Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणावर आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे आयोजन; मलाला युसूफझाई उपस्थित, तालिबानने दिला नकार

पाकिस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणावर आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मलाला युसूफझाई देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहे. मात्र, तालिबानने या परिषदेला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 12, 2025 | 03:28 PM
Malala Yousafzai will attends International summit on girls' education in Pakistan

Malala Yousafzai will attends International summit on girls' education in Pakistan

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणावर आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचा उद्देश मुस्लिमबहुल देशांतील नेते आणि शिक्षण मंत्र्यांना एकत्र आणणे आहे. परंतु अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला निमंत्रण दिले गेले असतानाही, त्यांनी या परिषदेपासून दूर राहणे पसंत केले. अफगाणिस्तान हा एकमेव देश आहे जिथे सध्या मुलींच्या शाळेत जाण्यास बंदी आहे. दरम्यान, मलाला युसूफझाई देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहे.

मलाला युसूफझाई राहणार उपस्थित

या परिषदेचे मुख्य आकर्षण म्हणजे नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मलाला युसूफझाई यांची उपस्थिती आहे. मलाला यांनी आपल्या मूळ देशात परत आल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “पाकिस्तानमध्ये परत आल्याने मला खूप सन्मान आणि आनंद होत आहे.” 2012 मध्ये तालिबानी हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारासाठी त्या ब्रिटनला गेल्यानंतर, ही त्यांची पाकिस्तानमधील तिसरी भेट आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारताला आमंत्रण; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर राहणार उपस्थित

मुलींच्या शिक्षणासाठी जीवन समर्पित

मलाला यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. तालिबानने त्यांच्यावलर गोळी झाडून त्यांच्या स्वप्न संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु मलाला यांनी हार मानली नाही. उलट, त्यांनी आपल्या संघर्षातून जागतिक पातळीवर एक उदाहरण निर्माण केले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने गौरवण्यात आले. मलाला युसूफझाई आता मुलींच्या शिक्षणाच्या हक्कांची जागतिक प्रवक्त्या बनल्या आहेत.

I am excited to join Muslim leaders from around the world for a critical conference on girls’ education. On Sunday, I will speak about protecting rights for all girls to go to school, and why leaders must hold the Taliban accountable for their crimes against Afghan women & girls. https://t.co/g2ymU4lTOw — Malala Yousafzai (@Malala) January 9, 2025


शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करताना मलालाने लिहिले की, “मुलींच्या शिक्षणावर आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुस्लिम नेत्यांसोबत संवाद साधण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.” त्यांनी सांगितले की त्या रविवारी सर्व मुलींना शाळेत जाण्याचा हक्क मिळवून देण्याच्या विषयावर भाषण करेल. तसेच, त्या अफगाणिस्तानातील महिलांवर आणि मुलींवर होणाऱ्या अन्यायासाठी तालिबानला जबाबदार धरण्याची गरज अधोरेखित करेल.

मोहम्मद अल-इस्सा यांचा पाठिंबा

पाकिस्तानच्या शिक्षणमंत्री खालिद मकबूल सिद्दीकी यांनी म्हटले आहे की, अफगाणिस्तानला निमंत्रण देण्यात आले होते, मात्र, त्यांनी या परिषदेत सहभाग घेतला नाही. तर याचदरम्यान, सऊदी मौलवी आणि मुस्लिम वर्लड लीगचे महासचिव मोहम्मद अल-इस्सा यांनी या शिखर परिषदेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “मुलींच्या शिक्षणाला धर्माच्या नावावर विरोधकरणारे लोक चुकीचे आहेत. संपूर्ण मुस्लिम लीग जग मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व मान्य करते.”

या परिषदेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व आणि तालिबानी अन्यायाविरोधातील आवाज जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मलालाचा संघर्ष आणि तिचे धाडस मुलींच्या शिक्षणासाठी प्रेरणादायी ठरले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून पडल्या बाहेर; ‘या’ कारणासाठी घेतला निर्णय

Web Title: Malala yousafzai will attends international summit on girls education in pakistan taliban refuses nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
2

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
3

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
4

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.