच्या एका प्रवाशाने बीबीसीशी बोलताना सांगितले की, “विमानतळावर पाणी पुरवठा बंद असल्याचे कोणतेही फलक किंवा सूचना देण्यात आल्या नव्हत्या. तसेच कोणतीही बाटलीबंद पाण्याची सोय आम्हाला दिसली नाही. पुढील काही तासांत प्रवास करणाऱ्यांसाठी ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे.” दरम्यान, जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुरुस्ती करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न वेगाने सुरू असून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा पूर्ववत केला जात असल्याचे जल कंपनीने स्पष्ट केले आहे.

Web Title: London gatwick airport water supply outage power cut marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • airport
  • London
  • World news

संबंधित बातम्या

Third Temple : तिसरे मंदिर म्हणजे काय?अल-अक्साच्या जागेवरच ते का उभारण्याची मागणी होते?
1

Third Temple : तिसरे मंदिर म्हणजे काय?अल-अक्साच्या जागेवरच ते का उभारण्याची मागणी होते?

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
2

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
3

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!
4

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.