
Major action taken after the murder of Hindu youth Deepu Chandra Das in Bangladesh 7 accused arrested
Deepu Chandra Das murder Bangladesh 7 arrested : बांगलादेशातील (Bangladesh) मैमनसिंग जिल्ह्यात हिंदू तरुण दीपू चंद्र दास (Deepu Chandra Das) याच्या ‘मॉब लिंचिंग’ने संपूर्ण जग हादरले होते. या अमानवीय घटनेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियांमुळे बांगलादेशच्या सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. बांगलादेशच्या ‘रॅपिड ॲक्शन बटालियन’ने (RAB-14) विविध ठिकाणी छापे टाकून या प्रकरणी ७ मुख्य आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे दोषींना कठोर शिक्षा होण्याची आशा निर्माण झाली आहे.
मैमनसिंग जिल्ह्यातील वालुका (भालुका) उपजिल्ह्यात गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. २७ वर्षीय दीपू चंद्र दास, जो एका स्थानिक कपड्याच्या कारखान्यात काम करायचा, त्याच्यावर पैगंबरांविरुद्ध अपमानजनक टिप्पणी केल्याचा (ईशनिंदा) आरोप करण्यात आला. कोणत्याही पुराव्याशिवाय एका मोठ्या जमावाने त्याला पकडले आणि बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावाचा राग इतका अनावर होता की, मारहाणीत दीपूचा जागीच मृत्यू झाला. मात्र, नराधमांचे मन एवढ्यावरही भरले नाही; त्यांनी दीपूचा मृतदेह एका झाडाला बांधला आणि तो जाहीरपणे जाळून टाकला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Saudi Snow : जगाचा अंत जवळ आलाय? सौदी अरेबियातील बर्फवृष्टीमुळे कालचक्र फिरलं अन् पैगंबरांची ‘ती’ भविष्यवाणी पुन्हा जिवंत
घटनेचे गांभीर्य ओळखून रॅपिड ॲक्शन बटालियनने तातडीने तपास चक्र फिरवली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये १९ वर्षांच्या तरुणांपासून ते ४६ वर्षांच्या प्रौढांचा समावेश आहे. मोहम्मद लिमन सरकार (१९), मोहम्मद तारिक हुसेन (१९), मोहम्मद माणिक मिया (२०), इरशाद अली (३९), निजुम उद्दीन (२०), आलमगीर हुसेन (३८) आणि मोहम्मद मिराज हुसेन अकोन (४६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या सर्वांनी जमावाला चिथावणी देण्यात आणि दीपूची हत्या करण्यात मुख्य भूमिका बजावल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Alina Kabaeva : Putin प्रेमात पडले! ‘Girlfriend कोण?’ विचारताच रशियन राष्ट्राध्यक्ष चक्क लाजले; पाहा ‘तो’ VIRAL VIDEO
बांगलादेशात सध्या विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर प्रचंड अराजकता माजली आहे. ढाका आणि मैमनसिंगसह अनेक शहरांमध्ये जाळपोळ सुरू आहे. या अशांततेचा फायदा घेऊन धार्मिक कट्टरतावाद्यांनी पुन्हा एकदा अल्पसंख्याक हिंदूंना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. दीपू चंद्र दास हा बऱ्याच काळापासून तिथे भाड्याच्या घरात राहून शांततेत आपले आयुष्य जगत होता. मात्र, केवळ अफवेच्या जोरावर एका निष्पाप तरुणाचा बळी घेतल्याने तिथल्या हिंदू समुदायामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
भारत सरकारनेही या घटनेची दखल घेत बांगलादेश प्रशासनाकडे विचारणा केली आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने “नव्या बांगलादेशात हिंसाचाराला जागा नाही” असे म्हटले असले तरी, जमिनीवरची परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण आहे. या ७ आरोपींच्या अटकेनंतर आता इतर दोषींना कधी पकडले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ans: दीपू चंद्र दास याच्यावर जमावाने ईशनिंदेचा (Blasphemy) आरोप केला होता, त्यानंतर जमावाने त्याला बेदम मारहाण करून त्याची हत्या केली.
Ans: बांगलादेशच्या रॅपिड ॲक्शन बटालियनने (RAB-14) आतापर्यंत ७ मुख्य संशयित आरोपींना अटक केली आहे.
Ans: ही भीषण घटना बांगलादेशातील मैमनसिंग (Mymensingh) जिल्ह्यातील वालुका (भालुका) उपजिल्ह्यात घडली.